Navi Mumbai News : गुगल मॅपचा ‘घात’; पुलाखालचा रस्ता दाखवला अन् गाडी थेट खाडीत! बेलापूरमध्ये थरकाप उडवणारी दुर्घटना

बेलापूर : ‘डावीकडून उजवीकडे वळा’, ‘पुढे सरळ जा’… हे सांगणारा गुगल मॅप (Google Map) यावेळी प्राणघातक ठरला! बेलापूरमध्ये एका वाहनचालकाने गुगल मॅपवर दाखवलेला रस्ता घेतला आणि थेट गाडी पुलाखालच्या उघड्या खाडीत घातली. या विचित्र आणि धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गुगल मॅपच्या आधारे उलवेला जाणारी भरधाव कार थेट खाडीत कोसळल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास बेलापूरमध्ये घडली. घटनेवेळी तिथे उपस्थित असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांनी वेळीच महिलेचे प्राण वाचवले. शिवाय क्रेनच्या साहाय्याने खाडीत पडलेली कार देखील बाहेर काढण्यात आली. खाडीतून कार बाहेर काढत असतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावरती मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होताना दिसत आहे.



नेमकं काय घडलं?


मिळालेल्या माहितीनुसार, गुगल मॅप आधारे प्रवास करणाऱ्या वाहनांचे अनेकदा अपघात होत असल्याच्या घटना आपल्या कानावर येतात, पण अशीच एक घटना नवी मुंबईत देखील शुक्रवारी मध्यरात्री (शुक्रवारी पहाटे १ वाजता) घडली आहे. एक महिला तिच्या कारमधून प्रवास करत उलवेच्या दिशेने चालली होती. मात्र बेलापूर येथील खाडीपुलावर जाण्याच्या ऐवजी त्यांनी पुलाखालील मार्ग घेतला. यामुळे गुगल मॅपवर दिसत असल्याप्रमाणे तिथे सरळ रस्ता असल्याचे त्या महिलेला वाटले. यामुळे सरळ जात असताना महिलेची कार थेट ध्रुवतारा जेट्टीवर जाऊन खाडीत कोसळली. जेट्टीला सुरक्षा कठडा नसल्याने कार त्याठिकाणी न अडता थेट खाडीत जाऊन कोसळली.





सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, कारमधील महिला वाहत जात असल्याचे त्यांना दिसून आले. ही घटना घडली त्या परिसराच्या जवळच असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांच्या निदर्शनात ही बाब आली. त्या महिलेचा गस्ती व रेस्क्यू बोटीच्या साहाय्याने बाहेर काढून त्यांचा प्राण वाचवण्यात आला. तर खाडीत पडलेली कार क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली. गुगल मॅपवर रस्ता पाहत जात असताना रस्ता संपून पुढे जेट्टी असल्याचे न कळल्याने हा अपघात घडल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. दरम्यान, सागरी सुरक्षा पोलिस चौकीच्या समोरच ही दुर्घटना घडल्याने वेळीच महिलेला मदत मिळाली आणि महिलेचे प्राण वाचले. दरम्यान, या अपघातानंतर ‘गुगल मॅपवर इतकं अवलंबून राहणं किती धोकादायक ठरू शकतं’ याची पुन्हा एकदा चांगलीच जाणीव झाली.

Comments
Add Comment

नाशिकच्या राजकारणाला कलाटणी दोन माजी महापौरांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

मुंबईतील मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश नाशिक : नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर दशरथ पाटील आणि

Gold Silver Rate Today: सोन्याचांदीत दुसऱ्या दिवशीही सणसणीत वाढ सोने इंट्राडे १% चांदी २% पातळीवर उसळली

मोहित सोमण: आजही भूराजकीय अस्थिरतेची मालिका सुरु राहिल्याने सोने व चांदीत रॅली झाली आहे. सोने चांदीत अस्थिरतेचा

देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

धुळे  : राज्यात होत असलेल्या २९ महापालिकांच्या निवडणुकांमध्ये जवळपास ६८ उमेदवार बिनविरोध आल्याच्या

सोनिया गांधी रुग्णालयात

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल

गॅबियन टेक्नॉलॉजीजचा SME आयपीओ पहिल्याच दिवशी खल्लास! एकूण ४४.६७ पटीने सबस्क्रिप्शन

मोहित सोमण: गॅबियन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (Gabion Technologies Limited) या कंपनीचा एसएमई प्रवर्गातील छोटा आयपीओ आजपासून बाजारात दाखल

Hydrabad Crime : अमेरिकेत हैदराबादच्या लेकीची निर्घृण हत्या; संशयित माजी रूममेट भारतात पळाला, तामिळनाडूत अटक

हैदराबाद : अमेरिकेतील मेरीलँड राज्यात डेटा आणि स्ट्रॅटेजी ॲनालिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या निकिता गोडिशला (वय