पेण तालुक्यात समाधानकारक पाऊस

शहापाडा धरण ओव्हर फ्लो, तर हेटवणे, आंबेघर धरणांची पातळी वाढली


स्वप्नील पाटील


पेण: मागील एक ते दीड महिन्यांपासून पावसाला सुरुवात झाली असून आता या पावसाच्या पाण्यामुळे पेण तालुक्यातील हेटवणे, शहापाडा आणि आंबेघर ती तीनही धरणे भरली आहेत. यातील शहापाडा धरण ओव्हर फ्लो झाला असून हेटवणे आणि आंबेघर धरणांची पातळी वाढली आहे. ही पातळी वाढली असली तरी पेण तालुक्यातील आजूबाजूच्या गावांना सद्यस्थितीला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. याउलट आजमितीला पेण तालुक्यात समाधानकारक पाऊस पडत आहे.


पेण तालुक्यातील शहापाडा धरण ओव्हरफ्लो वाहू लागल्याने याठिकाणी धरणाच्या पायथ्याशी पावसाचा आणि धरणाच्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करत आहेत. तालुक्यातील तीनही धरणांचा विचार करता या तालुक्यात एवढी मोठी धरणे असून देखील येथील खारेपाट भागात उन्हाळ्याच्या हंगामात पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झालेले असते. पैकी आंबेघर धरण हे असे धरण आहे की त्याचे पाणी कोणत्याही कारणासाठी वापरत आणले जात नाही.


पावसाळ्यात तुडुंब भरलेल्या या धरणाचे पाणी असेच वाया जाते. या पाण्याचा कुठेतरी वापर करण्यासाठी तजवीज करावी असा विचार प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींकडून केला जात नाही. हेटवणे धरणाची १४४.९८ मिलिमीटर क्युबिक एवढी क्षमता असून आजमितीला या धरणात ८०.६५ मीटर एवढा पाणीसाठा झाला आहे, तर शहापाडा धरण हे ओव्हरफ्लो होऊन भरत आहे. मात्र सध्याच्या पडणाऱ्या पावसामुळे कुठेही पाणी पातळीत वाढ झाली नसून पेण तालुक्यातील नदीकाठच्या कोणत्याही भागाला धोका नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डचे आधुनिकीकरण, प्रवास होणार वेगवान!

कर्जत: मध्य रेल्वेने कर्जत यार्ड आधुनिकीकरणाच्या दिशेने मोठे आणि महत्वाचे पाऊल टाकले आहे. यामुळे केवळ रेल्वे

मच्छीमारांसाठी दिवाळी हंगाम सुगीचा

मुरुड-जंजिरा:पर्यटकांना ताजी मासळी पापलेट, सुरमई, रावस, जिताडा, कोळंबीसह दिवाळीच्या सुटीत वर्षभर पुरेल एवढे ताजे

भूषण पतंगे मृत्युप्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांची मागणी अलिबाग  : बनावट नोटा प्रकरणातील आरोपी भूषण पतंगेच्या मृत्यूने

पोहोच रस्त्याच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना न्याय द्या

अलिबाग  : शहापूर येथील एमआयडीसी पोहोच रस्त्याच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी शहापूर

दिवाळीनिमित्त सैनिकांना सीमेवर फराळ, पनवेलकरांचा उत्तम उपक्रम!

पनवेल: दिवाळी सणाला अनेक भारतीय घरांमध्ये फराळ केला जातो. उत्साहाचे वातावरण असते. मात्र सणाच्या वेळी सीमेवरील

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण वाहतूक कोंडी; प्रवाशांचा संताप

रायगड: शनिवार, रविवार आणि दिवाळीच्या सुट्या यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी आणि पर्यटक घराबाहेर पडले आहेत.