Friday, August 22, 2025

Bank of Baroda Q1 Results: बँक ऑफ बडोदाचा तिमाही निकाल जाहीर, सगळ्या आर्थिक बाबतीत चतुरस्त्र वाढ ! नफा ४५४१ कोटीवर

Bank of Baroda Q1 Results: बँक ऑफ बडोदाचा तिमाही निकाल जाहीर, सगळ्या आर्थिक बाबतीत चतुरस्त्र वाढ ! नफा ४५४१ कोटीवर

प्रतिनिधी: देशातील बडी पीएसयु बँक असलेली बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) आपला तिमाही निकाल जाहीर केला. यावेळी तिमाहीत कंपनीने फंडामेंटलदृष्ट्या जबरदस्त वाढ नोंदवली आहे. बँकेच्या निकालातील उपलब्ध माहितीनुसार, इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) बँकेला तिमाहीत ४५४१ कोटींचा निव्वळ नफा प्राप्त झाला. मागील वर्षाच्या तिमाहीतील ४३५८ कोटींवरून यंदा मोठी वाढ मिळाली. बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्न (Net Interest Income NII) हे या तिमाहीत ११४३५ कोटींवर गेले आहे.

बँकेच्या ऑपरेटिंग नफ्यात (Operating Profit) यामध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ८८% टक्के वाढ झाल्याने विना व्याज मिळकत (Non Interest Income NII) हे ४६७५ कोटींवर पोहोचले आहे. बँकेच्या माहितीनुसार, बँकेने अत्यंत स्थिर वाढ नोंदवली आहे. मागील वर्षाच्या तिमाहीतील तुलनेत बँकेने ७x पटीने वाढ नोंदवली. उत्पन्नाच्या तुलनेत खर्चाच्या पातळीत ३० बीपीएस (Basis Points) ने घट झाली ज्याचा फायदा बँकेला झाल्याने Cost to Income हे गुणोत्तर ४८.८७% पर्यंत पोहोचले.बँकेच्या निव्वळ एनपीएत (Net Non Performing Assets NNPA) यामध्ये ९ बीपीएस पूर्णांशाने घटल्याने तिमाहीत ( Q1FY26) ०.६९% पातळीवर गेले. निकालातील माहितीनुसार, बँकेच्या आरओई (Return on Equity RoE) हा दर १५.०५% असल्याचे म्हटले आहे तर आरईए (R eturn on Assets ROA) म्हणजेच मालमत्तेवर परतावा १% पातळीच्यावर नोंदवला गेला असून स्थूल एनपीएत (Gross NPA) मध्ये घट झाल्याने बँकेच्या असेट क्वालिटीत २.८८ वरून २.३८% पातळीवर गेले.

बँकेच्या खासकरून किरकोळ (Retail), शेती कर्ज, एमएसएमई (MSME) कर्ज यातील वितरणात ३०० बीपीएसने वाढ झाली ज्यामुळे या प्रकारच्या कर्ज वाटपाचे प्रमाण ६२.७% पर्यंत गेले आहे.

बँकेची इतर महत्वाची कामगिरी -

बँकेच्या देशांतर्गत कर्जात ९९१३६३ कोटी रुपये वाढ +12.4% वार्षिक

जूनमध्ये देशांतर्गत ठेवींमध्ये (Domestic Deposit) ८.१ % वार्षिक वाढ होऊन १२०४२८३ कोटी

बँकेच्या जागतिक कर्जात १२०७०५६ कोटी रुपये (+१२.६%) वार्षिक

जागतिक ठेवींमध्ये ९.१% वार्षिक वाढ होऊन १४३५६३४ कोटी

३० जूनपर्यंत देशांतर्गत कासा ठेवीत (CASA Deposits)

५.५% वार्षिक वाढ ४७३६३७ कोटीवर

जूनमध्ये आंतरराष्ट्रीय ठेवींमध्ये १४.८ % वार्षिक वाढ २३१३५१ कोटीवर

ऑरगॅनिक रिटेल ठेवीत (Retail Advance) १७.५% वाढ ज्याचे प्रमुख कारण मॉर्टगेज लोन (१८.६%), ऑटो लोन (१७.९%), होम लोन (१६.५%), एज्युकेशन लोन (१५.४%) आणि पर्सनल लोन (१९.५%) यासारख्या विभागांमध्ये वार्षिक आधारावर चांगली वाढ

कृषी कर्ज पोर्टफोलिओ १६.२% ने वार्षिक आधारावर वाढून १,६१,७६४ कोटी

कॉर्पोरेट अ‍ॅडव्हान्समध्ये ४.२% ने वार्षिक आधारावर वाढ आणि ती ३,७०,२६६ कोटी रुपये

ऑरगॅनिक एमएसएमई पोर्टफोलिओ १३.१% ने वार्षिक आधारावर वाढून १,३५,६६० कोटी रुपये

२० जुलै १९०८ साली स्थापन झालेली बँक ऑफ बडोदा ('The Bank') ही एक भारतीय सरकारी मालकीची बँकिंग (Government Undertaking PSU) आणि वित्तीय सेवा संस्था आहे, ज्याचे मुख्यालय गुजरातमधील वडोदरा येथे आहे. यापूर्वी ' अल्टरनेटिव्ह मेकॅनिझम' योजनेअंतर्गत, सरकारने विजया बँक आणि देना बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण (Merger) करण्याची घोषणा केली, जी १ एप्रिल २०१९ पासून लागू झाली होती. बँक ऑफ बडोदा ही भारतातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक आहे ज्याची देशांतर्गत उपस्थिती मजबूत आहे आणि तिच्या ८४२६ शाखा आणि १११३० एटीएम आणि स्वयं-सेवा चॅनेलद्वारे समर्थित कॅश रिसायकलर्स आहेत. बँकेची आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थिती आहे आणि १७ देशांमध्ये पसरलेल्या ८२ परदेशी कार्यालयांचे नेटवर्क आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा