मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाली होती अखेरच्या सत्रातही कायम राहिली आहे. जागतिक अस्थिरतेत आणखी वाढ झाल्यामुळे भारतीय व परदेशी गुंतवणुकदारांकडून नकारात्मकता व्यक्त केली गेल्याने बाजारा त घसरण झाली. अखेरच्या सत्रात सेन्सेक्स निर्देशांकात ५७२.०७ अंकाने घसरण झाली असून निफ्टी ५० निर्देशांकात १५६.१० अंकांची घसरण झाल्याने सेन्सेक्स व निफ्टी अनुक्रमे ८०८९१.०२ व २४६८०.९० पातळीवर स्थिरावला आहे.सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्दे शांकात सकाळच्या सत्रापेक्षाही अधिक घसरण झाली. सेन्सेक्स बँक ८४८.९५ अंकाने घसरला असून बँक निफ्टीतही ४४४.०० अंकांची भलीमोठी घसरण झाली आहे. बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.७३%,१.३१% घसरण झाली. एनएसई मिडकॅप, स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ८४%,१.२६% घसरण झाली आहे.सकाळच्या सत्रातील मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये बाजाराच्या तुलनेत समाधानकारक वाढ झाल्याने अखेरच्या सत्रातही वाढ अपेक्षित होती. मात्र घरगुती गुंतवणूकदारांकडून 'सेल ऑफ' अधिक केले असल्या ने मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये दबाव पातळी निर्माण झाली होती ज्यामध्ये अस्थिरता निर्देशांकाचा प्रभाव अंतर्भूत आहे. आज सकाळच्या सुरुवातीच्या कलात वीआयएक्स अस्थिरता निर्देशांक ४% हून अधिक पातळीवर होता जो अखेरच्या सत्रात आणखी वाढत ६. ९८% या महाकाय पातळीवर वाढला ज्याने बाजारात मोठे नुकसान केल्याची शक्यता आहे.
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) यामध्ये फार्मा (०.४३%), एफएमसीजी (०.२८%), हेल्थकेअर (०.०९%) झालेली वाढ वगळता इतर सगळ्या निर्देशांकात घसरण झाली. सर्वाधिक घसरण अखेरच्या सत्रात रिअल्टी (४.०७%), कंज्यूमर ड्युरेब ल्स (०.६८%), मेटल (१.१५%), मिडिया (२.७०%), आयटी(०.७१%) फायनांशियल सर्व्हिसेस (०.६५%) निर्देशांकात झाली.
आज संपूर्ण आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती अस्थिरतच होती. ज्याचा प्रामुख्याने दबाव आशियाई बाजारातील निर्देशांकात झाला. आजच्या बाजारातील सर्वात महत्वाचे घटक म्हणजे भारतीय बड्या आयटी समभागात (Stocks) झालेल्या घसरणीचा फटका गुं तवणूकदारांना बसला. सलग तिसऱ्यांदा बाजारात विशेषतः निफ्टीत घसरण झाल्याने सपोर्ट लेवलहून घसरण्यपासून वाचण्यास बाजार असफल ठरला. खासकरून टीसीएस कंपनीने १२००० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वा तावरण निर्माण झाल्याचे घसरणीनंतर स्पष्ट झाले आहे. स्वतः टीसीएस शेअर देखील १.५९% घसरला होता. याशिवाय इतर विप्रो (३.४७%), इन्फोसिस (०.५३%) समभागात घसरण झाली.
आंतरराष्ट्रीय बाजारातील ट्रम्प यांच्या युरोपियन युनियनसोबत १५% टेरिफ निश्चिती झाल्यामुळे अमेरिकेतील तिन्ही बाजारात गुंतवणूकदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. युएस बाजारातील डाऊ जोन्स (०.१२%), एस अँड पी ५०० (०.४०%), नासडाक (०.२४%) निर्देशांकात वाढ झाली आहे. युरोपियन बाजारात युएस युरोपियन युनियन कराराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. प्रामुख्याने टेरिफ करारातील फार्मा उत्पादनांला वगळण्यात आले असून स्टीलवर ५०% आयात शुल्क आकारले जाणार आहे. या कारणांमु ळे युरोपियन बाजारात संमिश्र प्रतिसाद मिळाला ज्यामध्ये एफटीएसई (०.०७%) घसरण होत असून सीएसी (०.५४%), डीएएक्स (०.२९%) बाजारात वाढ झाली आहे.
