नवी मुंबईच्या घणसोलीत इमारतीचा स्लॅब कोसळला, महिला जखमी



घणसोली : नवी मुंबईच्या घणसोलीत इमारतीचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत महिला जखमी झाली. घणसोलीतील सेक्टर सातमध्ये सिम्पलेक्स ओम साई सोसायटी मधील एफ तीन इमारतीतल्या ३०७ क्रमांकाच्या घरात किचनचा स्लॅब कोसळला. जेव्हा स्लॅब कोसळला त्यावेळी एक महिला किचनमध्ये होती. ही महिला जखमी झाली.

स्लॅबचा भाग अंगावर पडल्यामुळे महिलेच्या डोक्याला आणि एका हाताला दुखापत झाली. नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली तसेच जखमी महिलेला नियमानुसार मदत देण्याचे आश्वासन दिले.

ज्या घरात स्लॅब कोसळला त्या घरात बांदल कुटुंब दहा वर्षांपासून वास्तव्यास आहे. इमारत जुनी झाल्याचे त्यांनी मान्य केले. पण स्लॅब कोसळेल असे त्यांना कधी वाटले नव्हते. घडलेल्या घटनेने घरातील सदस्य घाबरले आहेत.

स्लॅब कोसळण्याची घटना ज्या इमारतीत घडली ती इमारत जुनी असली तरी धोकादायक स्थितीत नाही. यामुळे स्लॅब कोसळल्याचे कळल्यापासून इमारतीतले अनेक रहिवासी घाबरले आहेत.

Comments
Add Comment

एमपीसीबीचा ओसाखा सिटी प्रशासनासोबत सामंजस्य करार

मुंबई : पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) जपानच्या

लोकमान्य टिळक मंडईतील विक्रेत्यांवर कारवाई

नूतनीकरणावरून वाद तीव्र मुंबई : लोकमान्य टिळक मंडईमध्ये कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता वाढीव बांधकामावर

टोल थकबाकीमुळे वाहन सेवा थांबणार

एनओसी, फिटनेस प्रमाणपत्र व नॅशनल परमिटवर बंदी मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी

गुन्ह्यांच्या रेकॉर्डमुळे तुमचे करिअर उद्ध्वस्त झाले

सत्र न्यायालयाचा एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांना गंभीर इशारा मुंबई : मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल

प्रशासनालाच पडला पालिका सभागृहाच्या निर्णयाचा विसर

नगरसेवकांची हजेरी बायामेट्रिक पद्धतीने सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांची पुस्तिकेवरील

प्रजासत्ताक दिनी राज्यपाल मुंबईत; उपमुख्यमंत्री शिंदे ठाण्यात ध्वजवंदन करणार!

मुख्यमंत्री फडणवीस दादरमध्ये, अजित पवार पुण्यात हजेरी लावणार मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री