जनतेतून सरपंच निवडीमुळे निवडणुका होणार चुरशीच्या

  56

५८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण जाहीर


जामखेड : जामखेड तालुक्यात सन २०२५ ते २०३० या कालावधीतील निवडणुकान करिता आज दि.२३ जुलै रोजी काढण्यात आलेल्या सरपंच पदाचे आरक्षणानुसार अनुसूचित जाती स्त्री तीन, अनुसुचित जाती व्यक्ती तीन, अनु जमाती स्त्री एक,नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री आठ,नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती नऊ,सर्वसाधारण स्त्री पंधरा व सर्वसाधारण व्यक्ती सतरा असे एकुण ५८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण काढण्यात आले आहे.


जामखेड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गाकरिता सन २०२५ ते २०३० या कालावधी करिता चक्रानुक्रमे (रोटेशन) पध्दतीने सरपंचपदाचे आरक्षण काढण्या करिता आज दि.२३ जुलै रोजी दुपारी जामखेड तहसील कार्यालयाच्या सभागृहात कर्जत विभागाचे उपविभागीय अधिकारी यांचे हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली.यावेळी तहसिलदार गणेश माळी तसेच जामखेड तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सदस्य,जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच सर्व नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.


महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडील दि.जुन २०२५ रोजीच्या राजपत्रातील अनुसुची २ मध्ये अहिल्यानगर जिल्हयातील अनुसुचित क्षेत्रातील ग्रामपंचायती वगळून इतर सर्व ग्रामपंचायतीकरीता अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गाकरिता सरपंच पदाचे आरक्षण वाटप करण्यात आलेले आहे.तर एक द्वितीयांश सरपंच पदे महिला (अनुसुचित जाती महिला व अनुसुचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला) यांच्यासाठी ही येथे आरक्षण सोडत आज काढण्यात आली.


त्यानुसार जामखेड तालूक्यातील ५८ सरपंच पदासाठी सन २०२५ ते २०३० सालासाठी एकुण निहीत केलेल्या ग्रामपंचायतीचे आरक्षण खालीलप्रमाणे.अनु जाती स्त्री: पाटोदा, हळगाव व धनेगाव अनुसुचित जाती व्यक्ती :दिघोळ,शिऊर व साकत अनु जमाती स्त्री: पिंपरखेड नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री जवळा, झिक्री, बावी, मतेवाडी,वाकी,लोणी,देवदैठण,अरणगांव नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती:आनंदवाडी,कवडगाव,तेलंगशी,पिंपळगांव आळवा,बोर्ले, सातेफळ, डोणगाव, सारोळा सर्वसाधारण प्रवर्ग- स्त्री: पाडळी,घोडेगांव,पिंपळगांव उंडा,नान्नज,सोनेगाव,जवळके,मोहा,बांधखडक,धानोरा,सावरगाव,आपटी,कुसडगांव, राजेवाडी,चोभेवाडी, गुरेवाडी,पोतेवाडी,वाघा,फक्राबाद सर्वसाधारण व्यक्ती:आघी,खर्डा,खांडवी,खुरदैठण,चोंडी,जातेगाव,जायभायवाडी,तरडगाव, धामणगाव,धोंडपारगाव,नायगाव,बाळगव्हाण,मुंजेवाडी,मोहरी, रत्नापूर,राजुरी,नाहुली यावर्षी सरपंचपदाची निवड ही जनतेतून होणार असल्याने निवडणूका अटीतटीच्या व चुरसीच्या होण्याची शक्यता आहे,तसेच ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक निवडणूकांपुर्वीच सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवार व पॅनल प्रमुख यांना तयारी करण्यासाठी बराच वेळ मिळणार आहे.


Comments
Add Comment

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार

पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या

‘महादेवी हत्तिणी’च्या ‘नांदणी’वापसीचा मार्ग मोकळा, पण कायद्याचा अडसर

कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महादेवी हत्तिणीला जनभावनांचा आदर करत ‘वनतारा’

बुलेट ट्रेनसाठी साबरमती नदीवर ३६ मीटर उंच पुलाची उभारणी

अभियांत्रिकी क्षेत्रात पूल ठरणार चमत्कार अहमदाबाद : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरु आहे.

तुळजाभवानी मातेची तलवार गहाळ! स्थानिक पुजाऱ्यांनी दिली माहिती

तुळजापूर:  तुळजाभवानी मंदिरातील खजिना खोलीतून शस्त्र पूजनासाठी वापरली जाणारी विशेष तलवार गहाळ झाली आहे, असे

रेव्ह पार्टी करणाऱ्या पतीसाठी कायपण! रोहिणी खडसेंची प्रांजल खेवलकरला वाचवण्यासाठी धडपड

पुणे: पुण्यातील उच्चभ्रू सोसायटी रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांनी मारलेल्या छापेमारीत एकनाथ खडसे यांचे जावई