आशियाई बाजारातील परिस्थितीही वेगळी नसून जपान युके करार निश्चितीनंतर आता चीन युएस कराराकडे बाजाराचे लक्ष लागल्याने अनिश्चितेचे वातावरण कायम आहे. युएसने १ ऑगस्टपर्यंत टेरिफ अतिरिक्त शुल्क सवलतीतील मुदत संपणार असल्याने युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगामी विधानाकडे बाजार लक्ष ठेवून आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या निर्देशांकात व किंमतीत संध्याकाळपर्यंत घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अहवालानुसार, सोमवारी बँक ऑफ अमेरिकाने इशारा दिला की आणखी घसरण झाल्यास कमोडिटी ट्रेडिंग अॅडव्हायझर्स (CTAs) कडून लक्षणीय स्टॉप-लॉस विक्री होऊ शकते. गेल्या आठवड्यात मौल्यवान धातूवर घसरणीचा दबाव आला आहे, ज्यामुळे ऑटोमेटेड ट्रेडिंग प्रोग्राम्सना पोझिशन्स उघडण्यास भाग पाडण्या ची शक्यता असलेल्या पातळी गाठल्या आहेत.
बँक ऑफ अमेरिकाच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की मध्यम ते दीर्घकालीन ट्रेंड फॉलोअर्स सोन्यात जवळजवळ जास्तीत जास्त लॉन्ग पोझिशन्स आंतरराष्ट्रीय बाजारात राखले जाऊ शकतात. माहितीत नमूद केल्याप्रमाणे सोन्याच्या फ्युचर्सच्या किमती १% ते ३.५% अतिरिक्त घट स्टॉप-लॉससह विक्रीला गती देऊ शकते कारण हे गुंतवणूकदार अल्गोरिथमिक ट्रेडर्स तोटा मर्यादित करण्यासाठी पोझिशन्समधून बाहेर पडतात.' असे म्हटले गेले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या पातळीत डॉलरच्या निर्देशां कात होत असलेल्या वाढीमुळे, तसेच अस्थिरतेतील वाढत असलेल्या सोन्याच्या गुंतवणूकीत मागणीत पुन्हा एकदा घट झाल्याने व युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल या आशेने आज घसरण झाली. सोन्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोल्ड फ्युचर निर्दे शांकात (Gold Futures Index) मध्ये संध्याकाळपर्यंत ०.०३% एवढी किरकोळ वाढ झाली होती. डॉलरच्या तुलनेत रुपयात आज ६ पैशाने वाढ झाली आहे.
कच्च्या तेलाच्या बाबतीत स्थिर किंमतीमुळे बाजारात सकाळपर्यंत घसरण झाली होती. युएस चीनच्या आगामी टेरिफ निश्चितीवर आगामी कच्च्या तेलाच्या सप्लाय चेन वितरणात बदल होऊ शकतो मात्र हे डील होऊ शकते असे दस्तुरखुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगि तल्याने, तसेच अस्थिरतेतील मागणीत झालेल्या घसरणीमुळे कच्चे तेल स्वस्त झाले होते. मात्र संध्याकाळपर्यंत कच्च्या तेलाच्या WTI Futures निर्देशांकातही १.१७% वाढ झाली होती तर Brent Future निर्देशांकात ०.९४% वाढ झाली होती. अखेरच्या सत्रात ति माही निकालाचे पडसादही पडले आहेत. लोढा डेव्हलपर,रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या समाधानकारक तिमाही निकालानंतर घसरण झाली होती. याशिवाय कोटक महिंद्रा बँकेच्या निराशाजनक कामगिरीनंतर बँकेच्या शेअर्समध्ये अखेरीस ७.३४% घसर ण झाली आहे. आज एकूणच जगभरातील परिस्थिती पाहता पुन्हा एकदा वाटचाल अस्थिरतेकडे सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ एसईएमई सोलार (८.८३%), विजया डायग्नोसिस (६.६२%), सीपीसीएल (४.८४%), आधार हाउसिंग फायनान्स (४.०६%), अदानी ग्रीन एनर्जी (२.८७%), श्रीराम फायनान्स (२.८६%), सिप्ला (२.५८%), आयसीआयसीआय बँक (०.७७%), डाबर इंडिया (२.०८%), वरूण बेवरेज (२.०१%), हिरो मोटोकॉर्प (१.४३%), सिमेन्स एनर्जी (१.३३%), एशियन पेटंस (१.००%), टाटा पॉवर (०.९७%), ग्रासीम इंडस्ट्रीज(०.६९%) समभागात झाली.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण कोटक बँक (७.४४%),होम फर्स्ट फायनान्स (७.२५%), लोढा डेव्हलपर (५.९६%), एसबीआय कार्ड (५.७९%), सीडीएसएल (५.६९%),नेटवेब टेक्नॉलॉजी (५.१६%), ओबेरॉय रिअल्टी (४.१८%), झी एंटरटेनमेंट (४.१२%), विप्रो (३.५३%),जेएम फायनांशियल (३.४८%), भारत डायनॅमिक्स (२.१६%),बजाज फायनान्स (३.६४%), पॉवर फायनान्स (२.४०%), जिंदाल स्टील (२.२४%) टीसीएस (१.८०%), एचसीएल टेक्नॉलॉजी (१.६१%), जेल इंडिया (१.५७%) समभागात झाली.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,' भारतीय शेअर बाजाराची सुरुवात आज कमकुवत झाली आणि तो २४७८२ पातळीवर उघडला. सुरुवातीलाच वाढ करण्याचा प्रयत्न झाला होता - दिवसाच्या उच्चांकी २४८८९ पातळीला स्पर्श करत निफ्टीने लवकरच तोल गमावला आणि तो २४६४६ पातळीच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. फार्मा क्षेत्रातील समभागांनी सापेक्ष ताकदीसह काही आधार दिला, तर रिअल्टी, मीडिया, बँका, धातू आणि ग्राह कोपयोगी वस्तू (Consumer Durable Products) संपूर्ण सत्रात दबावाखाली होते.
जुलैमध्ये भारतीय रुपया देखील प्रति अमेरिकन डॉलर ८६.६ च्या आसपास घसरला, जो एका महिन्यातील सर्वात कमी पातळी होता, ज्यामुळे वर्षाच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या वाढीचे प्रमाण कमी झाले. रिझर्व्ह बँकेच्या धोरणात्मक संकेतांबद्दलच्या चिंतेमुळे आणि अमेरिका-भारत व्यापार संबंधांसाठी आव्हानात्मक शक्यतांमुळे हे पाऊल उचलण्यात आले, अधिकाऱ्यांनी १ ऑगस्टच्या अंतिम मुदतीपूर्वी नवीन अंतरिम करार होण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत दिले. कोटक महिंद्रा बँकेच्या पहिल्या तिमाहीतील उ त्पन्न बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमी आल्यानंतर कोटक महिंद्रा बँकेने मोठी घसरण अनुभवली, ६.