राज्यातील विकास प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत भेटीगाठी



  • अमित शहा, राजनाथसिंग, जे. पी. नड्डा, मनोहरलाल खट्टर, निर्मला सीतारामन, शिवराजसिंग चौहान यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट




  • गावांना सिमेंट रस्त्यांनी जोडणार, सांडपाणी प्रक्रिया, बांबू क्लस्टर, विदर्भात खतांचा प्रकल्प, एनसीडी स्क्रिनिंगसाठी एआय, अनेक प्रकल्पांना गती




मुंबई  :राज्यातील विविध विकास प्रकल्पांच्या पाठपुराव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेले दोन दिवस दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान, केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर तसेच नीती आयोगाशी या बैठका झाल्या.


अमित शहा आणि राजनाथसिंग यांची सदिच्छा भेट


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संसद भवनात सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्राशी संबंधित विविध प्रकल्पांवर तसेच विषयांवर त्यांनी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री राजनाथसिंग यांचीही सदिच्छा भेट घेतली आणि विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली.


निर्मला सीतारामन यांची भेट


मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आणि त्यात जागतिक वित्तीय संस्थांकडून विविध प्रकल्पांसाठी केंद्रीय आर्थिक व्यवहार मंत्रालयाकडून परवानगी देण्याची मागणी केली. महाराष्ट्राने आपली अर्थव्यवस्था सर्व निकषांवर उत्तम राखल्याबद्दल निर्मला सीतारामन यांनी यावेळी प्रशंसा केली.
या प्रकल्पांमध्ये १००० लोकसंख्या असलेल्या गावांना काँक्रिट रस्त्यांनी जोडण्यासाठीचा प्रकल्प आहे.


यासाठी आशियाई डेव्हलपमेंट बँकेकडून १ अब्ज डॉलर्स (सुमारे ८६५१ कोटी रुपये) इतके आर्थिक सहाय्य मागण्यात आले आहे. दुसरा प्रकल्प महाराष्ट्रातील समुद्रकिनार्याची पातळी वाढत असल्याने त्याचे नैसर्गिक उपायांनी निराकरण करणे हा आहे. यासाठी ५०० मिलियन डॉलर्स (सुमारे ४३२६ कोटी रुपये) इतकी मदत मागण्यात आली आहे. तिसरा प्रकल्प महापालिका शहरांमधून सांडपाण्याचा प्रक्रिया करुन उद्योगांसाठी पुनर्वापर हा आहे. यासाठी ५०० मिनियन डॉलर्सचे (सुमारे ४३२६ कोटी रुपये) अर्थसहाय्य मागण्यात आले आहे. उर्वरित दोन प्रकल्पांसाठी जागतिक बँकेकडून मदत मागण्यात आली आहे. या तिन्ही प्रकल्पांसाठी वित्तमंत्रालयाने मंजुरी द्यावी, यासाठीचे निर्देश निर्मला सीतारामन यांनी या बैठकीत दिले.


विदर्भात खताचा प्रकल्प,जे. पी. नड्डा यांच्याशी भेट


केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या भेटीत विदर्भात एक खतांचा मोठा प्रकल्प उभारण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चा केली. नागपूर जिल्ह्यात गेल, फर्टिलायझर विभाग आणि महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त उपक्रमातून हा १२.७ लाख टनाचा प्रकल्प असणार आहे. सुमारे १० हजार कोटींचा हा प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पासाठी सबसिडी देण्याची मागणीही करण्यात आली आहे. यासंदर्भातील मंत्रिमंडळ प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना जे. पी. नड्डा यांनी दिल्या.


१४ हजार कि.मी.चे ग्रामीण रस्ते, शिवराजसिंग यांच्याशी भेट


महाराष्ट्रात १४ हजार कि.मी.चे रस्ते तयार करण्यासाठीचा एक प्रस्ताव महाराष्ट्राने केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाकडे दिला आहे. हा एकूण प्रस्ताव २.६ बिलियन डॉलर्सचा (सुमारे २२,४९० कोटी रुपये) असून, यातच एडीबीचे सहाय्य घेण्यात येणार आहे. २५ वर्ष मेंटेनन्स फ्री या तत्त्वावर हे रस्ते उभारण्यात येणार आहेत. शेतकर्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरेल, यातून त्यांना चांगली कनेक्टिव्हीटी मिळेल, असे शिवराजसिंग चौहान यांनी सांगितले. या प्रकल्पाला मदत करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

Comments
Add Comment

नववर्षाच्या स्वागतापूर्वी रात्री रेस्ट्रोबार, पब आणि मॉल्समध्ये विशेष तपासणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने नववर्षाच्या स्वागत आणि गोवा क्लब तसेच कमला मिल प्रमाणे

मुंबईतील एनएससीआयला अग्निशमन दलाची नोटीस

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाच्यावतीने नववर्ष २०२६ च्या स्वागतासाठी

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांची गळचेपी

मागील ११ वर्षांत मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील ११० हून अधिक मराठी शाळांना टाळे मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई

मुंबईकरांच्या आरोग्याला महापालिका निवडणुकांचा फटका !

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारी दरम्यान, शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर गंभीर

अभासेच्या गीता आणि योगिता गवळी यांनी भरले उमेदवारी अर्ज

दिवसभरात सात जणांनी भरले अर्ज मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने

मुंबई महापालिका निवडणुकीकरता प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण

सोमवार २९ डिसेंबरपासून कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई