पालकमंत्री नितेश राणे यांच्या जनता दरबारातून वंचित घटकाला मिळाला न्याय

२०० पेक्षा जास्त तक्रारदारांचे झाले शंका समाधान


वंचित घटकांना न्याय देण्याचा स्तुत्य उपक्रम; जनतेतून समाधान व्यक्त


सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुसूचित जातीसाठी आयोजित ‘समाज संवाद व तक्रार निवारण’ मेळाव्याचे शनिवारी जनता दरबारात रूपांतर झाले. वंचित बहुजन समाजासाठीच्या या जनता दरबारमध्ये २०० पेक्षा जास्त प्रश्न पालकमंत्री नितेश राणे यांच्यासमोर मांडले गेले. अधिकाऱ्यांसमवेत प्रत्येक प्रश्नांवर चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर त्यावर निर्णय घेण्यात आला.काही प्रश्नावर पालकमंत्री नितेश राणे यांनी ऑन द स्पॉट तोडगा काढला, तर काही प्रश्न जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून तर काही प्रश्न राज्य सरकारच्या माध्यमातून सोडवण्यासाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. एकूणच या जनता दरबारातून अपेक्षित असलेला वंचित बहुजन समाजाला न्याय देण्याचा किंवा त्यांचे प्रश्न सोडवण्याचा स्तुत्य हेतू संपन्न झाला.


या दरबारात जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर ,सीईओ रवींद्र खेबुडकर,अति. जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनोज दळवी त्याच प्रमाणे हितकरिणी महासंघाचे जिल्हाध्यक्ष महेश परूळेकर, कार्याध्यक्ष रमाकांत जाधव, जिल्हा संघटक अंकुश जाधव, महासचिव गौतम खुडकर, उपाध्यक्ष प्रभाकर जाधव, वासुदेव जाधव, शंकर जाधव, सत्यवान तेंडोलकर, विनोद कदम, मंगेश गावकर, मधुकर जाधव, चंदू वालवलकर आदी उपस्थित होते. सर्व वंचित घटकासाठी काम करणाऱ्या संघटनांचे प्रतिनिधी ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या जनता दरबारमध्ये सर्वाधिक मागणी गावच्या वाड्या वस्तींचे नामकरण माता रमाबाई आंबेडकर यांच्या नावे करावे, अशी झाली. या संदर्भात जिल्ह्यातील सर्वच मागणी असलेल्या वाड्यांना नाव देण्याच्या सूचना दिल्या. सामाजिक वस्तीगृह, मुलांसाठी शैक्षणिक दाखले याविषयीही अनेक प्रश्न मांडले गेले. काही ठिकाणी दलित वस्त्यांच्या सुधारणांसाठी निधीची आवश्यकता असल्याचेही मागणी यावेळी संघटनांनी केली. याव्यतिरिक्त अनेक जणांनी वैयक्तिक असलेले प्रश्नही पालकमंत्र्यांसमोर मांडले आणि या प्रश्नांवर चर्चा करुन पालकमंत्री नितेश राणे यांनी निर्णय दिले. काही निर्णय गुंतागुंतीचे असल्यामुळे ते सुनावणीसाठी पुढे ठेवले तर काही निर्णय हे जिल्हा प्रशासनाला निकाली काढण्याचे आदेश दिले. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वंचित घटकाला न्याय देण्याचे काम पालकमंत्री नितेश राणे यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून  केले.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Navi Mumbai News : JNPAची जागतिक भरारी, जगातील टॉप-३० कंटेनर बंदरांमध्ये २१वे स्थान; सात स्थानांची झेप

नवी मुंबई : भारताच्या सागरी व्यापारासाठी महत्त्वाची असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीने (JNPA) जागतिक स्तरावर

Foldable iPhone : Appleचा मोठा धमाका! ९ सप्टेंबरला iPhone 18 Proसह पहिला Foldable iPhone होणार लॉन्च ?

Appleने आपल्या आगामी वार्षिक लॉन्च इव्हेंटची तारीख ९ सप्टेंबर निश्चित केली आहे. कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील

Police raid : कर्जत ‘ड्रग्ज’च्या विळख्यात? पोलिसांच्या छाप्याने खळबळ; नायजेरियन नागरिक ताब्यात

रायगड : कर्जत तालुक्यातील हलीवली परिसरातील सिग्नेचर डिझायर इमारतीत अंमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग