समुद्रात बुडाली बोट, रायगडचे पाचजण नऊ तास पोहून किनाऱ्यावर पोहोचले


उरण : महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेली बोट बुडाली. बोटीत असलेले आठ पैकी पाच मच्छिमार नऊ तास पोहून समुद्र किनाऱ्यावर पोहोचले. इतर तीन मच्छिमार बेपत्ता आहेत. बेपत्ता मच्छिमारांचा शोध सुरू आहे.


पावसाळ्यात समुद्रात मासेमारी करणे टाळतात. राज्य शासनाने समुद्राला उधाण येते म्हणून काही आठवडे सागरी मासेमारीवर बंदी घातली आहे. या बंदीचे उल्लंघन करुन आठ मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊन मासेमारी करण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न मच्छिमारांना भोवला. बोट खोल समुद्रात असताना तुफान वारा आला आणि उंचच उंच लाटा उसळू लागल्या. या प्रतिकूल परिस्थितीत बोट टिकाव धरू शकली नाही आणि बुडाली. बोटीत असलेले आठ पैकी पाच मच्छिमार नऊ तास पोहून समुद्र किनाऱ्यावर पोहोचले. इतर तीन मच्छिमार बेपत्ता आहेत.


बोटीत असलेले सर्व मच्छिमार उरण तालुक्यातील आपटा, करंजा आणि हावरे कोळीवाड्यातील आहेत. बोट उरण येथून अलिबागमधील खांदेरीच्या दिशेने जात असताना बुडाली. बोट बुडाल्यावर पोहत किनारा गाठणाऱ्या पाच जणांना मांडवा पोलिसांनी अलिबाग जिल्हा रुग्णालय येथे दाखल केले आहे. बेपत्ता असलेल्या ३ मच्छिमारांचा शोध सुरू आहे. तटरक्षक दल, स्थानिक बचाव यंत्रणा आणि ड्रोन यांच्या मदतीने बेपत्ता मच्छिमारांचा शोध सुरू आहे.


Comments
Add Comment

Mumbai Mayor : मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचाच! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सध्या मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असला तरी येणारा पुढील महापौर हा शिवसेनेचाच असेल

Kanjurmarg Station Footpath : कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरासह एलबीएसचा मार्गाच्या पदपथ होणार मोकळ्या

तब्बल या परिसरातील १००हून अधिक गाळ्यांवर होणार कारवाई मुंबई विशेष प्रतिनिधी : कांजूरमार्ग रेल्वेथ स्थानक

Cooper Hospital Mumbai : कुपर रुग्णालयात येत्या मार्च पर्यंत मिळणार एमआयसीयू सुविधा

स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात सध्या १०

R Praggnanandhaa : प्रज्ञानंदचा ऐतिहासिक विजय! कारुआनाला नमवत ग्रँड चेस टूरचा पहिला भारतीय चॅम्पियन

भारतीय बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदने गुरुवारी सेंट लुईस येथे फॅबियानो कारुआनाविरुद्ध शानदार पुनरागमन करत ग्रँड

Toxic Movie : रिव्ह्यू देणं पडलं महाग! 'टॉक्सिक'वर नकारात्मक बोलणाऱ्या युट्यूबरची अडचण वाढली; निर्मात्यांच्या एका निर्णयाने सिनेसृष्टीत खळबळ

मुंबई :  कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ हा चित्रपट प्रदर्शित

Delhi Crime: मध्यरात्री थरार! मुस्कानच्या मारेकरी इमरानचा दिल्ली पोलिसांकडून एन्काऊंटर

दिल्ली : दिल्लीतील टिळक नगर परिसरात 21 वर्षीय मॉडेल आणि विद्यार्थिनी मुस्कान हिच्या हत्या प्रकरणात गुरुवारी