Avatar: Fire and Ash : अवतार -३साठी २१५६ कोटींचे बजेट; 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार, जुरासिक पार्कलाही मागे टाकणार

सिनेमा हा सर्वांच्या आवडीचा विषय. आता नवा सिनेमा येतोय. हॉलीवुडचा असा एक साय-फाय चित्रपट आहे जो 'छावा'पासून ते 'जुरासिक पार्क'चे रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज आहे. हा चित्रपट आहे 'अवतार: फायर अँड ॲश'! चला, जाणून घेऊया या बहुचर्चित चित्रपटाबद्दल सविस्तर माहिती.


?si=51Mp8UaHMG28VdsB

जेम्स कॅमरून यांच्या साय-फाय विश्वाने २००९ मध्ये 'अवतार' आणि २०२२ मध्ये 'अवतार: द वे ऑफ वॉटर'ने जगभरात खळबळ माजवली होती. आता या फ्रँचायझीचा तिसरा भाग 'अवतार : फायर अँड ॲश' १९ डिसेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये दाखल होतोय. तब्बल २ हजार १५६ कोटी रुपयांच्या दमदार बजेटचा हा चित्रपट आहे. या चित्रपटात पैंडोराच्या नव्या गडद आणि आकर्षक बाजू दाखवल्या जाणार आहेत. 'अवतार: फायर अँड ॲश'ची शूटिंग २०१७ मध्ये न्यूझीलंडमध्ये 'द वे ऑफ वॉटर'सोबत सुरू झाली आणि ती २०२० पर्यंत तब्बल तीन वर्षं चालली. या चित्रपटाची रिलीज डेट तब्बल नऊ वेळा पुढे ढकलण्यात आली.



मात्र आता १९ डिसेंबर २०२५ रोजी हा चित्रपट जगभरात रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं बजेट आहे २ हजार १५६ कोटी रुपये म्हणजेच २५० मिलियन डॉलर्स. याआधी 'अवतार'ने २० हजार कोटी आणि 'द वे ऑफ वॉटर'ने १९ हजार कोटींची कमाई केली होती. आता हा तिसरा भाग बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड बनवणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. या चित्रपटात पैंडोरावरील नव्या नावी जमाती भेटणार आहेत. यात 'ॲश पीपल्स' ही आक्रमक आणि ज्वालामुखी परिसरात राहणारी जमात मुख्य खलनायक असेल. ज्याचं नेतृत्व वरांग म्हणजे ऊना चॅप्लिन करत आहे. याशिवाय 'विंड ट्रेडर्स' ही हवेत तरंगणाऱ्या हवाई जहाजांवर राहणारी जमातही दाखवली जाणार आहे.


जेक सुली आणि नेयतीरी यांच्या कुटुंबाला या नव्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. सिनेमाकॉन २०२५ मध्ये या चित्रपटाचा पहिला ट्रेलर दाखवण्यात आला. त्यावेळी त्याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. ट्रेलरमध्ये दिसणारी पैंडोराची गडद आणि आक्रमक बाजू तसंच जबरदस्त व्हिज्युअल इफेक्ट्स यांनी सगळ्यांना थक्क केलं. हा चित्रपट 'द वे ऑफ वॉटर'पेक्षा अधिक लांब असेल म्हणजेच सुमारे ३ तास १० मिनिटांचा, असं जेम्स कॅमरून यांनी सांगितलंय. 'अवतार: फायर अँड ॲश' हा चित्रपट केवळ साय-फाय चाहत्यांसाठीच नाही, तर प्रत्येक सिनेप्रेमीसाठी एक भव्य अनुभव असेल. २१५६ कोटींचं बजेट, तीन वर्षांचं शूटिंग आणि नऊ वेळा पुढे ढकललेली रिलीज डेट यामुळे या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. तेव्हा तुम्ही आता सज्ज राहा 'अवतार: फायर अँड ॲश' पाहण्यासाठी.

Comments
Add Comment

Bigg Boss Marathi Season 6: पहिल्याच 'भाऊच्या धक्क्या"वर रितेश देशमुख घेणार तन्वी आणि रुचितासोबत इतर सदस्यांची शाळा!

"तन्वी तुम्ही आहात या घराच्या तंटा क्वीन!" - रितेश देशमुख "रुचिता जामदार महाराष्ट्राने पहिल्यांदाच स्वतःला पंजा

आठवणीतला गोडवा

राज चिंचणकर, राजरंग मकरसंक्रांती आणि गोडवा, हे समीकरण अतूट आहे. संक्रांतीपासून रथसप्तमीच्या दिवसापर्यंत सुरू

हे नाटक चालू शकतं? लागली पैज...

भालचंद्र कुबल, पाचवा वेद आमच्या पिढीला, करीअर करायला निघालेल्या नवरा बायकोमध्ये वितुष्ट आले की पहिल्यांदा

PIFF : 'थर्ड आय एशियन'नंतर 'गमन' आता 'पिफ'मध्ये, पाहायला मिळणार स्थलांतराचा अनोखा अनुभव

मुंबई : स्थलांतराचा अनुभव आपल्या सगळांच्या आयुष्यात एकदा तरी येतोच येतो पण हा केवळ एक अनुभव नसून त्यावेळी

Disha Patani and Talwinder: बॅालिवुड अभीनेत्री पंजाबी सिंगर तलविंदरला करते डेट? नक्की काय आहे विषय..

Disha Patani and Talwinder: बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये दिशा पाटनीचे नाव कायमच आघाडीवर असते. तिची टोन्ड

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील