शिर्डी : शिर्डीच्या साई संस्थानला एक धमकीचा मेल आला आहे. मंदिर बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देणारा मेल भगवंत मान अॅट द रेट यांडेक्स डॉट कॉम या ई मेल आयडीवरुन आला आहे. या प्रकरणी शिर्डीच्या साई संस्थानने पोलिसांना माहिती दिली. पोलीस सायबर तज्ज्ञांच्या मदतीने ई मेल करणाऱ्याचा शोध घेत आहेत. याआधीही शिर्डीच्या साई संस्थानला धमकीसाठी फोन करणे अथवा इ मेल करणे असे प्रकार घडले आहेत. प्रत्येकवेळी धमकी येताच पोलीस तातडीने तपास सुरू करतात. धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाते.
शिर्डीच्या साई मंदिराला दररोज मोठ्या संख्येने भाविक भेट देतात. साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी, साईचरणी लीन होण्यासाठी प्रचंड गर्दी होते. यामुळे मंदिरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत आहेत. तसेच मंदिरात चोख बंदोबस्त आहे.