लोटे एमआयडीसी कारखान्यात स्फोट, एकाचा मृत्यू

रत्नागिरी : लोटे औद्योगिक वसाहतीमधील विनती ऑरगॅनिक प्रा. लि. या रासायनिक उत्पादन करणाऱ्या कंपनीत आज (दि. २६ जुलै) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात समीर कृष्णा खेडेकर (वय अंदाजे ३५) या कामगाराचा मृत्यू झाला. बॉयलरच्या एअर प्री-हिटरमध्ये वाढलेल्या दाबामुळे अचानक झालेल्या स्फोटात ही दुर्घटना घडली.


घटनेच्या वेळी समीर खेडेकर हे संबंधित यंत्राजवळ एकटेच कार्यरत होते. स्फोटामळे त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. तत्काळ सहकाऱ्यांनी त्यांना लाइफ केअर रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन कामथ ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.



या अपघाताबाबत कंपनीचे एचआर मॅनेजर सचिन खरे यांनी सांगितले की, या घटनेची सखोल चौकशी कंपनीमार्फत तातडीने सुरू करण्यात आली आहे.


दरम्यान, खेड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. औद्योगिक सुरक्षा आणि कामगार सुरक्षेच्या उपाययोजनांची चौकशी सुरू आहे.


याच वेळी लोटे औद्योगिक उद्योग भवन येथे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत औद्योगिक अपघात, प्रदूषण आणि स्थानिक रोजगार या विषयावर बैठक सुरू होती. त्याच बैठकीदरम्यान ही दुर्घटना घडल्याने उपस्थितांमध्ये आणि संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.


मृत समीर खेडेकर हे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते सुरेश कांबळे यांचे जावई होते. या मृत्यूमुळे लोटे औद्योगिक वसाहतीतील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी व चौकशी तातडीने करण्याची मागणी होऊ लागली आहे.

Comments
Add Comment

गणेशोत्सव काळात एसटीला बाप्पा पावला

१ कोटी ८० लाखांचे उत्पन्न; ३१,५४६ प्रवाशांचा प्रवास पालघर(प्रतिनिधी) : पालघर एसटी विभागाच्या माध्यमातून

‘ओसी’ नसलेल्या इमारतीसुद्धा रडारवर

बांधकाम परवानग्यांचे संकलन सुरू विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार पालिका क्षेत्रात टोलेजंग इमारती उभ्या करून,

आता शनिवारी-रविवारीही महापालिकेत होणार विवाह नोंदणी

सोमवार ते शुक्रवारमध्ये दररोज ‘जलद विवाह नोंदणी सेवा’ मुंबई (खास प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या सार्वजनिक

मंत्रालयातच फसवणूक! सरकारी नोकरीच्या नावाखाली घेतली मुलाखत, आणि...

नागपूर: सरकारी नोकरीचे स्वप्न प्रत्येकांचे असते, त्यासाठी तरुणवर्ग विविध भरती प्रक्रियेची तयारी करतात, मुलाखती

महापालिकेचा रेबीजमुक्त मुंबईसाठी पुढाकार

भटक्या श्वानांचे लसीकरण २०२६ पर्यंत पूर्ण होणार मुंबई (खास प्रतिनिधी) : श्वानांच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीज

मुंबईतील ५७४ रस्त्यांची कामे ऑक्टोबरपासून सुरू होणार

अर्धवट कामे पूर्ण झाल्यानंतरच नवीन रस्त्यांची कामे सुरू होणार मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने