Ajit Pawar : "कोकाटे, तुमच्यामुळे सरकारची बदनामी..." उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कृषिमंत्री कोकाटेंचे टोचले कान

  65

मुंबई : राज्याचं पावसाळी अधिवेशन चालू असताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा सभागृहात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावरुन सुरु झालेला वाद अजूनही संपलेला नाही. माणिकराव कोकाटे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भेटीसाठी आले आहेत. माणिकराव कोकाटे यांना कृषीमंत्री पदावरुन हटवणार की त्यांना अभय मिळणार? अशी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. माणिकराव कोकाटे वादात सापडण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधीसुद्धा माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्यांच्या सपाटात सापडले आहेत, यावेळी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती. आज अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अँटी चेंबरमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. अँटी चेंबरमध्ये झालेल्या चर्चेवेळी अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांची खरडपट्टी काढल्याचे समजते.



"बोलताना आपण भान ठेवायला हवं"


माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळातून हटवण्याऐवजी त्यांना समज द्या, करावाई नको, असा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचं म्हणणं आहे. मात्र अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना स्पष्टपणे नाराजी बोलून दाखवली. "कोकाटे तुमच्यामुळे सरकारची बदनामी होत आहे. बोलताना आपण भान ठेवायला हवं", असे अजित पवार यांनी कोकाटे यांना म्हटल्याचे समजते. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी झाल्या प्रकाराबद्दल अजित पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. पुढील काळात अशा बाबी घडणार नाही, असे आश्वासनही दिले. यानंतर थोडीफार जुजबी चर्चा होऊन अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यातील बैठक संपली. यानंतर अजित पवारांच्या दालनात प्री-कॅबिनेट बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांच्या दालनात जमले आहेत. आता थोड्याचवेळात अजित पवार हे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय जाहीर करु शकतात.



'आता हा विषय माझ्या हातात नाही’


माणिकराव कोकाटे यांच्या कृषीमंत्रिपदाची राजीनामा घेऊ नये, अशी मागणी घेऊन नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे काही कार्यकर्ते मंत्रालयात आले होते. या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले.“कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे उत्तम कृषिमंत्री आहेत, त्यामुळे त्यांचा राजीनामा घेऊ नका,” अशी भूमिका या शिष्टमंडळाने मांडली होती. मात्र, यावर अजित पवारांनी ‘हा विषय आता माझ्या हातात नाही’ असं उत्तर दिलं. यामुळे कोकाटेंचे मंत्रिपद धोक्यात असल्याचे बोललं जात आहे. अजित पवारांनी कोकाटेंना बैठकीत चांगलच झापल्याची चर्चा आहे.



अजित पवार काय म्हणाले?


“कोकाटे, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होत आहे. बोलताना आपण भान ठेवायला हवं,” अशा शब्दांत अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले. “तुमच्या वक्तव्यामुळे सरकारची खूप प्रतिमा मलिन झाली आहे. आम्ही तुम्हाला खूप सांभाळलं आहे. पण हा विषय आता पुढे गेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनीही या संदर्भात माझ्याकडे नाराजी व्यक्त केली आहे,” असे सांगत अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.


Comments
Add Comment

मध्य रेल्वे मुख्य व ट्रान्सहार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नाही

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामार्फत येत्या रविवारी मुख्य व ट्रान्सहार्बर उपनगरीय विभागांवर विविध

बाळासाहेबांचे विचार सोडल्याने तुम्हाला कामगारांनी नाकारले

शिवसेना उपनेते संजय निरुपम यांची उबाठावर टीका मुंबई : सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार सोडणारे आणि वारंवार भूमिका

प्रभादेवीतील ब्लिंकिटचे बेकायदेशीर 'वेअरहाऊस' बंद!

मुंबई: 'ब्लिंकिट' या 'क्विक-डिलिव्हरी' (quick-delivery) कंपनीने प्रभादेवीतील एका निवासी उंच इमारतीच्या तळघरात चालणारे एक

मुंबईच्या पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा!

मुंबई: 'एन्व्हायर्नमेंट स्टेटस रिपोर्ट' २०२४-२५ नुसार, बीएमसीच्या जल प्रयोगशाळेत केलेल्या तपासण्यांमध्ये असे

'विक्रोळी उड्डाणपुला'ची दुरुस्ती होणार!

मुंबई: 'बृहन्मुंबई महानगरपालिके'च्या पूल विभागाच्या एका पथकाने नुकत्याच उद्घाटित झालेल्या विक्रोळी रेल्वे

करचुकवेगिरी प्रकरणात दोन जणांना अटक ३० कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक

मुंबई : महाराष्ट्र जीएसटी विभागाने देवरा एक्झिम एलएलपी या फर्मचे भागीदार मेहुल जैन व ऑपरेटर कमलेश जैन यांना ३०