२२ एप्रिल ते १७ जून दरम्यान मोदी आणि ट्रम्प यांच्यात चर्चा झाली नाही- एस. जयशंकर

  47

ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत सरकारने मांडली बाजू


नवी दिल्ली : पाकिस्ताकडून युद्ध बंदीचा प्रस्ताव आल्यामुळे ऑपरेशन सिंदूर स्थगित करण्यात आले. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कुठलीही चर्चा झाली नसल्याचे परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी लोकसभेत सांगितले.


लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर जोरदार चर्चा झाली. या दरम्यान, प्रथम संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सभागृहाला या ऑपरेशनबद्दल सांगितले, त्यानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही पाकिस्तानचा धागा उलगडला.परराष्ट्र मंत्र्यांनी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीपासून ते पाकिस्तानी दूतावासातील सदस्यांना पर्सन ऑफ नॉन ग्राटा घोषित करण्यापर्यंत सरकारच्या सर्व महत्त्वाच्या पावलांची यादी दिली.सदनात ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले की, 22 एप्रिल ते 17 जून या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही.


दूतावासांना माहिती देण्यासोबतच, माध्यमांमध्ये असेही सांगण्यात आले आहे की भारताला आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्याचा अधिकार असल्याचे केंद्र सरकारने सांगितले.


याबाबत एस.जयशंकर म्हणाले की, पाकिस्तान सुरक्षा परिषदेचा सदस्य आहे, आम्हाला नाही. आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तानबद्दल माहिती दिली. आमची लाल रेषा ओलांडली गेली, त्यानंतर आम्हाला कठोर पावले उचलावी लागली. आम्ही पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड केला. संयुक्त राष्ट्रांच्या 193 सदस्यांपैकी फक्त पाकिस्तानसह 3 देशांनी या ऑपरेशनला विरोध केल्याची माहिती सभागृहाला देण्यात आली. एस जयशंकर म्हणाले की संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. पाकिस्तानने टीआरएफचा बचाव केला होता. गेल्या 7 मे रोजी सकाळी एक संदेश देण्यात आला आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यात आला. आम्ही पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला आणि आम्ही पाकिस्तानला कडक संदेश दिल्याचे जयशंकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे

पाकिस्तानमधून आरडीएक्सने राम मंदिर उडवण्याचा मेसेज; गुन्हा दाखल

बीड : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री राम मंदिर उडवण्याचा मेसेज थेट पाकिस्तानातून बीड जिल्ह्यातील एका तरुणाला

इंडिगोच्या विमानात कानशिलात! पॅनिक अटॅक आलेला तरुण बेपत्ता!

मुंबई : मुंबईहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पॅनिक अटॅकचा