एस.टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू : मंत्री छगन भुजबळ

नाशिक : सेवा शक्ती संघर्ष एस.टी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनानिमित्त राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात राज्यस्तरीय कामगार मेळावा पार पडला. या मेळाव्यात एस.टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू . त्यांना योग्य वेतन आणि आरोग्य सेवा देऊ , असे भुजबळ यांनी आश्वासन दिले .


या कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, लक्ष्मण सावजी, यतीन कदम, गिरीश पालवे, सुधाकर बडगुजर, सतीश मेटकरी, भाऊलाल तांबडे, व्यंकटेश मोरे, पद्मश्री राजे, अनुप खैरनार, राहुल आरोटे यांच्यासह सेवा शक्ती संघर्ष एस.टी कर्मचारी संघाचे पदाधिकारी व एसटी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.


यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, 'गोर गरीब कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपण कुणालाही अंगावर घेण्यासाठी तयार आहोत.या लढ्यात आपण एसटी कर्मचारी संघटनेच्या सोबत असून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघटनेचे पदाधिकारी, मंत्रिमंडळातील सहकारी यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील'



एसटी सामान्यांच्या सेवेसाठी


भुजबळ पुढे म्हणाले की, जगातील कुठेलीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही फायद्यात नाही. एसटी म्हणजे एक लोकसेवा आहे. गोर गरिबांची सेवा करण्यासाठी ती महत्वाची वाहिनी आहे त्यामुळे ही सेवा संस्था असून या ती फायद्यात कधी येईल याची वाट पाहत बसता येणार नाही. आवश्यक त्या तरतुदी एसटीसाठी कराव्याच लागणार आहेत.


एसटी कर्मचारी कामाच्या अत्यंत अवघड परिस्थितीतही, खडतर हवामानात, अपुऱ्या सोयींमध्ये ही सेवा अखंड सुरू ठेवण्याचे काम करत आहे या सर्वांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. त्यांना चांगल्या बसेस उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सेवेच्या दृष्टीने देखील नियोजन करण्याची आवश्यकता आहे. कर्मचाऱ्यांना योग्य ते वेतन मिळालेच पाहिजे. यासाठी विधिमंडळात आणि मंत्रिमंडळात देखील याबाबत बोलून हे प्रश्न मार्गी लावले जातील असे आवाहन त्यांनी केले .

Comments
Add Comment

जयपूर SMS हॉस्पिटलच्या ICU मध्ये भीषण आग, ६ रुग्णांचा मृत्यू

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूर येथील सवाई मानसिंह (SMS) हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरच्या न्यूरो आयसीयू (ICU)

नवरात्र काळात महालक्ष्मी मंदिरास ५७.१९ लाख रुपयांचे दान

थेट देणगीद्वारे १८ लाख, तर लाडू विक्रीतून १७ लाख रुपये कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री

लाडकी बहीण योजना सुरूच राहणार - एकनाथ शिंदे

शिवसेनेतर्फे बुथप्रमुख कार्यशाळा, पदाधिकारी बैठक नाशिक : लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार असून बहिणींच्या

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

अरबाज खान झाला बाबा, पत्नी शुरा खानने दिला मुलीला जन्म

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी शूरा खान यांना रविवारी मुलगी झाली. ५८ व्या वर्षी अरबाज

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या