प्रतिनिधी: सरकारच्या एपीवाय महत्वकांक्षी योजनेला तुंबळ प्रतिसाद मिळाल्याचे निश्चित झाले आहे. अटल पेंशन योजना (APY) या सामाजिक आर्थिक सुरक्षेच्या धोरणाला जबरदस्त पाठिंबा मिळाला आहे. या योजनेच्या लाभार्थीं संख्या ८ कोटीचा टप्पा पार केला आहे. एकूणच नवे ३९ लाख लाभार्थी या योजनेशी जोडले गेलेत असे सरकारने म्हटले आहे. तशी माहिती सरकारने नुकतीच दिली. पेंशन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (PFRDA) या सरकारी संस्थेने या योजनेचा सातत्याने पाठपुरावा केल्याने योजने ला अपवादात्मक यश मिळाले. आर्थिक वर्ष २०२५-२६ या वर्षात योजनेची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली. प्रामुख्याने योजनेची जनजागृती, सरकार, वित्त नियामक मंडळांचे अविरत प्रयत्न या कारणांमुळे योजनेला यश प्राप्त झाले आहे. समाजातील मोठ्या प्रमाणा तील एक स्तर आर्थिक सुरक्षेपा सून वंचित होता त्यांच्यासाठी सरकारने अटल पेंशन योजना २०१५ साली सरकारने सुरु केली होती. असंघटित क्षेत्रातील तरूणांना, कामगारांना, व कष्टकरी, वंचितांना त्यांच्या वाढत्या वयाबरोबर सामाजिक सुरक्षा आर्थिक दृष्टीने मि ळावी यासाठी सरकारने योजना आणली.
या योजनेअंतर्गत दरमहा ठराविक रक्कम वयाच्या ६० व्या वर्षांनंतर मिळते. जसे दरमहा बचतीतून भरलेले योगदान असेल त्या १००० ते ५००० रूपये प्रमाणात दरमहा रक्कम ६० वयानंतर मिळेल अशी ही योजना होती. विशेषतः ही योजना बचतीच्या सवयीला प्रो त्साहन देण्यासाठी सरकारने सुरु केली होती ज्याला मोठा प्रतिसाद देशभरातील नागरिकांनी दिला आहे. जर लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास तर त्यांच्या पती पत्नी अथवा कुटुंबला त्या रक्कमेचा मुदत संपल्यानंतर परतावा (Returns) या योजनेअंतर्गत मिळतात. १८ ते ४० वयोगटातील कर न भरणाऱ्या नागरिक यासाठी पात्र असतील. जर भरलेला कॉर्पस ठरलेल्या किमान रकमेपेक्षा कमी जमत असेल तर त्यात वाढीव रक्कम सरकार गुंतवून त्याचा परतावा पात्र लाभार्थ्यांना मिळेल असे या योजनेचे प्रारूप आहे.