डॉ. स्वामिनाथन यांचे कृषी क्षेत्रातील योगदान, शाश्वत शेती, हवामान अनुकूलन, महिला शेतकरी इत्यादी बाबींतील विशेष कार्य विचारात घेऊन त्याअनुषंगाने शाश्वत शेती दिन राज्य / जिल्हा / तालुका स्तरावर साजरा करणे, विद्यापीठ स्तरावर साजरा करणे, भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांच्या नावे पुरस्कार देणे, इत्यादी बाबींसंदर्भात कृषी आयुक्तलयाच्या वतीने शाश्वत शेती दिन साजरा करण्याबाबत सूचना देण्यात येणार आहेत.
विद्यापीठांतर्गत स्वामिनाथन बायो हॅप्पीनेस सेंटर - संशोधन केंद्र.
प्रत्येक कृषी विद्यापीठाने शाश्वत शेती, हवामान अनुकूलन तंत्रज्ञान व अन्न सुरक्षा या संदर्भातील एक स्वंतत्र विषय निवडून विद्यापीठांतर्गत "डॉ. एम. एस. स्वामिनाथन बायो हॅप्पीनेस सेंटर- संशोधन केंद्र" स्थापन करण्यात येणार आहे.