Stock Market: 'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: 'सरड्याची धाव कुंपणापर्यंत' सेन्सेक्स व निफ्टी ' इतक्याने कोसळला! शेअर बाजारात काय नक्की काय चालू आहे जाणून घ्या सविस्तर

  77

मोहित सोमण: 'सरड्याची धाव कुंपणापर्यंत या म्हणीप्रमाणे आजही शेअर बाजारात पुन्हा घसरणीकडे बाजाराचे दोर परतले आहेत. सकाळच्या सत्रातील वाढीला आयटी, बँक, रिअल्टी, टेलिकॉम शेअर्सने धक्का दिल्यानंतर बाजारात आज अखेर घसरणीनेच झाली. अखेरच्या सत्रात सेन्सेक्स निर्देशांक ५४२.४७ अंकांने वाढत ८२१८४.१७ पातळीवर बंद झाला आहे. निफ्टी ५० निर्देशांक १५७.८० अंकांने घसरत २५०६२.१० पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात अखेरीस ३६६.५१ अंकाने घसरण झाली असून बँक निफ्टीत १४४.४० अंकांची घसरण झाली. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.४३%,०.५०% घसरण झाली. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.५८%,१.०९% घसरण झाली आहे. अखेरच्या सत्रात दोन्ही मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये घसरण कायम राहिल्याने त्याचा फटका मिडस्मॉल शेअर्सला अधिक बसला.

निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात संमिश्र प्रतिसाद असला तरी अधिक समभागात नुकसान झाले आहे. सर्वाधिक वाढ पीएसयु बँक (१.२४%), हेल्थकेअर (०.६५%), फार्मा (०.५५%) समभागात झाली आहे तर सर्वाधिक घसरण आयटी (२.२१%), फायनांशियल सर्व्हिसेस २५/५० (०.६५%), एफएमसीजी (१.१२%), तेल व गॅस (०.७८%), फायनांशियल सर्व्हिसेस एक्स बँक (०.९२%) , रिअल्टी (१.०४%) समभागात झाली आहे. आज बीएसईत (BSE) ४२२१ समभागातील १६४५ समभागात वाढ झाली आहे तर २४१० समभागात नुक सान झाले आहे. एनएसईत (NSE) बाजारातील ३०५८ समभगापैकी ११११ समभागात वाढ झाली असून १८६३ समभागात घसरण झाली आहे.

आज अखेरच्या सत्रात एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, नेस्ले इंडिया यांसारख्या हेवी वेट शेअरमध्ये मोठी घसरण झाल्याने बाजारातील निर्देशांकाचा तोल ढासळला आहे. दुसरीकडे आयईएक्सचा समभाग (Stock) मध्ये २८% घस रण झाल्याने बाजारात निराशेचे वातावरण कायम राहिले. विशेषतः आयटी, एफएमसीजी, रिअल्टी, बँक निर्देशांकात झालेल्या घसरणीमुळे निर्देशांक लाल रंगात बंद झाला.काल इन्फोसिस कंपनीच्या तिमाहीचा निकाल जाहीर झाला ज्यामध्ये कंपनीच्या नफ्यात ८. ७% वाढ झाली असली तरी गुंतवणूकदारांनी कंपनीच्या शेअर्सला नाकारल्याने आज इन्फोसिसचा शेअर १.३७% घसरला आहे.चारही प्रमुख भारतीय आयटी कंपन्या टीसीएस, एचसीएल, इन्फोसिस,आणि विप्रो यांनी त्यांच्या आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमा हीतील उत्पन्नाची ठीकठाक वाढ नोंद असल्याने गुंतवणूकदार पुढील तिमाहीत कोणता शेअर सर्वात आशादायक संधी सादर करतो याची वाट पाहत आहे त्यामुळे आयटी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढलेल्या मागणी असतानाही आगामी तिमाही निकालांच्या धास्तीसा ठी आयटी शेअर विकण्याकडे गुंतवणूकदारांचा कल राहिला ज्याचा फटका बाजारातील आयटी शेअरला बसला.

