...म्हणून हरिद्वारच्या मनसा मंदिरात चेंगराचेंगरी


हरिद्वार : उत्तराखंडमधील हरिद्वारच्या मनसा मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला. दर्शनासाठी भाविकांची मंदिराच्या आवारात आणि पायऱ्यांवर गर्दी झाली होती. रांग हळू हळू पुढे सरकत होती. याच सुमारास विजेची तार तुटल्याची अफवा पसरली आणि चेंगराचेंगरी झाली. 'करंटवाली तार सीढियोंपर गिरी है' असं ओरडत कोणीतरी आलं आणि चेंगराचेंगरी सुरू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला आणि २८ जण जखमी झाले. जखमींमध्ये आठ महिला आणि सात मुले आहेत. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.


मंदिराच्या इमारतीत जाण्या - येण्यासाठी एकच मार्ग आहे. या मार्गावरुन चालत ये - जा करावी लागते. यामुळे त्याच मार्गावर चेंगराचेंगरी सुरू झाल्यावर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. अफवा पसरली आणि प्रत्येकजण स्वतःला वाचवण्यासाठी मिळेल त्या वाटेने धावत सुटले. यामुळे गोंधळ झाला, चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला आणि २८ जण जखमी झाले. मृतांमध्ये आणि जखमींमध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि बिहारचे नागरिक आहेत.


सर्व जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रशासनाने चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशीचे निर्देश दिले आहेत. सीसीटीव्ही फूटेज आणि प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती याआधारे तपास सुरू आहे. अफवा कोणी पसरवली याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दोषींवर कारवाई केली जाणार आहे.


न्यायदंडाधिकारी चौकशी करणार


चेंगराचेंगरी प्रकरणी न्यायदंडाधिकारी चौकशी करतील. अहवाल आला की दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले. चेंगराचेंगरीतील मृतांच्या नातलगांना नियमानुसार प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल; असेही उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले.


Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीसह देशातील वीस मुलांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’

नवी दिल्ली : वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील वीस मुलांना

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कारची डीएसपींना धडक

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे एक धक्कादायक घटना घडली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यातील एका

राष्ट्रपती मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार आहेत. नियोजीत कार्यक्रमानुसार राष्ट्रपती

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले