मुंबईत पुन्हा एकदा जोरदार पावसाचा कहर! जुहू- अंधेरी जलमय, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई: महाराष्ट्राची राजधानी पुन्हा एकदा मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे ठप्प झाली आहे. पहाटेपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. ज्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. हवामान खात्याने मुंबई आणि आसपासच्या परिसरांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. अंधेरी, सायन, कुर्ला, दादर आणि वांद्रे भागात पाणी भरले असून, ज्यामुळे रेल्वे सेवा देखील उशिरा सुरू आहेत. त्याचप्रमाणे विमानसेवेतदेखील अडथळे निर्माण झाले आहेत.



जुहू-अंधेरी परिसर जलमय


मुंबई उपनगरात प्रसिद्ध जुहू परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने पादचाऱ्यांना व वाहनचालकांना हाल सहन करावे लागत आहेत. त्याचप्रमाणे, अंधेरी भागातील रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक संथ झाली आहे. अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.



पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत


मुंबईत मुसळधार पाऊसामुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सामान्य वेळापत्रकाच्या तुलनेत १५  मिनिटे उशिरा धावत आहेत. बोरीवली ते दहिसर दरम्यान वायर तुटली आहे. त्यामुळे चर्चगेटच्या दिशेनं जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.



आज कुठे किती पाऊस?


हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 48 तास मुंबईसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाण्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. तर पुणे, रायगड, रत्नागिरी, साताऱ्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागान दिलाय. तर, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.



 
Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती