
बंगळुरू : कर्नाटकमध्ये बंगळुरू विमानतळावरील रामेश्वरम कॅफेच्या आऊटलेटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. कॅफेच्या आऊटलेटमधून घेतलेल्या उपम्यात अळी आढळली. या प्रकरणी एका ग्राहकाने कॅफेच्या प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
ग्राहकाच्या म्हणण्यानुसार, त्याने नाश्त्यासाठी ऑर्डर केलेल्या उपमा (पोंगल) या पदार्थात अळी आढळली. अळी दिसताच ग्राहकाने व्हिडीओ करुन नंतर कॅफे प्रशासनाला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. सुरुवातीला कॅफे प्रशासन चूक स्वीकारण्यास तयार नव्हते. पण थोड्या वेळाने कॅफे प्रशासनाने घडलेल्या प्रकाराविषयी दिलगिरी व्यक्त केली तसेच उपम्याचे ३०० रुपये माफ करण्याची तयारी दाखवली.
ग्राहकाने केलेल्या व्हिडीओत उपमा (पोंगल) या पदार्थात अळी दिसत आहे. ग्राहकाने खाण्यासाठी चमच्यात थोडा उपमा (पोंगल) घेतला होता. या चमच्यातील उपम्यात (पोंगल) अळी दिसत आहे. यानंतर कॅमेरा थोडा फिरतो. फूटेजमध्ये कॅफेत बसून खात असलेले इतर ग्राहक दिसतात. यातल्याच एका ग्राहकाशी व्हिडीओ करणारी व्यक्ती तक्रार करण्याच्या बाबतीत चर्चा करत असल्याचे दिसते आणि ऐकू येते.
रामेश्वरम हा कर्नाटकमधील एक मोठा कॅफे ब्रँड आहे. प्रमुख शहरांमध्ये अनेक ठिकाणी या ब्रँडचे आऊटलेट आहेत. स्थानिक आणि पर्यटकांमध्ये रामेश्वरम हा कॅफे ब्रँड लोकप्रिय आहे.
हैदराबादमध्ये रामेश्वरमच्या आऊटलेटवर कारवाई
गेल्या वर्षी मे महिन्यात, हैदराबादमधील रामेश्वरमच्या आऊटलेटवर तेलंगणाच्या अन्न सुरक्षा विभागाने कारवाई केली होती. याआधी मार्च २०२४ मध्ये या आऊटलेटमधून कालबाह्य झालेली १०० किलो उडीद डाळ, १० किलो दही आणि आठ लिटर दूध जप्त करण्यात आले होत.