३% ने घसरण झाली. या आठवड्याच्या अखेरीस येणाऱ्या यूएस फेडरल रिझर्व्ह धोरण निर्णय आणि अमेरिकेतील महत्त्वाच्या नोकऱ्यांच्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर व्यापक व्यापारी भावना सावध होती. डेरिव्हेटिव्ह्ज मार्केटमध्ये, अडव्हान्स-डिकलाइन रेशोने मंदीचा इशारा दिला, कोटकबँक, लोढा, नौक्री, पॉलिसीबीझेडआर आणि कमिन्सइंडमध्ये सर्वाधिक ओपन इंटरेस्ट बिल्डअप दिसून आले.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'सोमवारीच्या सत्रात एफआयआयच्या सततच्या बहिर्गमन आणि आशियाई समवयस्कांकडून आलेल्या नकारात्मक संकेतांमुळे वाढत्या विक्रीच्या दबावामुळे बें चमार्क इक्विटी निर्देशांक कमकुवत स्थितीत संपले. निफ्टी ५० चा प्रारंभ फ्लॅट होता आणि पहिल्या सहामाहीत दिवसाच्या आत अस्थिरतेसह श्रेणीबद्ध राहिला. तथापि, सत्राच्या उत्तरार्धात वाढलेल्या विक्रीमुळे निर्देशांक झपाट्याने खाली आला, ज्यामुळे दिवसाच्या आत २४६८०.९० पातळीच्या नीचांकी पातळीच्या जवळ बंद झाला, ज्यामध्ये १५६.१० अंकांची किंवा ०.६३% ची घसरण झाली. क्षेत्रीयदृष्ट्या, बाजाराची व्याप्ती मोठ्या प्रमाणात नकारात्मक होती, अन्यथा कमकुवत परिस्थितीत फार्मा निर्देशांक हा एकमेव उत्कृष्ट कामगिरी करणारा होता. रिअल्टी समभागांना सर्वाधिक फटका बसला, ४% ने घसरला, त्यानंतर मीडिया पॅकने २.७% सुधारणा केली. भांडवली वस्तू, धातू, दूरसंचार, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि खाजगी बँकिंग काउंटरवर व्यापक दबाव दिसून आला, प्रत्ये क १-१.५% दरम्यान घसरला. व्यापक बाजाराच्या आघाडीवर, मंदीचा भाव कायम राहिला, कारण निफ्टी मिडकॅप १०० आणि निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांकांनी त्यांची घसरण वाढवली आणि अनुक्रमे ०.८४% आणि १.२६% ने घसरण नोंदवली, जे बाजार भांडव लीकरणात सतत जोखीम टाळण्याचे प्रतिबिंबित करते.'
आजच्या बाजारातील निफ्टीतील हालचालीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने आहे की,' दैनिक कालावधीत निर्देशांकाने सलग तिसऱ्यांदा बेअर कॅन्डल (Bearish Candle) तयार केले, ज्यामध्ये कमी उच्च आणि कमी कमी पातळीने वाढीव घसर ण दर्शविली. शुक्रवारीच्या सत्रात ५० दिवसांच्या EMA(Exponential Moving Average EMA) पातळीच्या खाली ब्रेक झाल्यानंतर निर्देशांकात घसरण वाढली. जोपर्यंत निर्देशांक कमी उच्च आणि कमी पातळी बनवत आहे तोपर्यंत तात्काळ पूर्वाग्रह खालीच राहतो, त्यानंतर येणाऱ्या सत्रांमध्ये २४५००-२४४०० पातळींकडे आणखी घसरण सुरू होईल. २४५००-२४४०० झोनमध्ये प्रमुख आधार दिसून येत आहे, जो गेल्या महिन्याच्या नीचांकी, १०० दिवसांच्या EMA आणि २३९३५ वरून २५६६९ पर्यंतच्या अलीकडील च ढाईच्या प्रमुख फिबोनाची रिट्रेसमेंटशी जुळतो.'
आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने आहे की,' बँक निफ्टीने एक लांब वरच्या सावलीसह बेअर कॅन्डल तयार केले ज्याने खालच्या उच्च आणि खालच्या निम्न पातळी राखल्या आणि सलग तिसऱ्या सत्रात सुधारात्मक घ सरणीची सातत्य दर्शविली.निर्देशांक ५६२००-५६३०० पातळीच्या तात्काळ समर्थन क्षेत्राच्या खाली बंद झाला, गेल्या दोन आठवड्यांतील जवळजवळ समान नीचांकी पातळी. पुढील कमकुवतपणामुळे येत्या सत्रांमध्ये ५५५०० पातळीकडे आणखी घसरण होईल. ५५५००-५५००० क्षेत्र (Zone) हा एक महत्त्वाचा आधार क्षेत्र आहे, कारण तो १००-दिवसांच्या EMA आणि महत्त्वाच्या फिबोनाची रिट्रेसमेंट पातळींशी जुळतो. हा संगम त्याला नकारात्मक बाजूवर एक महत्त्वपूर्ण मागणी क्लस्टर म्हणून बळकटी देतो.'
आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,' गेल्या आठवड्यात डॉलर निर्देशांकातील मजबूतीमुळे वाढ मर्यादित राहिल्याने कॉमेक्समध्ये सोन्याचा भाव सकारा त्मक पण स्थिर रेंजमध्ये व्यवहार झाला. येत्या आठवड्यात अमेरिकेसोबत १ ऑगस्टच्या व्यापार कराराची अंतिम मुदत आणि प्रमुख अमेरिकन आर्थिक डेटा - एडीपी नॉन-फार्म एम्प्लॉयमेंट एक्सचेंज (Non Farm Employment Exchange)नॉन-फार्म पेरोल्स, बेरोजगारी दर, जीडीपी आणि फेडरल रिझर्व्हचा धोरणात्मक निर्णय यासह प्रमुख जागतिक ट्रिगर्ससह अत्यंत अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे. या महत्त्वाच्या घटना लक्षात घेता, सोन्याच्या किमती ९७०००-९८६५० रूपयांच्या विस्तृत रेंजमध्ये चढ-उतार होण्याची श क्यता आहे.'
आजच्या बाजारातील रूपयांच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,'भांडवल बाजारातील कमकुवतपणामुळे भावनेवर परिणाम झाला. पुढील आठवडा ०.१०% ने घसरून ८६.६५ वर बंद झाला. १ ऑगस्ट रोजी अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराची अंतिम मुदत, तसेच अमेरिकेतील प्रमुख डेटा रिलीझ - एडीपी नॉन-फार्म एम्प्लॉयमेंट चेंज, नॉन-फार्म पेरोल्स, बेरोजगारी दर, जीडीपी आणि फेडरल रिझर्व्हचा धोरणात्मक निर्णय यासह प्रमुख जाग तिक घटकांसह पुढील आठवडा अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे. रुपया ८६.२५-८६.९० च्या श्रेणीत व्यापार करण्याची शक्यता आहे.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की,'पहिल्या तिमाहीतील निराशाजनक कामगिरी, भारत-अमेरिका व्यापार करारातील विलंब आणि सततच्या एफआयआ य बहिर्गमनामुळे (Outflow) देशांतर्गत बाजारातील भावना सावध राहिली आहे. याउलट, जागतिक बाजारपेठा मोठ्या प्रमाणात सकारात्मक आहेत, ज्यांना अमेरिका-ईयू व्यापार घडामोडींचा पाठिंबा आहे ज्या अपेक्षेपेक्षा कमी चिंताजनक मानल्या जातात. फेड आणि बीओ जेचे (Bank of Japan BOJ) आगामी चलनविषयक धोरण निर्णय, देशांतर्गत तिमाही उत्पन्नाच्या मार्गासह, नजीकच्या काळात बाजाराची दिशा निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील अशी अपेक्षा आहे.'
यामुळे आजच्या बाजारातील परिस्थितीचा आढावा घेताना लक्षात येते की बाजारातील कमकुवत स्थितीचा फटका मोठ्या प्रमाणात सामान्य गुंतवणूकदारांना बसत आहे. विशेषतः मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये झालेल्या घसरणीबरोबर तिमाही निकालांच्या आधारावर बहुतांश ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्येही होणारी घसरण निर्देशांकात परावर्तित होत आहे. उद्याही युएस आधारित घडामोडी, तसेच क्षेत्रीय निर्देशांकातील तिमाही आधारित कामगिरी यावर उद्याच्या बाजाराचे भविष्य अवलंबून असेल.