ऑक्टोबरमध्ये होणार परळ टीटी उड्डाणपुलाच्या डागडुजीला सुरुवात!

मुंबई : मुंबई शहरासाठी महत्त्वाचा असलेल्या व पूर्व उपनगरांशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या परळ टीटी उड्डाणपुलाच्या दुरुस्ती आणि बळकटीकरणासाठी महापालिकेने निर्णय घेतला आहे. पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या कामांसाठी अंदाजे १३ कोटी ८२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून कंत्राटदाराची निवडही करण्यात आली आहे. ही दुरुस्ती पावसाळ्यानंतर टप्प्याटप्याने केली जाणार आहे.


परळ टीटी उड्डाण पुलाला यंदा ३६ वर्षे पूर्ण झाली असून, २०२३ मध्ये डांबरी पृष्ठभाग खराब झाल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. त्यावेळी पुलाची केवळ तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. राज्य सरकारने महापालिकेला तातडीने दुरुस्तीचे निर्देश दिले होते. यानंतर महापालिकेने सप्टेंबर २०२४ मध्ये पुलाच्या संपूर्ण बळकटीकरणासाठी निविदा काढली होती. आता ती अंतिम करण्यात आली असून लवकरच पुलाचे काम सुरू होणार आहे.


दुरुस्तीचे काम करण्यासाठी उड्डाणपूल बंद केल्यास भायखळा, लालबाग, दादर, सायन आणि पूर्व उपनगरातील प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या सायन उड्डाणपूलही बंद असल्याने वाहतुकीची जबाबदारी परळ पुलावर आहे. म्हणून हे काम टप्प्याटप्याने करण्यात येणार आहे. या पुलामध्ये सध्या २२ प्रसरण सांधे आहेत. ते कमी करून १० पर्यंत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिक प्रसरण सांधे हे वाहतुकीसाठी त्रासदायक ठरत असल्याने, काँक्रिटीकरण करून पुलाच्या मजबुतीकरणासह रस्त्याच्या पृष्ठभागालाही नवसंजीवनी दिली जाणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईत साथीच्या आजारांचे वाढले प्रमाण

मुंबई : गेल्या पंधरावड्यात साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात

'आपली एसटी' ॲपद्वारे कळणार लालपरीचा ठावठिकाणा - प्रताप सरनाईक

मुंबई : प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचुक ठावठीकाणा काळावा

नवी मुंबई विमानतळामुळे महामार्गावर 'ट्रॅफिक कोंडी'चा धोका!

विमानतळासाठी वाहतूक 'वळवणार'; पाम बीच रोडवरील गर्दी टाळण्यासाठी 'सिक्रेट प्लॅन' लागू नवी मुंबई: नवी मुंबई

तब्बल १५ वर्षांपासून महिला होती त्रस्त, महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी कायमची केली त्रासातून मुक्तता ..

मुंबई (खास प्रतिनिधी) : रजोनिवृत्तीनंतरच्या रक्तस्त्रावाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्य ६५ वर्षीय महिलेवर

बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस 'मातोश्री'त का ठेवला?

रामदास कदम यांचे दसरा मेळाव्यात खळबळजनक विधान; 'मृत्युपत्रात सही कोणाची होती?' चौकशीची मागणी मुंबई: शिवसेनेचे

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार! एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा

'व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरणारा आणि फेसबुक लाईव्ह करणारा मी नाही,' एकनाथ शिंदेंचा पलटवार मुंबई: दसऱ्याच्या