मँचेस्टर: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवलेला चौथा कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात भारताला यश आले आहे. मात्र हा सामना भारतासाठी अनेक बाबतीत ऐतिहासिक ठरला आहे. इंग्लंडने पहिल्या डावात ६६९ धावा केल्यानंतरही भारतासमोर ३११ धावांचे आव्हान ठेवले होते. याच्या प्रत्युत्तरात उतरलेल्या भारतीय संघाला पहिल्याच षटकात दोन झटके बसले होते. अशातच भारतासमोर पराभवाचे ढग घोंगावत होते. मात्र केएल राहुल आणि गिल यांच्यातील १८८ धावांची भागीदारी आणि त्यानंतर जडेजा आणि सुंदर यांच्यातील झुंजार खेळीने इंग्लंडच्या नाकात दम आणला.
पाचव्या आणि शेवटचा दिवस संपेपर्यंत भारताने ४ विकेट गमावत ४२५ धावा केल्या होत्या. रवींद्र जडेजाने नाबाद १०७ धावा केल्या होत्या. तर सुंदरने १०१ धावांची खेळी केली. या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात ६६९ धावा केल्या होत्या. यजमान इंग्लंडवर भारताने ३११ धावांची आघाडी केली होती. याआधी भारतीय संघ पहिल्या डावात केवळ ३५८ धावाच करू शकली होती. दरम्यान, ड्रॉनंतर भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-२ अशा पिछाडीवर आहे. दरम्यान, इंग्लंडचे कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न स्वप्नच राहील कारण ५व्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला तर मालिका बरोबरीत संपेल.
असा होता भारताचा दुसरा डाव
भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाची सुरूवात खराब राहिली. त्यांचे पहिले दोन विकेट पहिल्याच षटकात पडले. सलामीवीर यशस्वी जायसवाल आणि साई सुदर्शन खाते न खोलताच बाद झाले. दोघेही फलंदाज क्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर बाद झाले. दोन विकेट पडल्यानंतर केएल राहुल आणि कर्णधार शुभमन गिल यांनी भारतीय संघाला सांभाळले. शुभमन गिलने शतक ठोकले तर केएल राहुल शतकापासून वंचित राहिला. हे दोघेही बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा आणि वॉशिंगटन सुंदर यांची जोडी मैदानावर जमली. या दोघांमध्ये कमालीची भागीदारी झाली आणि त्यांनी भारतीय संघाला पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढले.