नवी दिल्ली : अखेर एका आठवड्याच्या गदारोळानंतर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज 'ऑपरेशन सिंदूर' आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर चर्चेला दणक्यात सुरुवात झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत चर्चेला सुरुवात करत, भारतीय लष्कराच्या शौर्याचे कौतुक केले आणि या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी व त्यांचे सूत्रधार मारले गेल्याची माहिती दिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भात आज संसदेत महत्त्वाची माहिती दिली. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून अनेकदा ऑपरेशन सिंदूर संदर्भात चर्चेची मागणी करण्यात आली. संसदेच विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी झाली. आज सकाळी संसेदत मोठा गदारोळ पहायला मिळाला. त्यामुळे सुरुवातीला कामकाज तहकूब करावं लागलं. दुपारनंतर राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भात प्रश्नांची उत्तर दिली. राजनाथ सिंह म्हणाले की, “कुठल्याही देशात जनता सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवते. सत्ताधाऱ्यांच काम असतं जनतेच हित ध्यानात ठेऊन काम करणं आणि विरोधी पक्षांच काम असतं सरकारला जनतेशी संबंधित मुद्दे, प्रश्न विचारणं” अशातच देश की सेना शेर है, अशा शब्दात सिंह यांनी लष्कराचे कौतूकसुद्धा केले. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीचा दावाही त्यांनी फेटाळला.
आज सुद्धा मी माहिती देतोय. “ऑपरेशन सिंदूर का सुरु केलं? याची माहिती याआधी सुद्धा दिली आहे. कधी कधी विरोधी पक्षाचे लोक विचारतात की, त्यांनी किती विमानं पाडली? मला असं वाटतं की, त्यांचा हा प्रश्न राष्ट्रीय जनभावनेच प्रतिनिधीत्व करत नाही. त्यांनी एकदाही असं विचारलं नाही की, आपल्या सैन्याने शत्रूची किती विमानं पाडली. त्यांना प्रश्न विचारायचा असेल, तर त्यांनी विचारावं की, भारताने दहशतवादी धुळीस मिळवले का? तर त्याचं उत्तर हो आहे” असं राजनाथ सिंह म्हणाले.
बहिणींच सिंदूर मिटवलं, त्यांचं काय झालं?
“मी विरोधी पक्षाच्या सन्मानित सदस्यांना सांगू इच्छितो की, ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं का? त्याचं उत्तर हो आहे. तुम्हाला जर प्रश्न विचारायचा असेल, तर त्यांनी प्रश्न विचारावा की, ज्या दहशतवाद्यांनी बहिणींच सिंदूर मिटवलं, त्यांचं काय झालं? ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्ही त्या दहशतवाद्यांच्या लीडरनाच संपवलं” असं राजनाथ सिंह म्हणाले. प्रश्न विचारायचाच असेल, तर ऑपरेशन सिंदूरमध्ये शूर सैनिकांच काही नुकसान झालं का? त्या बद्दल विचारावं, याच उत्तर आहे नाही, भारतीय सैनिकांच नुकसान झालेलं नाही. लक्ष्य मोठं असेल, तेव्हा छोट्या गोष्टींकडे लक्ष नाही गेलं पाहिजे” असं राजनाथ सिंह म्हणाले.
नवी दिल्ली : आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर गरमागरम चर्चा सुरु झाली आहे. ही सुरुवात होण्यापूर्वीच विरोधकांनी गोंधळ घातलाय. तर या ...
राजनाथ सिंहांचे लोकसभेत निवेदन
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय सशस्त्र दलांच्या पराक्रमाचे कौतुक करत पाकिस्तानलाही खडे बोल सुनावले. प्रत्युत्तराची कारवाई: "पहलगाम हल्ल्यानंतर लगेचच आपल्या सशस्त्र दलांनी कारवाई केली. दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांवर (इन्फ्रास्ट्रक्चर साईट्स) अचूक हल्ले चढवण्यात आले, ज्यात १०० हून अधिक दहशतवादी, त्यांचे प्रशिक्षक आणि सूत्रधार (हँडलर्स) लक्ष्य ठरले," असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
ट्रम्प यांचा मध्यस्थीचा दावा फेटाळला
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या दाव्यालाही राजनाथ सिंह यांनी फेटाळून लावले. "'ऑपरेशन सिंदूर' थांबवण्यासाठी भारतावर कोणताही आंतरराष्ट्रीय दबाव नव्हता," असे त्यांनी नमूद केले.