IND vs ENG: ५५ वर्षांनी घडले असे काही...केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी मिळून बनवला हा रेकॉर्ड

मुंबई: शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी भारत-इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी १७४ धावांची भागीदारी करत भारताला अडचणीत असताना सांभाळले. कारण ३११ धावांची आघाडी घेतलेल्या इंग्लंडने भारताचे २ विकेट पहिल्या षटकांतच मिळवले होते. राहुल आणि गिल यांनी मिळून असे काही केले की जे गेल्या ५५वर्षात घडले नाही.

केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी इंग्लंडविरुद्ध खेळवल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियानुसार ५५ वर्षांपूर्वी असे पाहायला मिळाले होते की परदेशी दौऱ्यावर एका कसोटी मालिकेत दोन फलंदाजांनी ५००हून अधिक धावा केल्यात. १९७०-७१मध्ये सुनील गावस्कर आणि दिलीप सरदेसाई यांनी अशी कामगिरी केली होती.

पहिल्या डावात ३११ धावांनी पिछाडलेल्या टीम इंडियाची सुरूवात खराब राहिली. क्रिस वोक्सने पहिल्याच षटकांत चौथ्या बॉलवर यशस्वी जायसवाल आणि पाचव्या बॉलवर साई सुदर्शनला बाद केले होते. मात्र यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत राहुल आणि गिल यांनी विकेट वाचवून ठेवली.

केएल राहुलने २१० चेंडूचा सामना करताना ८७ धावा केल्या. गिलने १६७ चेंडूचा सामना करताना ७८ धावा केल्या. दोघेही आज आपले शतक पूर्ण करू शकतात. भारत आता हा सामना जिंकू शकत नाहीत. मात्र पराभवापासून बचावासाठी त्यांना चांगली फलंदाजी करावीच लागेल.
Comments
Add Comment

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण

सिडनी ODI मध्ये ऑस्ट्रेलिया ऑलआऊट

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका ऑस्ट्रेलियाने आधीच २ - ०

ऑस्ट्रेलियाच्या भारताविरुद्धच्या एकदिवसीय टी-२० संघात मोठे फेरबदल! ग्लेन मॅक्सवेल आणि बेन ड्वार्शुइस अखेरच्या टप्प्यात संघात परतणार

मुंबई: भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेसह आगामी टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात अनेक