मुंबई : टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. मँचेस्टर येथे सुरू असलेल्या कसोटीत टीम इंडियाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) दुखापतीमुळे बाहेर पडल्याने भारतीय संघाला खूप मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सचा एक चेंडू पंतच्या बुटावर लागला, त्यामुळे तो वेदनेने ओरडू लागला. त्यामुळे पंतला ताबडतोब मैदानाबाहेर काढण्यात आले. पंतच्या पायाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झालं असून त्याला ६ आठवडे आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे टीम इंडियाच्या अडचणी खूप वाढल्या आहेत आणि आता त्यांना मँचेस्टर कसोटी सामन्यात फक्त ९ फलंदाजांसह मैदानात उतरावे लागेल. ऋषभ पंतला (Rishabh Pant Injury) ६ आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. आता पंतच्या जागी टीम इंडियाच्या १५ सदस्यांच्या संघात इशान किशनचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.
मॉस्को: रशियात चीनच्या सीमेला लागून असलेल्या अमूर प्रदेशात ४९ जणांना घेऊन निघालेले एक रशियन प्रवासी विमान भीषण अपघातात कोसळले. या दुर्दैवी घटनेत ...
टीम इंडियाकडून फक्त १० जण करणार फलंदाजी
ऋषभ पंतच्या जागी दुसरा कोणताही फलंदाज फलंदाजी करू शकणार नाही. ध्रुव जुरेल निश्चितपणे पंतच्या जागी विकेटकीपिंग करु शकणार, मात्र त्याला फलंदाजीसाठी परवानगी नसणार.
COMEBACK STRONG, RISHABH PANT. 🤞pic.twitter.com/eTNeOV1wI2
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 23, 2025
६ आठवड्यांसाठी पंत बाहेर?
सामन्याच्या ६८ व्या षटकात ऋषभ पंतला दुखापत झाली. ऋषभ पंतला ख्रिस वोक्सच्या चेंडूवर रिव्हर्स स्विप मारायचा होता, मात्र तो हा फुल टॉस बॉल पूर्णपणे चुकवल्याने चेंडू पंतच्या उजव्या बोटावर लागला. पंतने त्याचा बूट काढला तेव्हा त्याला दिसले की थोडा रक्तस्त्रावही होत आहे. काही वेळाने त्याच्या पायावर सूज देखील दिसू लागली. तो चालण्यास असमर्थ होता, त्यानंतर मैदानावर रुग्णवाहिका बोलावत पंतला रुग्णालयात हलवण्यात आले होते.
चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी काय घडले?
इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी संघाला चांगली सुरुवात दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. यानंतर केएल राहुल ४६ धावांवर बाद झाला. तर यशस्वी जैस्वाल ५८ धावांवर बाद झाला. शुभमन गिलही अपयशी ठरला. बेन स्टोक्सने १२ धावांवर शुभमन गिलला बाद केले. संघात पुन्हा परतलेल्या साई सुदर्शनने ६१ धावा केल्या. तर ऋषभ पंत रिटायर्ड हर्ट झाला. रवींद्र जडेजा १९ आणि शार्दुल ठाकूर १९ धावांवर खेळत आहे.