संगमनेर : भोजापूर धरण लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे हे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. दरवेळेस ओव्हर फ्लो होत होते, परंतु या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळत नव्हते. पण यंदा या ओव्हरफ्लोचे पाणी जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ पाटिल यांच्या माध्यमातुन तब्बल चाळीस वर्षानंतर नान्नज दुमाला शिवारात आले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत अखेर आमचा गेली ४० वर्षाचा वनवास संपला असल्याच्या भावना व्यक्त केल्या.संगमनेर तालुक्यातील तळेगाव, निमोण या भागातील पळसखेडे, निमोण, पिंपळे, सोनेवाडी, क-हे,सोनोशी,नान्नज दुमाला, धनगरवाडा व तीगाव माथा या दुष्काळी गावांचे भवितव्य या भोजापुर धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. या पुरचारीला पाणी यावे यासाठी या परिसराचे शेतकरी नेते आणि पूरचारीचे अभ्यासक किसन चत्तर यांनी सातत्याने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. कुठल्याही परिस्थितीत या भोजापुर चारीचे पाणी या भागातील शेतकऱ्यांना आपण मिळवून देणारच असे वचन आ. खताळ यांनी वरील गावातील शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिले होते. काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आले आहे. यावर्षी भोजापुर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सर्वप्रथमच ओव्हरफ्लोचे पाणी पुरचारीला सोडण्यात आले अन् हे पाणी नान्नज दुमाला शिवारा मध्ये आले आहे. हे पाणी पाहून या भागातील शेतकऱ्यांनी आमच्या अनेक पिढ्या खपल्या परंतु पाणी आले नाही. मात्र या भागातील शेतकरी नेते किसन चत्तर व इतर शेतकऱ्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पा. आणि आमदार अमोल खताळ पा. यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आमदार खताळ यांनी जलसंपदामंत्री विखे पाटील यांच्याकडे आग्रह धरला होता. त्यानंतर जलसंपदा विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मंत्री विखे यांनी ही भोजापुर चारी जलसंधारण विभागाकडून काढून जलसंपदा विभागाकडे वर्ग केली अन या पुरचारीचे अपूर्ण राहिलेले काम तात्काळ पूर्ण करा असे सक्त निर्देश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर आमदार अमोल खताळ यांनी जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि शेतकरी यांच्या समवेत सोनूशी येथील गीते वस्तीजवळ समक्ष जाऊन पाहणी करत उर्वरित पुरचारीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार या पूरचारीचे अपूर्ण राहिलेले काम सुरू आहे.चालू वर्षी भोजापुर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे हे पाणी कुठल्याही परिस्थितीत नान्नज दुमाला धनगर वाड्या पर्यंत पोहोचवायचेच आहे. असा निश्चय करून आमदार खताळ व दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत थेट भोजापुर धरणावरून भोजापूर पूरचारीची पाहणी करून अपूर्ण काम तात्काळ पूर्ण करा. तसेच संगमनेरच्या हक्काचे पाणी तुम्हाला द्यावेच लागेल अशा सक्त सूचना दिल्या होत्या.अखेर भोजापुर धरणातील ओव्हर फ्लोचे पाणी नान्नज दुमाला शिवारामध्ये दाखल झाले. पुरचारीला आलेले पाणी पाहून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांनीच आम्हाला या भोजापुर धरणाचे पाणी मिळवून दिले असल्याच्या भावना व्यक्त केल्या.