'खरं तर तिमाहीत या क्षेत्राला मॅक्रो अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे, ज्यामध्ये एंटरप्राइझ टेक खर्चात घट ते मार्जिन दबाव यांचाही समावेश आहे. व्यापक-आधारित पुनर्प्राप्ती अनिश्चित असली तरी, विशेषतः तांत्रिक आणि मूलभूत दृष्टिकोनातून स्टॉक-वि शिष्ट संधी आकार घेत आहेत.' असे बाजारातील तज्ञांनी म्हटले होते.याच पार्श्वभूमीवर बघता, सततच्या अस्थिरतेचा फटकाही बँकिंग व फायनांशियल सर्व्हिसेससह रिअल्टी समभागात बसल्याने बाजारातील निर्देशांकात आज सपोर्ट लेवल मिळू शकली नाही. ब्लू चिप्स स्क्रिप मधील नुकसानासोबत मिडकॅप व स्मॉलकॅपमध्येही झालेल्या घसरणीमुळे बाजारातील सेन्सेक्स ८२२५० पेक्षाही व निफ्टी २५२०० पातळीच्या खाली घसरला आहे.

युएस बाजारात विशेष ट्रिगर नसला तरी युएस टेरिफ वाढीच्या अवतीभोवती बाजार फिरत होते. मात्र जपान, फिलिपाईन्स बरोबर झालेल्या टेरिफ डील नंतर युएस बाजारात उत्साहवर्धक वातावरण होते. विशेषतः बाजारात फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल यावर्षी एकदा तरी होईल या युएस विश्लेषकांनी ठोकलेल्या आरोळीमुळे बाजारात आणखी उसळी आली. सातत्याने युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे फेडचे मुख्य गव्हर्नर जेरोमी पॉवेल यांच्यावर टेरिफवरून व्यक्तिगत टीका करत आहेत ज्यामुळे बाजारात ठोस पावले उचलली गेली असल्याचे चित्र नाही. याखेरीज चीनने ब्रह्मपुत्रेवर जगातील सर्वात मोठे धरण बांधण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोन दिवस चीन व आशियाई बाजारातील शेअर्स उसळले होते. संध्याकाळपर्यंत हीच भावना बाजारात कायम राहिल्याने संध्याकाळ पर्यंत आशियाई बाजारातील बहुतांश शेअर बाजारात वाढ झाली आहे.

निकेयी २२५ (१.५७%), स्ट्रेट टाईम्स (०.९८%), हेंगसेंग ( ०.३५%), जकार्ता कंपोझिट (०.८३%), शांघाई कंपोझिट (०.६५%), कोसपी (०.२१%) समभागात झाली. तर घसरण केवळ सेट कंपोझिट (०.५९%) बाजारात झाली आहे. युरोपियन बाजारातही संभाव्य युके - युएस टेरिफ डील, भारत युके एफटीए डील या सगळ्या कारणांमुळे युरोपियन बाजारातही एफटीएसई (०.९०%), डीएक्स (०.४३%) बाजारात वाढ तर केवळ सीएससी (०.२५%) बाजारात घसरण झाली. सुरूवातीच्या कलात युएस बाजारातील एस अँड पी ५०० (०.७८%) बाजारात घसरण झाली आहे तर एस अँड पी ५०० (०.७८%), नासडाक (०.६१%) बाजारात वाढ झाली आहे. सतत वाढत असलेल्या युएस बाजाराने परवा एस अँड पी ५०० मध्ये नवा उच्चांक प्रस्थापित केला होता मात्र अनिश्चिततेचा फटका काल युएस बाजारतही बसला होता. भारतीय बाजारात विशेषतः अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index VIX) १ ते २% वर दिवसभरात कायम राहिल्यानेही बाजाराला स्थिरता लाभलेली नाही. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युकेला दौरा केल्याने बाजारात नव्या व्यापारी संधी मिळत असल्याने उत्साहाचे वातावरण होते मात्र हा करारावर उशीरा स्वाक्षऱ्या झाल्याने बाजारात स्थैर्य राहण्यास मदत झाली नाही. यामुळेच पुन्हा एकदा गुंतवणूकदारांची स्थिती नाजूक असून पुढील तिमाही निकाल, क्षेत्रीय विशेष कामगिरी, टेरिफ विषयी बातमी यावर पुढील बाजाराचे भवितव्य असू शकते.

आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ ओलेक्टरा ग्रीनटेक (१५.४५%), विजया डायग्नोसिस (१०.१६%), कॅनरा बँक (५.०३%), ग्रावीटा इंडिया (५.०१%), जेबीएम ऑटो (४.४६%), इंडियन बँक (४.४५%), मदर्सन (४.४७%), इटर्नल (४.२७%),वन ९७ (३.४७%), ब्रिगेड एंटरप्राईजेस (१.१२%), रेमंड लाईफस्टाईल (१.१५%), जिंदाल स्टील (२.३६%), टाटा मोटर्स (१.५१%), डॉ रेड्डीज (१.४५%), बजाज होल्डिंग्स (१.३७%), सिप्ला (०.९८%), जेल इंडिया (०.८५%),पॉवर फायनान्स (०.७२%), पंजाब नॅशनल बँक (०.६८%) समभागात झाली.

आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण इंडियन एनर्जी एक्सचेंज (२९.४९%), कोफोर्ज (९.४२%), नेस्ले इंडिया (५.४१%), महानगर गॅस (३.६९%), युटीआय एएमसी (३.१८%), श्रीराम फायनान्स (३.१६%), कजारिया सिरॅमिक्स (२.८२%), मस्टेक (२.८२%) बजा ज हाउसिंग (२.१३%), आनंद राठी वेल्थ (२.००%),जे के लक्ष्मी सिमेंट (१.६१%), श्रीराम डीसीएम (१.५७%), जेएम फायनांशियल सर्व्हिसेस (१.४५%),आयडीबीआय बँक (०.७७%), सिमेन्स (०.६२%), ट्रेंट (३.८३%), टेक महिंद्रा (३.१०%),अदानी एनर्जी (१.६३ %) आयसीआयसीआय लोंबार्ड (१.५४%), एचसीएल टेक्नॉलॉजी (१.४८%), एनटीपीसी (१.२१%), इन्फोऐज (१.२१%) समभागात झाली.

आज पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर सोन्याचे भाव घसरले आहेत. यापूर्वी अस्थिरतेत सोन्याकडे गुंतवणूक म्हणून बघताना गुंतवणूकदारांनी प्राधान्य दिल्याने सोन्याच्या पुरवठ्यात घट झाली होती. यामुळे सोने महागले होते. आज मात्र डॉलर निर्देशांकात घसरण झा ल्याने तसेच मागणीत घट झाल्याने, व रूपयात झालेल्या वाढीमुळे दरपातळी घसरली नाही. परिणामी सोन्याच्या दरात आज घसरण झाली. संध्याकाळपर्यंत सोन्याच्या जागतिक निर्देशांकात ०.८२% घसरण झाली आहे. रुपयातही डॉलरच्या तुलनेत १७ पैशाने वाढ झाल्याने सराफा बाजारात दिलासा मिळाला. याउलट रशियन तेलावर युरोपियन युनियनने लावलेल्या प्रतिबंधांमुळे, मध्यपूर्वेतील अस्थिरतेमुळे, तसेच वाढलेल्या मागणीमुळे कच्च्या तेलाच्या (Crude Oil) निर्देशांकात वाढ झाली होती. संध्याकाळपर्यंत कच्च्या ते लाच्या WTI Futures निर्देशांकात ०.७५% वाढ झाली होती तर Brent Future निर्देशांकात ०.५४% वाढ झाली आहे.

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले की,'आजचा दिवस बाजारात मरगळ दिसत होती भारत व चायना यांचे अमेरिकेतील टेरिफ अँग्रीमेंट बातमी अजून आलेली नाही जपान फिलिपाईन्स अशा देशांशी झालेले करार पहायला मिळत आहेत. भारत व युके फ्री ट्रेड अँग्रीमेंट भारतासाठी नक्कीच सकारात्मक असणार आहे.डिफेन्स करिता अनेक उपयुक्त स्पेअर्स व इतर टेक्नोलॉजी घेणे शक्य होईल. भारतीय डिफेन्सची चूणूक जगासमोर आलेली आहेच ती अजून कशी मजबूत होईल याकरीता ब्रिटनची मदत खूपच फायदेशीर असणार आहे बाजारात काल याच बातमीने आलेले चैतन्य आज मावळले.अनिल अंबानीच्या रिलायन्सवर ३५ ठिकाणी ईडीची धाड पडल्याची बातमीने बाजारात आल्याने प्राॅफिट बुकिंग झालेले दिसत होते. एकंदरीत जोपर्यंत टेरिफ ची बातमी येत नाही तोपर्यंत बाजार असाच थोडाफार राहील असे दिसतयं.'

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने आहे की,' बेंचमार्क निर्देशांकांनी सत्राची सुरुवात कमकुवत पातळीवर केली आणि संपूर्ण आठवड्याच्या समाप्ती दरम्यान दबावाखाली राहिले, कारण आयटी प्रमुख कंपन्यांक डून आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीतील नफ्यामुळे या क्षेत्रात मोठी विक्री झाली, ज्यामुळे एकूण भावनांवर परिणाम झाला. पुढील आठवड्यात अमेरिकन फेडरल रिझर्व्ह धोरण निर्णयापूर्वीही सावधगिरी बाळगण्यात आली, ज्यामुळे जागतिक बाजाराची दि शा बदलण्याची शक्यता आहे. सेन्सेक्स ५४२.४७ अंकांनी किंवा ०.६६% ने घसरून ८२१८४.१७ पातळीवर बंद झाला, तर निफ्टी १५७.८० अंकांनी किंवा ०.६३% ने घसरून २५,०६२.१० पातळीवर बंद झाला. क्षेत्रानुसार, सार्वजनिक क्षेत्रातील बँका,आरोग्यसेवा आ णि औषधनिर्माण क्षेत्रातील कामगिरी चांगली झाली आणि सकारात्मक क्षेत्रात संपली, ज्यामुळे व्यापक घसरणीचा ट्रेंड कमी झाला. याउलट, बहुतेक इतर क्षेत्रांमध्ये मोठी विक्री दिसून आली, आयटी निर्देशांक २% पेक्षा जास्त घसरला, ज्यामुळे तोटा झाला. व्यापक बाजारपेठांमध्येही विक्रीचा दबाव होता, निफ्टी मिडकॅप निर्देशांक ०.५८% आणि स्मॉल-कॅप निर्देशांक १.०९% घसरला, जो सर्व विभागांमध्ये कमकुवत प्रभाव दर्शवितो.'

आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने आहे की ,' २५२५०-२५२६० पातळी रेझिस्टन्स झोनजवळ पुरवठा दाब वाढल्यानंतर निफ्टीमध्ये घसरण दिसून आली आणि मंदीचा कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाला. तासाभराच्या काला वधीत, निर्देशांक त्याच्या ५०-ईएमएच्या (Exponential Moving Average EMA) खाली गेला आणि सत्र त्याखाली संपले, जे अल्पकालीन कमकुवतपणा दर्शवते. व्यापकपणे निर्देशांक एकत्रीकरण टप्प्यात स्थिर आहे, नजीकच्या काळात रेंज-बाउंड स्ट्रक्चर सु रू राहण्याची शक्यता आहे. नकारात्मक बाजूने २४९०० पातळीचा टप्पा एक गंभीर मागणी क्षेत्र म्हणून काम करत आहे.या पातळीखाली निर्णायक ब्रेकडाउन सुधारात्मक हालचालीला गती देऊ शकते. उलट २५२६० अडथळ्याच्या वर सतत ब्रेकडाउनमुळे वर च्या गतीच्या नवीन टप्प्यासाठी दरवाजे उघडू शकतात.'

आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने आहे की,' बँक निफ्टीने मंदीचा कॅंडलस्टिक पॅटर्न तयार केला परंतु पुन्हा एकदा २०-दिवसांच्या EMA वर, ५६८०० पातळीच्या आसपास आधार मिळाला. हा स्तर निर्देशांकासाठी सातत्याने एक प्रमुख अँकर पॉइंट म्हणून काम करत आहे. सर्वसाधारणपणे, निर्देशांक ५६ ०००-५७५०० पातळीच्या विस्तृत एकत्रीकरण (Broad Consolidation) बँडमध्ये दोलन करत राहतो. नकारात्मक बाजूने, तात्काळ आधार ५६८०० पातळीवर ठेवला आ हे, त्यानंतर ५६५०० पातळीच्या जवळ एक मजबूत मागणी क्षेत्र आहे. वरच्या बाजूने, प्रतिकार ५७३५० पातळीवर मर्यादित आहे, पुढील पुरवठा अडथळा ५७५०० पातळीच्या आसपास दिसून येतो.'

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की,' जागतिक स्तरावर सकारात्मक संकेत असूनही, भारतीय शेअर बाजार आज मोठ्या प्रमाणात घसरले, मागील वाढीला मागे टाक त. भारत-यूके मुक्त व्यापार कराराबद्दलच्या सुरुवातीच्या आशावादामुळे सावधगिरी बाळगली गेली कारण लक्ष उत्पन्नाकडे केंद्रित झाले. पहिल्या तिमाहीतील कामगिरी मंदावल्यामुळे आयटी आणि एफएमसीजी क्षेत्रांनी लार्ज-कॅप शेअर्सची घसरण के ली. पहिल्या तिमाहीतील कमाई मोठ्या प्रमाणात बरोबरीची असली तरी, प्रीमियम मूल्यांकनाचे समर्थन करत नाही; भारत २१x पी/ई या ३ वर्षांच्या उच्चांकावर व्यापार करत आहे.'

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'भारतीय शेअर बाजार मजबूत स्थितीत उघडले, निफ्टी २५२४३ पातळीपासून सुरुवात करत सुरुवातीच्या काही मिनिटांत २५,२४६ पातळीच्या उच्चांकाला स्पर्श करत होता परंतु नंतर तो घसरून २५०१८ पातळीच्या इंट्राडे नीचांकी पातळीवर घसरला. क्षेत्रीय कामगिरी मिश्रित होती, कारण सार्वजनिक क्षेत्रातील बँका,आरोग्यसेवा आणि औषध कंपन्यांच्या समभागांनी चांगली कामगिरी केली, तर आयटी बांधकाम, ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा, तेल आणि वायू क्षेत्रे मागे पडली. मॅक्रोइकॉनॉमिक आघाडीवर नवीनतम आकडेवारीवरून मजबूत उत्पादन क्रियाकलाप दिसून आले. एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय जूनमध्ये ५८.४ वरून जुलै २०२५ मध्ये ५९ .२ वर पोहोचला  तर सेवा पीएमआय ६०.४ वरून ५९.४ वर आला, जो सेवा वाढीतील माफक घट दर्शवितो. जागतिक संकेत ज्यामध्ये वॉल स्ट्रीटवरील रात्रभरातील वाढ आणि अलिकडच्या यूएस-ईयू व्यापार करारांमधील आशावाद यांचा समावेश आहे, यांनी काही आधार दिला आणि खोल घसरण कमी केली जरी जागतिक बाजारपेठेत मिश्र कल दिसून आला.

डेरिव्हेटिव्ह्ज विभागात, मंदीचे संकेत कायम राहिले, अडव्हान्स-डिकलाइन रेशो घसरणाऱ्यांकडे वळला. उल्लेखनीय म्हणजे, पर्सिस्टंट सिस्टम्स, कोफोर्ज, सुप्रीम इंडस्ट्रीज, नेस्ले इंडिया आणि टाटा कंझ्युमर सारख्या समभागांमध्ये ओपन इंटरेस्टमध्ये लक्षणीय वाढ झाली, जी बाजारातील सहभागींमध्ये वाढलेली क्रियाकलाप (Action) दर्शवते. हे सत्र लवचिक (Flexible) देशांतर्गत समष्टि आर्थिक निर्देशकांच्या पार्श्वभूमीवर जागतिक घडामोडी आणि क्षेत्र-विशिष्ट ट्रेंडबद्दल बाजाराची संवेदनशीलता अधोरेखित करते.'

आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तंत्रज्ञान विश्लेषक रूपक डे म्हणाले की,' २५२५०-२५२६० पातळीच्या आसपास तीव्र प्रतिकाराचा सामना करावा लागल्याने निफ्टी खाली घसरला. तासिक चार्टवर, निर्देशांक ५०-ईएमएच्या खाली परत आला आणि त्याच्या खाली बंद झाला. एकंदरीत, निर्देशांकाची रेंज-बाउंड हालचाल सुरू आहे, जी नजीकच्या काळातही कायम राहू शकते. नकारात्मक बाजूने, २४९०० पातळीवर आधार अबाधित आहे; या पातळीच्या खाली निर्णायक ब्रेक बाजारात सुधारणा घडवून आणू शकतो. दुसरीकडे, २५२६० पातळीच्या वर सततची हालचाल नवीन तेजी आणू शकते.'

आजच्या बाजारातील रूपयांवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,'सुरुवातीच्या व्यवहारात डॉलर निर्देशांक ९७.३० च्या जवळ कमकुवत झाल्याने रुपयाने ०.३०% वाढ नोंदवली. तथापि, डॉलर निर्दे शांक दिवसाच्या आत सुधारू लागल्याने, रुपयाने आपली वाढ सोडून दिली आणि दिवसाच्या ८६.२५ च्या उच्चांकावरून ८६.४० च्या जवळ स्थिरावला. पुढील आठवड्यात होणाऱ्या यूएस फेडरल रिझर्व्ह धोरण निर्णयापूर्वी बाजारातील सहभागी सावधगिरी बाळग तात, ज्यामुळे पुढील दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. नजीकच्या काळात रुपया ८५.८५-८६.६५ च्या श्रेणीत व्यापार करण्याची शक्यता आहे.'
Comments
Add Comment

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

पाकिस्तानमधून आरडीएक्सने राम मंदिर उडवण्याचा मेसेज; गुन्हा दाखल

बीड : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री राम मंदिर उडवण्याचा मेसेज थेट पाकिस्तानातून बीड जिल्ह्यातील एका तरुणाला

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी

सांगा चूक कोणाची? लपवाछपवी कोणासाठी? बीएमसी आणि म्हाडामध्ये घमासान!

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) यांच्यात चांदिवलीतील

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार