राजस्थानमधील शाळा दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत

जयपूर : राजस्थानातील झालावाड जिल्ह्यातील मनोहरथाना ब्लॉकमधील दांगीपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीपलोदी गावात शुक्रवारी शाळेच्या इमारतीचा एक भाग कोसळल्याने ७ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर २१ विद्यार्थी जखमी झाले होते. या घटनेनंतर राज्य सरकारने मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत आणि एका नातेवाईकाला कंत्राटी आधारावर नोकरी देण्याची घोषणा केली आहे.



राज्याचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी सांगितले की, "या हृदयद्रावक घटनेतील पीडित कुटुंबीयांना सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे. मृत विद्यार्थ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, नव्याने उभारल्या जाणाऱ्या शाळा इमारतीतील वर्गांचे नामकरण या विद्यार्थ्यांच्या नावावर करण्यात येणार आहे. तसेच, पीपलोदी गावात एक कोटी रुपयांच्या खर्चाने भव्य शाळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे." पीपलोदी व चांदपुरा भीलान गावांतील तीन स्मशानभूमींमध्ये शनिवार सकाळी सातही मृत विद्यार्थ्यांचे एकत्र अंतिम संस्कार करण्यात आले. गावात शोककळा पसरली असून, भावनिक वातावरण निर्माण झाले होते. कान्हा आणि मीना या भावंडांची अंत्ययात्रा एकाच अर्थीवर निघाली होती. झालावाड जिल्हाधिकारी अजयसिंह राठोड यांनीही पीपलोदी गावात भेट देऊन शोकाकुल कुटुंबीयांची भेट घेतली.


शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या यादीनुसार, कान्हा छोटूलाल मुलगा (७), कुंदन बीरम मुलगा (१०), हरीश बाबूलाल मुलगा (११), प्रियंका मांगीलाल मुलगी (१२), पायल लक्ष्मण मुलगी (१३), मीना छोटूलाल मुलगी (१०), कार्तिक हरकचंद मुलगा (८) यांचा मृत्यू झाला. सर्व शवविच्छेदनानंतर शनिवारी पहाटे कडक पोलीस बंदोबस्तात मृतदेह गावाकडे रवाना करण्यात आले. हे मृतदेह येताच संपूर्ण गावात एकच गोंधळ उडाला.

Comments
Add Comment

Vapi Chemical Units : वापी औद्योगिक वसाहतीला युद्धाचा विळखा! कच्चे तेल आणि कच्च्या मालाचे दर भडकल्याने उत्पादन कोलमडले

वापी : पश्चिम आशियात (इराण-अमेरिका-इस्रायल) भडकलेल्या युद्धाच्या ज्वाला केवळ त्या भूप्रदेशापुरत्या मर्यादित न

Shreyansh Patel : बुद्धीबळाच्या पटावर अडीच वर्षांच्या चिमुरड्याची 'शह-मात'! श्रेयांश पटेलने रचला विश्वविक्रम

हैदराबाद : बुद्धीबळ म्हणजे संयम आणि तल्लख बुद्धिमत्तेचा खेळ. जिथे मोठ्यांनाही विचार करावा लागतो, तिथे एका अवघ्या

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे