छत्रपती संभाजीनगर : शहरातील भीमनगर भागात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीने प्रियकराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मिल कॉर्नर येथील सचिन राजू भिसे या प्रियकराला अटक करण्यात आली असून, त्याला २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती उपनिरीक्षक सचिन गाडेकर यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. शहरातील एका खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या या तरुणीची जानेवारी २०२५ मध्ये त्याच रुग्णालयातील वॉर्डबॉय सचिनसोबत मैत्री झाली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुलीच्या वडिलांनी या लग्नाला विरोध करत तिला सचिनशी संबंध तोडण्यास सांगितले होते.
मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर वाहनांचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विचित्र पद्धतीने वाहने एकमेकांना धडकली आहेत. ...
वडिलांच्या सांगण्यावरून मुलीने सचिनला याची कल्पना दिली. परंतु, सचिनने दुसऱ्या मुलाशी लग्न केल्यास बदनामी करण्याची धमकी देत मुलीकडे आणि तिच्या आईकडे पैशांची मागणी सुरू केली आणि तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, ही मुलगी तिच्या आईसोबत बाहेर गेली होती, परंतु ती रस्त्यातूनच घरी परतली. बराच वेळ खोलीतून बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी आत जाऊन पाहिले असता, तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून सचिनविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.