मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण, आरोपींच्या सुटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

  66

नवी दिल्ली: मुंबईमध्ये ११ जुलै २००६मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील सर्व १२ आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाने सुटका केल्याचा निर्णय दिला आहे. आता या निर्णयाविरोधात सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर आज यावर सुनावणी केली जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यावर आज सुनावणी होणार आहे.


मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी सत्र न्यायालयाने १२ पैकी पाच आरोपींना फाशीची शिक्षा, तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने काल या सर्व आरोपींबाबतचा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करून त्यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश दिले. मात्र आता या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.


विशेष न्यायालयाने या प्रकरणी १३ आरोपींवर खटला चालवला होता. त्यात कमाल अन्सारी (आता मृत), मोहम्मद फैझल अत्तार रहमान शेख, एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दिकी, नाविद हुसेन खान आणि आसिफ खान यांना विशेष न्यायालयाने बॉम्ब ठेवल्याच्या मुख्य आरोपांसह अन्य आरोपांत दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. तर, तन्वीर अहमद मोहम्मद इब्राहिम अन्सारी, मोहम्मद माजिद मोहम्मद शफी, शेख मोहम्मद अली आलम शेख, मोहम्मद साजिद मार्गुब अन्सारी, मुझम्मिल अतौर रहमान शेख, सुहेल मेहमूद शेख आणि जमीर अहमद लतीउर रहमान शेख यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. वाहिद शेख याला न्यायालयाने निर्दोष ठरवले होते. गेल्या १९ वर्षांपासून कैदेत असलेल्या सर्व आरोपींची जामिनावर तातडीने सुटका करण्याचे आदेश न्यायमूर्ती किलोर आणि न्यायमूर्ती चांडक यांच्या खंडपीठाने दिले.


Comments
Add Comment

विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे उज्जैनमध्ये अनावरण

उज्जैन : बहुचर्चित विक्रमादित्य वैदिक घड्याळ आणि मोबाइल ॲपचे अनावरण मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव

भारतासोबत सेमीकंडक्टरचे भविष्य घडवण्यास जग तयार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : जगाची शक्ती सेमीकंडक्टर चिप्समध्ये एकवटली;पूर्वी तेलाच्या विहिरीद्वारे भविष्य ठरायचे, एक दिवस जग

शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक!

नवी दिल्ली : शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी)उत्तीर्ण करणे आता शिक्षकांसाठी बंधनकारक आहे, असा मोठा निर्णय सोमवारी

अभिनेता सलमान खानने घेतली राजनाथ सिंह यांची भेट

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानने आज, रविवारी दिल्लीत लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट

आसारामला मोठा झटका! हायकोर्टाने अंतरिम जामीन नाकारला, ३० ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश

नवी दिल्ली: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूच्या अडचणी

एकाच पाषाणात १९० टन वजनाची गणेशमूर्ती

कोईम्बतूर : दक्षिण भारतातील ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाणारे कोईम्बतूर शहर अद्वितीय गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध