Indian Economy: भारताच्या वेगवान अर्थव्यवस्थेचे 'इंजिन' ६ ते ६.५० टक्क्यांवर कायम राहणार!

ताज्या युबीएस अहवालात केले स्पष्ट


प्रतिनिधी: भारताची अर्थव्यवस्था ६ ते ६.५०% वाढीसह कायम राहू शकते असे निरीक्षण नव्या युबीएस (UBS)रिपोर्टमध्ये नोंदवले गेले आहे. देशांतर्गत वाढत्या मागणीसह,जागतिक स्तरावरील नियंत्रित अथवा घटणारे कच्च्या तेलाचे दर या कारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था तेजीतच राहिल असे संकेत या अहवालात दिले गेले. रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो दरात जून महिन्यात कपात केली होती. त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली.याच घटनेचा हवाला देत म्हटले आहे की,'आगामी काळात वित्तीय परि  वर्तन अपेक्षित असून १०० बीपीएस पूर्णांशाने आतापर्यंत झालेल्या घसरणीमुळे दरवाढ स्थिर राहिल.'


जागतिक अर्थव्यवस्थेत संकटे असली तरी त्याचा अतिरिक्त फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसला नाही. इतर आशियाई राष्ट्रांना जागतिक अस्थिरतेचा फटका बसला तरी भारत स्थिर असल्याचे अहवालात म्हटले आहे.तज्ञांनी हे देखील म्हटले आहे की,अजूनही म हागाई घटल्यास अथवा नियंत्रणात राहिल्यास आगामी काळात २५ ते ५० बेसिस पूर्णांकाने दरकपात करण्यास वाव मिळेल 'याशिवाय आणखी एक निरीक्षण म्हणजे,केंद्र सरकार आपल्या भांडवली खर्च (Capital Expenditure)मध्ये लक्षणीय वाढ करत असल्या ने वित्तीय तूट (Fiscal Deficit) आगामी काळात नियंत्रणात येऊ शकते.' आर्थिक वर्ष २०२५-२६ जानेवारी ते मार्च तिमाहीत तब्बल ७.४% अर्थव्यवस्था वाढली आहे.मागील वर्षाच्या याच तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था ६.२% वाढ दर्शविली गेली होती. तज्ञांच्या म ते ही झालेली अतिरिक्त वाढ सरकारच्या भांडवली खर्चामुळे अथवा गुंतवणूकीमुळे, प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अतिरिक्त वस्तू उपभोगामुळे (Consumption),आत्मनिर्भर भारतात निर्यातीवरील अवलंबता कमी झाल्याने झाली आहे.


नुकत्याच आलेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटना (International Monetary Fund IMF) संस्थेच्या जागतिक अहवालात भारत पुढील २ वर्षात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरेल असे नमूद केले गेले होते. आरबीआयनेही व सरकारने अर्थव्यवस्था ६ ते ६.५० टक्क्यांवर वाढू शकते अशा पद्धतीचे संकेत पूर्वी दिले होते. एप्रिल २०२५ मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक (WEO) मध्ये भारतीय अर्थव्यवस्था यावर्षी ६.२% वाढेल व आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ६.३% वाढेल असे म्हटले गेले तसेच गेल्या महिन्यात मुख्य आ र्थिक सल्लागार डॉ व्ही अनंथा नागेश्वरन यांनी अर्थव्यवस्थेच्या लवचिकतेवर विश्वास व्यक्त केला आणि सांगितले की 'आव्हानात्मक जागतिक वातावरण असूनही भा रताची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत आहे'.ताज्या युबीएस अहवालातील माहितीनंतर भारताच्या विकासाच्या इंजिनवर पुन्हा एकदा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

Comments
Add Comment

देशात एआय क्रांतीला गती देण्यासाठी रिलायन्स आणि गुगल बनले नवे भागीदार

प्रति युजर ३५१०० किमतीच्या जिओ वापरकर्त्यांना १८ महिन्यांचा गुगल एआय प्रो अँक्सेस मोफत भारतात संस्थांना एआय

पवईतील ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : पवईत शूटिंगच्या नावाखाली निष्पाप मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Q2FY26 Results Update: ह्युंदाई मोटर, अदानी पॉवर, सिप्ला, स्विगीचा तिमाही निकाल जाहीर जाणून घ्या ठळक माहिती एका क्लिकवर

मोहित सोमण:आज अनेक कंपन्यांनी आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. नुकतेच ह्युंदाई, अदानी पॉवर, सिप्ला,

फसव्या नोकरीच्या ऑफर वाढल्या; फेडएक्सचा जॉब सीकर्सना इशारा

विश्वासार्ह ब्रँड्सच्या नावांचा गैरवापर करून होते फसवणूक  मुंबई:नोकरीच्या वाढत्या स्पर्धेत उमेदवारांना

वस्तूंच्या उपभोगात झालेल्या वाढीमुळे गुंतवणूकदारांसाठी एलआयसीचा मोठा निर्णय! LIC Mutual Fund कंपनीकडून नवा 'LIC Consumption Fund NFO' लाँच

मोहित सोमण:आज एलआयसी म्युच्युअल फंडने सध्याच्या बदलत्या जागतिक परिस्थितीचा गुंतवणूकदारांना 'परिणामकारक' फायदा

पवईत शूटिंगच्या बहाण्याने २५ मुलांना खोलीत डांबले, अखेर सुरक्षा पथकाने केला गोळीबार

मुंबई : मुंबईतल्या पवई परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शूटिंगच्या नावाखाली गेल्या काही दिवसांपासून सुरू