
लंडन : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे मोदींचा हा ब्रिटन दौरा खास असणार आहे. भारत आणि यूके या दोघांमध्ये २३ ते २४ जुलैपर्यंत असणाऱ्या या दौऱ्यादरम्यान एक ऐतिहासिक करार होणार आहे, तो म्हणजे भारत-यूके फ्री ट्रेड ॲग्रीमेंट (FTA). या कराराला भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने आधीच मान्यता दिली आहे. आता फक्त ब्रिटनमध्ये पंतप्रधान मोदींच्या स्वाक्षरीने तो औपचारिक होणार आहे. या मुक्त व्यापार कराराचा परिणाम केवळ कंपन्या किंवा व्यावसायिकांपुरता मर्यादित राहणार नाही, तर त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावरही होणार आहे. अनेक गोष्टी स्वस्त होऊ शकतात, तर काही गोष्टींच्या किमती वाढूसुद्धा शकतात.
फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे काय ?
फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे मुक्त व्यापार करार. ज्यामध्ये दोन देश एकमेकांमधील आयात आणि निर्यातीवरील सीमाशुल्क कमी करतात किंवा पूर्णपणे रद्द करतात. याचा फायदा असा की दोन्ही देशांची उत्पादने एकमेकांच्या बाजारपेठेत स्वस्त दरात पोहोचतात. भारत-यूके एफटीए अंतर्गत, भारतातून यूकेला जाणाऱ्या ९९% उत्पादनांवर कोणताही कर लागणार नाही, तर भारत यूकेमधून येणाऱ्या ९०% वस्तूंवरील कर कमी करेल.

मुंबई : राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे २० जिल्हाध्यक्ष शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत ...
पंतप्रधान मोदी आणि केअर स्टारमर (FTA)स्वाक्षरी करतील
भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारामुळे (एफटीए) २०३० पर्यंत दोन्ही अर्थव्यवस्थांमधील व्यापार दुप्पट करून १२० अब्ज अमेरिकन डॉलर पर्यंत पोहोचण्यास मदत होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टारमर यांच्या उपस्थितीत व्यापक आर्थिक आणि व्यापार करारावर (एफटीए) स्वाक्षरी केली जाईल.
या गोष्टी होऊ शकतात स्वस्त
या करारानंतर, चामड्याची उत्पादनं: चामड्याचे जॅकेट, बॅग्ज आणि शूज यासारख्या वस्तू आता परवडणाऱ्या किमतीत मिळू शकतात.
मोबाईल, लॅपटॉप आणि गॅझेट्स: इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवरील कर कमी झाल्यामुळे या वस्तू स्वस्त होऊ शकतात.
शूज, कपडे आणि फॅशन उत्पादने: आता यावर शून्य कर असेल किंवा खूप कमी कर असेल, ज्यामुळे बाजारात त्यांच्या किमती कमी होऊ शकतात. यांत, व्हिस्की, चॉकलेट, बिस्किटे, सॅल्मन मासे, कॉस्मेटिक वस्तू, वैद्यकीय उत्पादने आणि लक्झरीअस कारचा समावेश असेल.
दागिने : यूकेमधून येणाऱ्या दागिन्यांवरील कस्टम ड्युटीमध्ये कपात केल्याने त्यांच्या किमतीही कमी होऊ शकतात.