उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्व. मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण

  47

रत्नागिरी : खेड नगरपरिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या स्व. मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र नूतनीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला.


हा सोहळा शिवसेना नेते व मंत्री रामदास कदम यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रम म्हणून आयोजित करण्यात आला होता. जनतेच्या सेवेत कायम राहिलेल्या या कुटुंबाच्या सामाजिक-राजकीय योगदानाचा भाग म्हणून, या अद्ययावत सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन या विशेष दिवशी झाल्यामुळे कार्यक्रमास अधिकच महत्त्व प्राप्त झाले.


योगेश कदम यांनी आपल्या भाषणात म्हणाले, १५ वर्षे बंद असलेल्या या नाट्यगृहासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुढाकाराने तब्बल १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यामुळे हे नाट्यगृह मुंबईतील कोणत्याही रंगमंचाला टक्कर देईल अशा भव्य स्वरूपात उभे राहिले आहे. ग्रामीण भागात असे अद्ययावत नाट्यगृह उभे राहणे ही लोकांसाठी आणि कलाकारांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.


माझ्या कामावर माझा विश्वास आहे आणि माझ्या नेत्यांचा माझ्यावर विश्वास आहे. मी कधीही चुकीचं काम केलं नाही आणि भविष्यातही करणार नाही. रामदासभाईंच्या तीन दशकांहून अधिक कारकिर्दीत एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. त्यांच्या पवलांवर पाऊल ठेवून मी ठामपणे सांगतो की, माझ्या हातून एकही काळं काम झालेलं नाही आणि होणारही नाही. असंही ते म्हणाले .


रामदास कदम यांनी आपल्या भाषणात भावनिक भाष्य करत म्हटलं मुंबईतील नाट्यगृहालाही लाजवेल इतकं छान नाट्यगृह बनवणारा माझा मुलगा…
कभी कभी बाप से भी बेटा सवाई होता है.
आमच्या उभ्या आयुष्यात डाग लावून घेतला नाही. डान्स बार चालवणारी आमची अवलाद नाही. आम्ही लोकांचे संसार उध्वस्त करत नाही, उभे करतो.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यमंत्री कदम यांची ठाम पाठराखण करत ठाम शब्दांत सांगितले,“शिवसेनेच्या वाटचालीचं प्रतीक म्हणजे हे नाट्यगृह. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि माँ साहेब यांचा वारसा या माध्यमातून जपला जातो आहे.” योगेश कदम यांनी चिंता करण्याची गरज नाही. संपूर्ण शिवसेना, आणि मी स्वतः, त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत. योगेश काम करणारा कार्यकर्ता आहे. टीका करून काम थांबत नाही. राजीनाम्याची मागणी करणं चुकीचं आहे. जे स्वतः दरोडेखोर आहेत, ते इतरांना चोर म्हणत आहेत…हे कसं चालेल?


आपल्या कामाचा फोकस विकासावर आहे, आणि आपण त्यावरच भर दिला पाहिजे. “आरोपांच्या कोणी करो कुरापती… योगेश आणि सिद्धेशच्या जोडीने
रामदास कदम करतील त्यांची माती…”


उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणात राज्यमंत्री योगेश कदम यांचे कौतुक केले. ते म्हणाले सध्या सर्वात चांगली युवा पिढी योगेश कदम यांच्या मागे आहे. ते विकास, शिस्त आणि जनतेशी नाळ जपणारे खरे जनतेचे नेतृत्व आहेत.


या भव्य लोकार्पण सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री भरत गोगावले, रामदास कदम, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार अशोक पाटील, माजी आमदार संजय कदम, शशिकांत चव्हाण, जिल्हाधिकारी महादेव बी. रोडगे हे मान्यवर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उत्साहात उपस्थित होते.

Comments
Add Comment

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक

मरेपर्यंत अशा लोकांना समाजात मिळत नाही मान, होतो सतत अपमान

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी आपल्या 'चाणक्य नीती'मध्ये जीवनातील अनेक पैलूंबद्दल मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण