आता माणूसच नाही तर देवाचे देऊळही शेअर बाजारात गुंतवणूक करणार ! सरकारचा 'हा' मोठा निर्णय

  71

प्रतिनिधी: आताची सर्वात मोठी अपडेट पुढे आली आहे. आता माणूसच नाही तर देवाचे देऊळ देखील शेअर बाजारात पैसे गुंतवणार आहे. मुख्य म्हणजे म्हणजे ईएफटी (Exchange Traded Fund ETF), अथवा म्युचल फंड, शेअर्स, कॉर्पोरेट बॉण्ड व इतर सिक्युरिटीजची गुंतवणूक केवळ आता कंपन्यांपुरती अथवा गुंतवणूकदारांपुरती मर्यादित राहणार नसून अगदी धार्मिक संस्था, मंदिरे, धर्मादाय संस्था, विना नफा संस्था (NGO) आणि तत्सम संस्थाना आता सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. तसा जीआर महाराष्ट्राच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाने काढला आहे. त्यामुळे आता या संस्थांना पैशाची कुठलीही वानवा येण्याची शक्यता नाही.


धार्मिक संस्थाना गुंतवणूकीसाठी आता आपल्या ५०% पर्यंत निधी म्युचल फंड व अशा इतर गुंतवणूकीत गुंतवता येईल. याशिवाय प्रत्येक गुंतवणूकीसाठी आता सरकारची परवानगी सुद्धा आवश्य क नसेल तर संबंधित मर्यादेपर्यंत बिनदिक्कत गुंतवणूक संस्थाना करता येणार असल्याचे जीआरच्या माध्यमातून आता स्पष्ट झाले आहे. उर्वरित ५०% फंड जुन्या नियमावलीप्रमाणे वापरावा लागे ल.


सध्या महाराष्ट्रातील मोठी देवस्थाने आपल्या जमापुंजीतील रक्कम मुदत ठेवीत (Fixed Deposit FD) मध्ये गुंतवतात अहवालानुसार ही रक्कम ४ ते ६% असते आता मात्र हा पैसा बाजारात गुंत वल्याने देवस्थानाच्या मिळकतीत वाढ होणार आहे. ज्याचा प्रभावीपणे वापर देवस्थान लोक कल्याणासाठी व सामाजिक सेवा कार्यासाठी वापरू शकेल. पूर्वीच्या ४ ते ५% परताव्यातील तुलनेत बाजारातील गुंतवणूकीतून देवस्थाने १० ते १२% परतावा कमावू शकतात.


यासाठीच धर्मादाय आयुक्तांनी हा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. मात्र माहितीनुसार या गुंतवणूकीसाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाने काही मार्गदर्शक तत्वे संस्थेद्वारे पाळण्यास सांगितली आहे त. उदाहरणार्थ शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढउतार होत असते ज्यात नफ्याच्या तुलनेत नुकसानही होते अशा परिस्थितीत सेबी (Security Exchange Board of India SEBI) या निया मक मंडळाने मान्यता दिलेल्या फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला या जीआर (General Resolution GR) देण्यात आला आहे. महाराष्ट्रात सध्या एक लाखाहून अधिक ट्रस्ट कार्यरत आहे यांना या योजनेचा मोठा लाभ होणे अपेक्षित आहे. त्यामुळे होत असलेल्या फायद्याबरोबरच जबाबदारी ही संस्थांचीही असल्याने या निधीचा विनिमय योग्य रितीने व्हावा यासाठी या संस्था उत्तरदायी अस तील.

Comments
Add Comment

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी

सांगा चूक कोणाची? लपवाछपवी कोणासाठी? बीएमसी आणि म्हाडामध्ये घमासान!

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) यांच्यात चांदिवलीतील

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार

मतदार यादीतून माझे नाव गायब होऊ शकते तर..., तेजस्वी यादवच्या या आरोपावर निवडणूक आयोगाचे आले स्पष्टीकरण

पाटणा : बिहारच्या मतदार यादीतून तेजस्वी यादव यांचे नाव वगळण्यात आलेले नाही. पाटणा जिल्हा प्रशासनाने तेजस्वी

इंडिगोच्या विमानात कानशिलात! पॅनिक अटॅक आलेला तरुण बेपत्ता!

मुंबई : मुंबईहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पॅनिक अटॅकचा