गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या, अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी


नवी दिल्ली : येत्या गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांच्या सुविधा वाढवतानाच काही गाड्यांचे थांबेही वाढवावेत. जेणेकरून चाकरमान्यांना आपल्या गावी पोहोचणे सहज सुलभ होईल. गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या चालवतानाच रेल्वे सेवांमध्ये तातडीने आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. स्लीपर आणि जनरल डब्यांचे अतिरिक्त कोच वाढवा, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली.


यावेळी गणेशोत्सवात विशेष गाड्या सोडतानाच अधिकच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत रेल्वे प्रशासनाला तत्काळ सूचना देत असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी संगितले.
गणेशोत्सवातील रेल्वेसेवेबाबत लक्ष वेधण्यासाठी बुधवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची खा.


नारायण राणे यांनी भेट घेत चर्चा केली आणि निवेदनही सादर केले. कोकणातील गणेश चतुर्थी उत्सव म्हणजे मोठा सण. महाराष्ट्राच्या विविध भागांमधून असणारे कोकणवासी या उत्सवात आपल्या गावच्या घरी परततात.


यावेळी उपलब्ध असणारी सर्व वाहतूक अपुरी पडते. २७ ऑगस्ट रोजी होत असलेल्या गणेश चतुर्थी उत्सवात कोकणात पोहोचण्यासाठी रेल्वे प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते, ज्यामुळे गर्दी वाढते व रेल्वे आरक्षण मिळवण्यात अडचणी येतात.


भारतीय रेल्वेने ऐतिहासिकदृष्ट्या या उत्सवादरम्यान विशेष गाड्या चालवल्या आहेत. गेल्या वर्षी गणेशोत्सवासाठी ३४२ विशेष गाड्या चालवल्या आहेत. हे अतिशय स्वागतार्ह पाऊल होते आणि कोकणात प्रवास करणाऱ्यांना त्याचा खूप फायदा झाला. यावर्षी यापेक्षाही जास्त गाड्यांचे नियोजन व्हावे अशी मागणी यावेळी खा. नारायण राणे यांनी केली आहे.




अनेक मुद्द्यांकडे निवेदनातून वेधले लक्ष


रेल्वे मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात खा. राणे यांनी अनेक मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. मुंबई आणि पुणेसारख्या प्रमुख शहरांना चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि कोकण रेल्वे मार्गावरील इतर महत्त्वाच्या स्थानकांशी जोडणाऱ्या विशेष रेल्वे सेवांची संख्या वाढवा.


या विशेष गाड्यांची वेळेवर घोषणा आणि आरक्षण सुरू करण्याची खात्री करा, जेणेकरून प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे आधीच नियोजन करता येईल आणि शेवटच्या क्षणी होणारी गर्दी आणि गैरसोय टाळता येईल.


प्रवाशांच्या गर्दीला सामावून घेण्यासाठी, कोकणातील विविध ठिकाणी जाण्यासाठी काही विशेष गाड्यांचे मार्ग थांबे वाढवा. पुरेशा आणि कार्यक्षम रेल्वे सेवा उपलब्ध करून दिल्यास प्रवासातील अडचणी कमी होतील आणि उत्सवाचा आनंदही वाढेल असे रेल्वेमंत्र्यांकडे त्यांनी भूमिका मांडली आहे. यावेळी सर्व सेवा सकारात्मक पुरविण्याचे अभिवचन रेल्वे मंत्र्यांनी दिले आहे.

Comments
Add Comment

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे