रेडमी नोट 14 एस-ई 5G भारतात लॉन्च

मुंबई : रेडमीने आपला नवा रेडमी नोट 14 एस-ई 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केला आहे. रेडमी नोट 14 एस-ई 5G ची भारतातील किंमत ₹14,999 ठेवण्यात आली आहे. हा फोन 7 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून मी डॉट कॉम आणि फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. बँक ऑफर्सअंतर्गत ₹1,000 पर्यंत सूट मिळू शकते. जुन्या फोनच्या एक्सचेंजवर अतिरिक्त ₹1,000 सूट दिली जाणार आहे.


या फोनमध्ये 6.67 इंच फुल एचडी+ डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 2100 निट्स पर्यंत ब्राइटनेस देण्यात आला आहे. स्क्रीनचे संरक्षण कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 करतो. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स, आणि 5110mAh क्षमतेची बॅटरी हे या फोनचे अन्य ठळक वैशिष्ट्य आहेत. या बॅटरीला 45 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.


कॅमेराच्या बाबतीत, 50MP सोनी LYT600 मुख्य सेन्सर, 8MP अल्ट्रा वाईड आणि 2MP मॅक्रो लेन्स असलेली ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. सेल्फीसाठी 20MP कॅमेरा आहे.


फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7025 प्रोसेसर आणि वर्च्युअल RAM सह एकूण 16GB पर्यंत RAM पर्याय मिळतो. स्टोरेजसाठी 128GB क्षमतेचा एकच व्हेरिएंट सध्या उपलब्ध आहे.


हा स्मार्टफोन खास करून उत्कृष्ट डिस्प्ले, दमदार कॅमेरा आणि पॉवरफुल बॅटरीसह स्वस्तात चांगला परफॉर्मन्स शोधणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतो

Comments
Add Comment

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.

नारळासाठी ४५ रुपयांची फोडणी; आवक घटल्याने मुंबईकरांना भुर्दंड

मुंबई : सण, उत्सव कालावधीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईकरांना सध्या या नारळासाठी ४५ ते ५० रुपये मोजावे

नरिमन पॉइंट ते वसईपर्यंत १० मार्गांवर होणार जलवाहतूक

मुंबई : महामुंबईत १० मार्गांवर जलवाहतूक सुरू होणार आहे. याद्वारे नव्या विमानतळाला चार मार्ग जोडले जाणार आहेत.

काय चाललंय काय ? एका महिन्यात तीन वेळा बंद पडली मोनोरेल

मुंबई : मध्य मुंबई आणि पूर्वेकडील उपनगरे यांना जोडणारी मोनोरेल ही वेगाने आरामदायी प्रवास करण्यासाठी सुरू

महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांनी 'या' भाषेत घेतली शपथ

मुंबई : आचार्य देवव्रत यांनी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी राजभवनात झालेल्या सोहळ्यात राज्यपालपदाची शपथ