Stock Market: सकाळी शेअर बाजाराची घसरगुंडी बँक,रिअल्टी,वित्त,ऑटो समभागात घसरण कायम 'या' कारणांमुळे अस्थिरता सुरूच

  51

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरणीचे पर्व सुरूच आहे.परवा कमाई झालेल्या गुंतवणूकदारांनी दुप्पटीने गमावल्याने काल घसरणच झाली होती. आज पुन्हा घसरण होत बाजाराने अस्थिरतेला कौल दिला आहे. सकाळ च्या सत्रात सेन्सेक्स २३३.७४ अंकाने घसरला असून निफ्टी ५० हा ८१.६० अंकांने घसरला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात १३७.६३ अंकांची घसरण, बँक निफ्टीत मात्र सुरूवातीच्या कलात ३१.९० अंकाने वाढ झाल्याने बाजारातील अस्थिरता असल्याचे स्पष्ट झाले. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.२०%,०.४१% घसरण झाली असून निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.२७%,०.५२% घसरण झाली. आज विशेषतः अस्थिरता निर्देशांक (२.०७%) उसळला आहे. यामुळे अखेरच्या सत्रात शेअर बाजारात वाढ होईल का हा प्रश्नचिन्हच आहे.

निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) यामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी बहुसंख्य समभागात घसरगुंडी झाली आहे. मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (०.५३%), पीएसयु बँक (०.३७%), फार्मा (०.३३%), रिअल्टी (०.४५%), हेल्थकेअर (०. ३०%) समभागात वाढ झाली आहे. सर्वाधिक घसरण ऑटो (०.७१%), मेटल (०.५०%), फायनांशियल सर्व्हिसेस २५/५० (०.५०%), तेल व गॅस (०.४२%) समभागात घसरण झाली. आज शेअर बाजारातील परिस्थिती पाहता आजही अस्थिरता कायम राहण्याचे सं केत मिळत आहेत. प्रामुख्याने युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्ह बँकेला भेट देऊन गव्हर्नर जेरोमी पॉवेल यांच्यावर मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी आपल्या निवेदनात आता पॉवेल यांना काढण्याची गरज नसल्याचे म्हटले होते. यामुळेच युएस बाजारात अस्थिरता कायम होती जी अमेरिकेतील दोन शेअर बाजारात वाढ व एका बाजारात घसरण या पद्धतीने परिवर्तित झाली होती. याशिवाय भारताने युकेशी एफटीए करार केल्यानंतर अमेरिकेचे धाबे दणाणले असल्याने युएसदेखील... भार ताशी पुढील बोलणी करू शकते असे संकेत मिळत आहेत. मात्र दुसरीकडे ट्रम्प यांनी युएसमध्ये आयटी कंपन्यांना भारतीयांना नोकरी न देण्याचे धमकीवजा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांना केवळ फक्त अमेरिकेतच नागरिकांना रोजगारात प्राधान्य द्यावा हे मत मांडले . आधीच मेटाकुटीला आलेल्या आयटी क्षेत्रात या घटनेनंतर मोठी खळबळ माजली आहे. ज्याचा प्रभाव गुंतवणूकदारांवर होऊ शकतो.

काल भारतीय बाजारपेठेत बँक, आयटी, एफएमसीजी, रिअल्टी समभगात मोठी घसरण झाली असल्याने बाजारात सपोट लेवल मिळू शकली नाही हीच परिस्थिती आजही कायम राहण्याची शक्यता आहे आज आणखी एक गोष्ट म्हणजे मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये ही मोठी चढउतार होत असल्यानेही फटका बाजाराला बसत आहे. डॉलरच्या दरात आज पुन्हा वाढ झाल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतीय बाजारात कशी प्रतिक्रिया देतील त्यावर आज रॅली होईल का घसरण हे ठरू शकते. दुसरीकडे नुकत्याच झाले ल्या बँकेच्या तिमाही निकालानंतर आयटी, व इतर सेवा देणाऱ्या कंपनीच्या निकालावर गुंतवणूकदारांनी नाराजी व्यक्त केली होती. आज तर ८५ कंपन्यांचे तिमाही निकाल लागणार आहेत त्याचा परिणाम क्षेत्रीय निर्देशांकात बसू शकतो. आशियाई बाजारांनी दला ल स्ट्रीटवर दिसणाऱ्या सावधगिरीचे प्रतिबिंब दाखवले आहे. जपानचा निक्केई २२५ ०.२४% खाली आला असून तर टॉपिक्स ०.५५% खाली आला. दक्षिण कोरियाचा कोस्पी स्थिर राहिला आणि कोस्डॅक ०.४८% खाली आला. ऑस्ट्रेलियाचा एएसएक्स २०० ०.४१% निचांकावर पोहोचला होता.

सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ आयईएक्स (१०%), अनंत राज (६.९७%), फिनिक्स मिल्स (५.५३%), ट्रायडंट (४.६६%), कोफोर्ज (२.६७%), टोरंट फार्मास्युटिकल (१.६३%), डॉ रेड्डीज (१.४१%), मस्टेक (१.२६%), बँक ऑफ इंडिया (१.१७%), एसबीआय लाईफ इन्शुरन्स (२.३२%), बँक ऑफ बडोदा (०.३९%), आयसीआयसीआय बँक (०.३१%), डिवीज (०.६८%) समभागात झाली आहे.

सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण अयुथुम इन्व्हेसमेंट (९.७३%), बजाज फायनान्स (४.५४%), बजाज फिनसर्व्ह (४.०६%), श्रीराम फायनान्स (३.०८%), आदित्य बिर्ला कॅपिटल (३.३६%), जेपी पॉवर वेचंर (३.१७%), एमआरपीएल (३.०१%), श्रीराम फायनान्स (३.०८%), आयडीबीआय बँक (१.२७%), बजाज हाउसिंग फायनान्स (१.२२%), स्विगी (१.९३%), लोढा डेव्हलपर (१.८१%), हिरो मोटोकॉर्प (१.३४%), इन्फोऐज (१.२१%), जियो फायनांशियल सर्व्हिसेस (१.२३%), हिंदुस्थान एरोनॉटिक्स (१.३३%) समभागात झाली.

सकाळच्या बाजारातील परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना चॉईस इक्विटी ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेडचे डेरिएटिव विश्लेषक हार्दिक मतालिया म्हणाले की,' जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमध्ये निफ्टी आणि सेन्सेक्स बेंचमार्क निर्देशांक कमी उघडण्या ची अपेक्षा आहे. आशियाई बाजार कमकुवत आहेत आणि अमेरिकन बाजार मिश्रित बंद झाले आहेत, नॅस्डॅक आणि एस अँड पी विक्रमी उच्चांकावर आहेत. गिफ्ट निफ्टी ०.३६% ने घसरून २४,९९७ वर आला आहे. कमकुवत कमाईमुळे आणि आयटी आणि एफएमसीजी समभागांमध्ये मार्जिन दबावामुळे सावधगिरी बाळगली आहे. निफ्टी २४९००–२५३०० च्या घट्ट श्रेणीत अडकला आहे आणि कोणतीही स्पष्ट दिशा नाही, २५२००– २५३०० पातळीवर मजबूत प्रतिकाराचा सामना करत आहे. ५० पेक्षा कमी आरएस आय कमकुवत गती दर्शवितो. २५१५० आणि २४९५० वर २० आणि ५० दिवसांचे ईएमए (Exponential Moving Average EMA) एकत्रीकरण क्षेत्र दर्शवितात. निफ्टी २५३०० पातळीवर न जाता, विक्री-वर-वाढ धोरणासह सावध दृष्टिकोन आदर्श आहे. बँक निफ्टी ५६६०० आणि ५७३५० पातळीच्या दरम्यान रेंज-बाउंड राहिला, ५७३०० पातळीच्या जवळ मजबूत प्रतिकाराने वाढ मर्यादित केली. उशिरा रिकव्हरी झाली तरी, कोणताही फॉलो-थ्रू नव्हता, जो मंदीचा दबाव दर्शवितो. आधार ५६६०० पातळीवर आहे आणि २०-दिवसांचा EMA ५६८०० पातळीवर आहे. RSI ५० च्या खाली सिग्नल कमकुवत गती. जोपर्यंत तो ५७३५० पातळीच्या वर खंडित होत नाही तोपर्यंत, विक्री-वाढीची रणनीती पसंत केली जाते.

विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) चौथ्या दिवशी त्यांची विक्री वाढवली कारण त्यांनी २४ जुलै रोजी २१३३ कोटी रुपयांचे इक्विटी विकले. तथापि, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) त्याच दिवशी २६१७ कोटी रुपयांचे इक्विटी खरेदी केले. निफ्टी ५० ने उच्च व्हॉल्यूमसह मंदीचा एंगल्फिंग (Engulfing) पॅटर्न तयार केला, जो १०- आणि २०-दिवसांच्या EMA च्या खाली घसरला. तो १० सत्रांपासून खालच्या बोलिंगर बँडमध्ये व्यवहार करत आहे. आरएसआय कमकुवत राहिला आहे, तर स्टोकास्टिक आरएस आय सकारात्मक आहे आणि एमएसीडी सुधारत आहे. एकंदरीत, सेटअप मिश्रित दिसत आहे, जोपर्यंत मजबूत खरेदी होत नाही तोपर्यंत एकत्रीकरण चालू राहण्याची शक्यता आहे.'

सकाळच्या बाजारातील निफ्टीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स म्हणाले की,' २५२१५ पातळी क्षेत्राने भीतीपोटी एकत्रीकरण करण्यास भाग पाडले आहे, जे आता मजबूत खाली जाण्याच्या हालचालीत विकसित होण्याचा धोका आहे. २४९०० पातळीनंतर घसरण २४७५०-६५० चे तात्काळ उद्दिष्ट निश्चित करू शकते. पुढील समर्थन २४४५० आणि २४००० पातळीच्या जवळ आहेत. तथापि, गती कमी असल्याने, पसंतीचा दृष्टिकोन असा अंदाज आहे की सुरुवातीला २४९०० पातळीच्या जवळ डाउनसाइड्स मंदावतील, ज्यामुळे पुन्हा बाजूला हालचाली होतील, चढउतार २५१३० पातळीच्या जवळ मर्यादित असतील.'

सकाळच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले,' भारत-यूके एफटीए, जो एका मोठ्या विकसित देशासोबतचा भारताचा पहिला व्यापक व्यापार करार आहे, त्याचे बाजाराच्या दृष्टिकोनातून दोन परिणाम आहेत. एक हा एफटीए दोन्ही देशांमधील व्यापाराला लक्षणीयरीत्या वाढवेल, जो बाजाराला सकारात्मक वाटेल. दुसरे, हा एफटीए आणि भारताने इतर देशांसोबत स्वाक्षरी केलेल्या इतर अनेक एफटीएसह (FTA) भारताला मुक्त व्यापारासाठी वचनबद्ध राष्ट्र म्हणून सादर करतो. हा एफटीए टॅरिफ युद्धांच्या काळात आला आहे हे कौतुकास्पद आहे आणि आशा आहे की यामुळे अमेरिकेसोबत निष्पक्ष व्यापार करार होण्याची भारताची शक्यता वाढेल. कापड, चामडे, अन्न प्रक्रिया, ऑटोमोबाईल्स, औषधनिर्माण आणि रत्ने आणि दागिने यांसारखे क्षेत्र, ज्यांना एफटीएचा फायदा होण्याची अपेक्षा आहे, ते बाजाराच्या रडारवर असतील. नजीकच्या काळात बाजारपेठेची रचना कमकुवत झाली आहे. गेल्या चार व्यापार दिवसांत ११५ ७२ कोटी रुपयांची एफआयआय (FII) विक्री बाजारावर भार टाकेल. व्यापक बाजारपेठेतील, विशेषतः स्मॉल कॅप्समधील कमकुवतपणा कायम राहू शकतो कारण मूल्यांकने जास्त झाली आहेत आणि त्यांचे समर्थन करणे कठीण झाले आहे.'

यामुळे बारकाईने पाहता युके भारत एफटीए धोरणानंतर अमेरिकेचे भारताकडे बारीक लक् आहे 'प्रहार' ने रिपोर्ट केल्याप्रमाणे दोन तीन दिवसात मोठी घडामोड अपेक्षित आहे म्हटल्यानंतर आज डोनाल्ड ट्रम्प यांचे युएसमधील आयटी कंपन्यावरील विधान व युएस भारत बोलणीतील अपेक्षित घडामोड यातील आणखी नवी हालचालींना महत्व प्राप्त झाले आहे.
Comments
Add Comment

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

पाकिस्तानमधून आरडीएक्सने राम मंदिर उडवण्याचा मेसेज; गुन्हा दाखल

बीड : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री राम मंदिर उडवण्याचा मेसेज थेट पाकिस्तानातून बीड जिल्ह्यातील एका तरुणाला

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी

सांगा चूक कोणाची? लपवाछपवी कोणासाठी? बीएमसी आणि म्हाडामध्ये घमासान!

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) यांच्यात चांदिवलीतील

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार