दहशतवादाशी लढण्यास काँग्रेस सपशेल अपयशी

  47

शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा लोकसभेत हल्लाबोल


नवी दिल्ली : काँग्रेस सरकारच्या काळात देशात अनेक दहशतवादी हल्ले झाले. यात शेकडो निरपराध नागरिकांचे बळी गेले. मात्र काँग्रेसचे मंत्री भाषणबाजी करण्यात मग्न होते. काँग्रेसचे महाराष्ट्रतील तत्कालीन मुख्यमंत्री बॉलिबुडमधील लोकांना घेऊन हॉटेल ताजमध्ये गेले, दहशतवादाशी लढण्यास काँग्रेस सपशेल अपयशी ठरली, असा हल्लाबोल शिवसेनेच्या संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज लोकसभेत केला. ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत खासदार डॉ. शिंदे यांनी शिवसेनेची भूमिका सभागृहात मांडली. देशाच्या सुरक्षेबाबत शिवसेना कोणतीही तडजोड करणार नाही, असे खासदार डॉ. शिंदे यांनी विरोधकांना ठणकावले.


खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, मुंबईवर २६/११ वेळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून अद्याप देश सावरलेला नाही. इतका मोठा हल्ला झाला ज्यात शेकडो निरपराध नागरिकांचे बळी गेले. याबाबत संवदेना न दाखवता महाराष्ट्राचे तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री बॉलिवुडच्या कलाकारांना घेऊन ताज हॉटेलमध्ये गेले होते, हा संपूर्ण देशासाठी लाज आणणारा क्षण होता, अशी टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली. दहशतवाद रोखण्यास काँग्रेस पूर्णपणे अपयशी ठरली. मात्र आज देश एका मजबूत नेतृत्वाच्या हातात आहे. त्यामुळेच मागील १० वर्षात महाराष्ट्रात एकही दहशतवादी हल्ला झाला नाही, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.


डॉ. शिंदे पुढे म्हणाले की, ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून केंद्र सरकारने पहलगाम हल्ल्यातील पिडितांना न्याय देण्याचे काम केले. केंद्र सरकार दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देत आहे. पहलगाम हल्ल्यात कल्याण मतदार संघातील तीन निर्दोश नागरिकांना जीव गमवावा लागला. त्यांच्या कुटुंबियांना आज न्याय मिळाला, मात्र २००६ मध्ये मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या १२७ नागरिकांचे कुटुंबिय आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत, कारण या हल्ल्यातील आरोपी निर्दोष सुटले. काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे पिडित कुटुंबियांना न्याय मिळाला नाही, अशी घणाघाती टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपीने उबाठा पक्षाच्या एका उमेदवाराचा प्रचार केला होता, ते कुठल्या तोंडाने सरकारला जाब विचारतात, अशी टीका खासदार डॉ. शिंदे यांनी उबाठा गटावर केली.


खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, भाजप सरकारने लागू केलेला पोटा कायदा काँग्रेसने रद्द केला. हा कायदा रद्द् झाल्यानंतर देशात दहशतवादी हल्ले वाढले. भोपाळ गॅस दुर्घटनेतील मुख्य आरोपीला परदेशी पलायन करण्यास काँग्रेस सरकारनेच मदत केली. संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरुबाबत काँग्रेसला सहानुभूती होती, मात्र प्रणव मुखर्जी राष्ट्रपती झाले तेव्हा हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुखर्जींकडे मागणी केल्यानंतर अफजल गुरुला फाशी देण्यात आली. मुंबई हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री ताज हॉटेलमध्ये बॉलिवुड कलाकारांना घेऊन गेले. तसेच तत्कालीन गृहमंत्र्यांनी मोठ्या शहरात अशा छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळचे केंद्रीय गृहमंत्री दिवसाला तीन तीनवेळा कपडे बदलण्यात मग्न होते, अशी खरमरीत टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली.

Comments
Add Comment

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय