मोहित सोमण: लोढा डेव्हलपर व रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या दोन्ही कंपनीच्या शेअर्समध्ये दुपारपर्यंत मोठी घसरण झाली आहे. अखेरच्या अपडेटनुसार, लोढा कंपनीच्या शेअर्समध्ये दुपारपर्यंत ५.१२% व रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड शेअर्समध्ये दुपारपर्यंत ५.०२% घसरण झाली आहे. प्रामुख्याने ही घसरण दोन्ही कंपन्यांच्या चांगल्या तिमाही निकालानंतरही झाली आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर शेअर्समध्ये झालेली घसरण ही ईडीने विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यानंतर झाली होती. तर विश्लेषकांच्या मते लोढा डेव्हलपर शेअर्समध्ये झालेली घसरण ही निफ्टीतील क्षेत्रीय विशेष रियल्टी (२.७४%) घसरण झाल्याने झाली असल्याचे विश्लेषकांंनी म्हटले आहे. त्यांच्या मते गुंतवणूकदारांनी लोढा डेव्हलपर समभागात नफा बुकिंग (Profit Booking) केली असल्याची शक्यता व्यक्त केली ज्यामुळे ही घसरण झाली.
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड -
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने आपला चांगला सकारात्मक तिमाही निकाल जाहीर केला होता. कंपनीच्या एकत्रित ऑपरेटिंग खर्चात (Total Operating Expenses) मात्र ४२१६.४२ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत वाढ होत ४३३५.७५ कोटींवर गेला आहे. कं पनीच्या ऑपरेटिंग नफ्यात मागील वर्षीच्या तिमाहीतील ४१५.६८ कोटींवरुन वाढत या तिमाहीत १९३१.३१% वाढ झाल्याने नफा ८४४३.७६ कोटींवर गेला आहे.कंपनीच्या एकत्रित महसूलात (Consolidated Revenue) मागील वर्षाच्या तिमाहीतील ४६३२.१० को टींच्या तुलनेत घसरण होत यंदाच्या तिमाहीत ४१०८.०१ कोटींवर महसूल गेला आहे. कंपनीच्या नफ्यात मागील तिमाहीतील २३३.७४ कोटींच्या नुकसानाच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीला ५९.८४ कोटीवर नफा मिळाला. कामकाजातून मिळालेल्या महसूलात (Re venue from Operations) मध्ये मागील वर्षाच्या तिमाहीतील इयर ऑन इयर बेसिसवर १७.८६ % घट झाली.
लोढा डेव्हलपर्स लिमिटेड -
लोढा डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीने एकत्रित निव्वळ नफा (Consolidated Net Profit) मागील वर्षाच्या तिमाहीतील ४७५.९ कोटींच्या तुलनेत वाढवत या तिमाहीत ६७५.१ कोटीवर मिळवला आहे. कंपनीच्या एकूण उत्पन्नातही इयर ऑन इयर बेसिसवर २९१८.३ कोटींवरुन ३६२४.७ कोटीवर वाढ झाली आहे. सकाळपासून रिअल्टी समभागात मोठी घसरण झाली होती. सकाळच्या सत्रात सुरूवातीलाच दोन टक्क्यांहून अधिक घसरण या क्षेत्रीय निर्देशांकात झाली होती. लोढा डेव्हलपर सह ब्रिगेड एंटरप्राईजेस (३.३%), गो दरेज प्रॉपर्टी (३.६%), डीएलएफ (४.३%) सारख्या नावाजलेल्या शेअर्समध्ये घसरण झाली होती. दुपारी २.४० वाजेपर्यंत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्समध्ये ४.७४%, व लोढा डेव्हलपर कंपनीच्या शेअर्समध्ये ५.१७% घसरण झाली आहे.