‘अटल सेतू’मुळे सरकारच्या तिजोरीत कोट्यवधींची भर

आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास


मुंबई  : अटल सेतू म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) १३ जानेवारी २०२४ पासून सर्वसामान्यांच्या वापरासाठी खुला करण्यात आला. जानेवारी २०२४ पासून आतापर्यंत अटल सेतूवरून तब्बल १.३ कोटींपेक्षा जास्त वाहनांनी प्रवास केला आहे.


अटल सेतूचा सर्वाधिक वापर खासगी वाहनांनी केल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएने दिलेल्या आकडेवारीनुसार, १३ जानेवारी २०२४ ते २४ जुलै २०२५ या कालावधीमध्ये २२ किमी लांबीच्या अटल पुलावरून एकूण १,३१,६३,१७७ वाहनांनी प्रवास केला आहे. त्यापैकी १.२ कोटींपेक्षा जास्त गाड्या या खासगी गाड्या आहेत. अटल सेतूवरील वाहतुकीपैकी ९१ टक्के प्रवास खासगी वाहनांनी झाला आहे.


उर्वरित वाहतुकीमध्ये हलकी वाहने (एलसीव्ही मिनीबस), बस, ट्रक, मल्टी-अॅक्सल वाहने यांच्यासह मोठ्या आकाराच्या वाहनांचा समावेश आहे. एलसीव्ही मिनीबसने अटल सेतूवर १,७१७११ फेऱ्या मारल्या आहेत. २-अ‍ॅक्सल बस आणि ट्रकने २,०२,८६४ फेऱ्या मारल्या आहेत. मध्यम-जड मल्टी-अ‍ॅक्सल वाहनांनी एकत्रितपणे ७,००,९८९ फेऱ्यांचा प्रवास केला आहे. १,५३७ मोठ्या आकाराच्या वाहनांनी अटल सेतूने प्रवास केला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ जानेवारी रोजी अटल सेतूचे उद्घाटन केले होते. एकूण २२ किमी लांबीपैकी ही लिंक १६.५ किमी समुद्रावरुन आणि ५.५ किमी जमिनीवरुन जाते. देशातील सर्वात लांब सागरी लिंक असलेल्या या पुलामुळे मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास एका तासावरून फक्त २० मिनिटांवर आला आहे.

Comments
Add Comment

अंधेरी रेल्वे स्टेशनवरील धर्मांतराचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल ; पोलीस तपासात आली भलतीच माहिती समोर

मुंबई : सोशल मीडियावर अंधेरी रेल्वे स्टेशनवर धर्मांतर सुरु असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजपा, शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग

मुंबई (सचिन धानजी): उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील मुलुंड विधानसभा मतदार हा संघ भाजपाचा

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजप

युतीमध्ये या विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग सचिन धानजी मुंबई : उत्तर पूर्व

मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या विशेष लोकल

मुंबई  : पश्चिम नौदल कमांड (डब्ल्यूएनसी) नेव्ही हाफ मॅरेथॉननिमित्त मध्य रेल्वेने शनिवारी रात्री विशेष लोकल

गृहनिर्माण धोरणात भाडेतत्त्वावरील घरांना प्राधान्य

म्हाडाच्या विकासकांना १०० टक्के मालमत्ता कर माफ' मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हबअंतर्गत म्हाडाने

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी बजावले समन्स! 'त्या' पार्टीत अनेक बॉलीवूड कलाकारांची हजेरी

मुंबई: मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला २५२ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावले आहेत. हे समन्स