Friday, September 12, 2025

दूषित पाण्यामुळे डोंबिवलीकरांचे आरोग्य धोक्यात

दूषित पाण्यामुळे डोंबिवलीकरांचे आरोग्य धोक्यात

ठाणे  : डोंबिवली पश्चिमेतील गृहनिर्माण सोसायट्यांना दूषित व पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा होत असून, यामुळे नागरिक त्रासले आहेत.

पिवळसर रंगाचे, फेसाळलेले पाणी घरातील नळाला येत असून, वारंवार पालिकेकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नव्हती. सोमवारी पुन्हा दूषित पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांनी पालिकेकडे तक्रार केली आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांना बाहेरून टँकर मागवावा लागत आहे. सोसायटीच्या टाक्याही वारंवार साफ करून घ्याव्या लागत आहेत. यामुळे नागरिक कमालीचे त्रासले असून, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

डोंबिवली पश्चिमेला नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. सोमवारी पुन्हा दूषित पाणी घराघरांत आले आहे. पिवळसर किंवा फेसाळलेले पाणी नळाला येत असल्याने त्याचा वापर कसा करावा, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. यामुळे सोसायट्यांना जास्तीचे पैसे देऊन बाहेरून टँकर मागवावा लागत आहे. जुलै महिन्यात सलग तिसऱ्यांदा दूषित पाणीपुरवठ्याची घटना घडली आहे. येथील शारदा सोसायटीमधील नागरिकांनी या प्रकरणी पालिकेकडे लेखी तक्रार केली आहे.

Comments
Add Comment