दिल्लीत मराठीचा झेंडा

जेएनयूमध्ये कुसुमाग्रज अध्यासन केंद्राचे
आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन


मुंबई : देशात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात महाराष्ट्र सरकारच्यावतीने उभारण्यात आलेल्या कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन गुरुवारी होणार असून या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपस्थित राहणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी येथे दिली.


जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला आपण दोन महिन्यापूर्वी भेट दिली होती. तेथील कुलगुरुंशी चर्चा केल्यानंतर १६ वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकारने तेथे मराठी भाषा अध्यासन केंद्रासाठी २ कोटी रूपये दिल्याचे समजले. त्यासाठी त्यांनी आणखी तीन कोटीची मागणी केली असता मराठी भाषा विभागाचा मंत्री म्हणून तो निधी देण्याचा निर्णय त्याच क्षणी घेतला.


पण त्या मराठी अध्यासन केंद्राला कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्र असे नाव द्यावे अशी सूचना केली असता त्यांनी ती मान्य केल्याचे सामंत यांनी सांगितले. तसेच एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अध्यासन केंद्रासाठी १० कोटी रुपये वर्ग केले होते,असे सामंत यांनी सांगितले.


आता गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्र आणि व्यक्तिमत्वावर अभ्यास करण्यासाठी सुरू होणाऱ्या अध्यासन केंद्राचा उद्घाटन सोहोळा होणार आहे. दिल्लीत मराठी भाषेचे अध्यासन केंद्र सुरु करणे हे मराठी माणसासाठी अभिमानाचे आहे. मराठी भाषेला सातासमुद्रापार घेऊन जाता येत असेल, देशाच्या कानाकोपऱ्यात मराठी पोहोचवायची असेल तर दिल्लीतील जेएनयूसारख्या विद्यापीठात अध्यासन केंद्र होणे गरजेचे होते, असेही सांमत म्हणाले.

Comments
Add Comment

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून जादा गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक

मुंबई मेट्रो ३ मध्ये 'उतरण्यासाठी' जिना नाही; प्रवाशांना त्रास

मुंबई : मुंबईच्या नवीन मेट्रो लाईन ३ (Aqua Line) च्या मेट्रो स्टेशनवर खाली उतरण्यासाठी सरकते जिने (Escalators) नाहीत. ऑक्टोबर

मालाडमधील फोर डायमेंशन इमारतीला आग

मुंबई: मालाड पश्चिम येथील माइंडस्पेसजवळ लिंक रोडवरील फोर डायमेंशन बिल्डिंगमध्ये शुक्रवारी आग लागली. मुंबई

मुंबईच्या काळाचौकी परिसरात रक्तरंजित थरार!

प्रेमभंगातून तरुणाचा प्रेयसीवर जीवघेणा हल्ला, नंतर स्वतः केली आत्महत्या मुंबई : मुंबईतील काळाचौकी भागात एक खूप

हातपाय बांधले आणि चोर समजून तरुणाला मरेपर्यंत मारले

मुंबई : चोर सोडून संन्याशाला फाशी ही म्हण मुंबईतील गोरेगावमध्ये काही प्रमाणात खरी ठरली. गोरेगावच्या तीन डोंगरी