IND vs ENG : ज्यो रूटची रेकॉर्डब्रेक कामगिरी, तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडकडे १८६ धावांची आघाडी

मँचेस्टर: इंग्लंड आणि भारत यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने पहिल्या डावात ७ बाद ५४४ धावा केल्या आहेत. इंग्लंडकडे सध्या १८६ धावांची आघाडी आहे. या सामन्यात ज्यो रूटने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली. त्याने दीडशतक ठोकले.


इंग्लंडचा संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ अशा आघाडीवर आहे. अशातच शुभमन गिलच्या नेतृत्वातील टीम इंडियासाठी हा चौथा कसोटी सामना करो वा मरोसारखा आहे. जर भारतीय संघाने हा सामना गमावला तर इंग्लंडचा संघ ही मालिका आपल्या नावे करेल.


इंग्लंडच्या पहिल्या डावात बेन डकेट आणि जॅक क्राऊली यांनी मिळून संघाला शानदार सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १६६ धावांची भागीदारी केली. बेन डकेटने १०० बॉलमध्ये ९४ धावा केल्या. यात १३ चौकारांचा समावेश आहे. जॅक क्राऊलीने ८४ धावांचे योगदान दिले. यात १३ चौकारांशिवाय एका षटकाराचा समावेश होता. रवींद्र जडेजाने जॅक क्राऊलीला बाद केले. तर अंशुल कम्बोजने डकेटची विकेट घेतली.


तिसऱ्या दिवसाच्या खेळात भारतीय गोलंदाजांकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. मात्र त्यांचे पहिले सत्र खूप खराब ठरले. पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांना एकही विकेट मिळवता आली नाही. या दरम्यान, ज्यो रूट आणि ओली पोपने भारतीय संघाला एकही संधी दिली नाही. रूटने ६ चौकारांच्या मदतीने ९९ बॉलवर आपले अर्धशतक पूर्ण केले. तर पोपने ५० धावांचा आकडा गाठण्यासाठी ९३ बॉल घेतले. यात त्याने ६ चौकार लगावले.


लंचनंतर वॉशिंग्टन सुंदरने एकामागोमाग एक विकेट मिळवल्या. सुंदरने सगळ्यात आधी ओली पोपला बाद केले. त्याने ७१ धावा केल्या. पोप आणि ज्यो रूट यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी १४४ धावांची भागीदारी केली. सुंदरने हॅरी ब्रूकला ३ धावांवर स्टम्प आऊट केले.

Comments
Add Comment

BCCI च्या कुटुंबातील कोणीही मेलं नाही, म्हणून..., शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया

"सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील" ऐशन्या द्विवेदी Asia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई

क्रिकेटमध्ये पाकिस्तानशी तर हॉकीमध्ये चीनशी... रविवारी भारताची दुहेरी 'कसोटी'!

उद्याचा रविवार क्रीडाप्रेमींसाठी दुहेरी थरार, हॉकी आणि क्रिकेटचे दोन्ही सामने महत्वाचे! नवी दिल्ली: उद्या दि. १४

जर्सीचे प्रायोजक १५-२० दिवसांत निश्चित होणार: राजीव शुक्ला

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट जर्सीला प्रायोजक मिळण्यासाठी आणखी २ ते ३ आठवड्यांची वाट पाहवी लागणार आहे, असे

जागतिक प्रत्यारोपण क्रीडास्पर्धेत ईशान आणेकरचे घवघवीत यश

जलतरणात दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदकाची कमाई ठाणे : अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती, दाते यांच्यासाठी होणार्या

बॅडमिंटनमध्ये २५ सेकंदांची ‘टाईम-क्लॉक’ प्रणाली लागू

नवी दिल्ली : बॅडमिंटन सामन्यांना अधिक वेग देण्यासाठी, खेळाची जागतिक नियामक संस्था ‘बीडब्ल्यूएफ’ने (बॅडमिंटन