आज विशेष म्हणजे बीएसईत (BSE) मध्ये ४१९८ समभागांपैकी १९९८ समभाग तेजीत राहिले असून २०३२ समभागात मात्र नुकसान झाले आहे. एनएसईत (NSE) ३०५३ समभागांपैकी १४९९ समभागात वाढ झाली असून १४६१ समभागात आज नुकसान झाले आहे. निरिक्षणाची गोष्ट म्हणजे बीएसईत २१४ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत तर एनएसईत ७९ समभाग अप्पर सर्किटवर कायम आहेत. आज सकाळी मिळालेल्या गिफ्ट निफ्टीतील वाढीमुळे अखेरच्या सत्रात वाढ अपेक्षित असली तरी वाढीचा वेग दुपा री ११ नंतर वाढला होता. अस्थिरता निर्देशांकात झालेली घसरण प्रामुख्याने युएस जपान टेरिफ डीलनंतर, तसेच चीनमध्ये नव्या घडामोडीनंतर झाली आहे. फिलिपाईन्सशीही युएसने यशस्वीपणे डील केलेले असल्याने बाजारात आज आश्वासकता बळावली आहे. ब्लू चिप्स स्क्रिप (Scrips) मध्ये झालेल्या वाढीबरोबरच मिड व स्मॉल कॅप समभागात झालेल्या वाढीमुळे बाजाराला आधार मिळाला. फायनांशियल सर्व्हिसेस व बँक निर्देशांकातील उसळीने संभाव्य घसरणीला आळा बसून बाजाराला सपोर्ट लेवल प्राप्त झाली आहे.
आयटी क्षेत्रातील कंपनीच्या असमाधानकारक कामगिरीनंतर बँक निर्देशांकाने बाजाराला आधार मिळाला. याशिवाय निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकाने चांगली कामगिरी केल्याने सामुदायिक कामगिरीमुळे बाजारात वाढ होऊ शकली. अजूनही भारताशी टेरिफ डील रद्द झाल्यावर नवी घडामोड घडली नाही त्यामुळे गुंतवणूकदारांना रेसिप्रोकल टेरिफची चिंता कायम आहे. दुसरीकडे युकेशी आपला एफटीए (Free Trade Agreements FTA) निश्चित झाल्यामुळे बाजारात ' बुस्टर' भावना कायम होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यां च्या संभाव्य युके दौऱ्यामुळे लवकरच या गोष्टींना आधार मिळू शकतो. काल संसदेनेही या कराराला मान्यता दिली आहे.
अमेरिकेतील बाजारात महागाई वाढत असली तरी ती नियंत्रित पातळीवर आहे. सप्टेंबरमध्ये फेड दरकपात होईल या आशेने अनेक गुंतवणूकदारांनी युएस बाजारात गुंतवणूक स्थिर ठेवल्या आहेत. मात्र फेड व युएस सरकारमधील संघर्ष सर्वश्रुत आहे अशातच यु एस सरकारी प्रतिनिधींनी फेड गव्हर्नर जेरोमी पॉवेल यांच्यावर कर संकलनाविषयी गंभीर आरोप केल्याने यावर काहीतरी मोठी घडामोड अपेक्षित आहे.याशिवाय आज भारतीय बाजारात आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्स, टाटा मोट र्स, बजाज फायनान्स अशा हेवी वेट कंपनीच्या शेअर्सने संध्याकाळपर्यंत उसळी मारल्याने बाजाराचे चित्र पालटले गेले. परंतु सिमेंट कंपन्यांनी, काही प्रमाणात कंज्यूमर ड्युरेबल्स उत्पादनांनी व विशेषतः रिअल इस्टेट शेअर्सने घसरण दर्शविल्याने बाजारात आण खी रॅली होऊ शकली नाही.
आज सकाळपर्यंत सोन्याने व चांदीने रेकोर्डब्रेक वाढ नोंदवली होती. रूपयांच्या तुलनेत डॉलर सकाळपर्यंत वधारला होता त्याचा आणखी फटका भारतीय सराफा बाजारात बसला. जागतिक अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात सोन्याचांदीत गुंतवणूक क रत असल्याने त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला. संध्याकाळपर्यंत सोन्याच्या जागतिक निर्देशांकात ०.२५% घसरण झाली आहे्. ही घसरण ट्रम्प यांच्या जपानवरील निर्णयानंतर गुंतवणूकदारांना दिलासा मिळाल्याने झाली. पण त्याचे परिवर्तन भारतीय बा जारपेठेत रूपयांच्या घसरणीने होऊ शकले नाही. भारतीय उपखंडात तुलनेने सोन्याच्या मागणीत वाढच होत असल्याने त्याचाही परिणाम सोन्याच्या किंमतीत झाला. आज कच्च्या तेलाच्या (Crude Oil) WTI Futures निर्देशांकात ०.८१% घसरण संध्याकाळपर्यं त झाली आहे. Brent Futures निर्देशांकात ०.७०% घसरण सकाळच्या सत्रात झाली जी प्रामुख्याने मुबलक प्रमाणात पुरवठा असल्याने व तेलाच्या घटत्या मागणीमु ळे झाली. तरीही तेलाचे प्रति बॅरेल दर ६८.०० डॉलरहून अधिक आहे.
अमेरिका युरोप व्यापारातील वाढत्या तणावामुळे आणि १ ऑगस्ट रोजी लागू होणाऱ्या कर मुदतीमुळे कच्च्या तेलाच्या किमती सतत तिसऱ्या सत्रात तोट्यात आहेत. रशियन तेल उत्पादनांना लक्ष्य करून युरोपियन युनियनने लावलेल्या नवीनतम निर्बंधांमुळे भारता तून डिझेल निर्यातीत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे परंतु मध्यस्थांद्वारे रशियन तेलाचा पुरवठा सुरू राहिल्यामुळे एकूण बाजारातील तेलासाठी तितक्या तीव्रतेने भावना नाहीत असे तज्ञांचे म्हणणे आहे.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ एमआरपीएल (७.६५%), ओला इलेक्ट्रिक (७.१७%), जेएम फायनांशियल (५.४९%), गोदरेज अँग्रोवेट (४.७२%), नेटवेब टेक्नॉलॉजी (३.१९%), डिक्सन टेक्नॉलॉजी (२.७६%), आर आर केबल्स (२.५९%),टाटा मोटर्स (२.४८%), आयडीबीआय बँक (२.२३%), श्रीराम फायनान्स (२.१७%), वन ९७ (१.९१%), एचडीएफसी बँक (०.८६%), रिलायन्स इंडस्ट्रीज (०.८४%), अँक्सिस बँक (०.६२%), आयआरएफसी (३.१२%), श्रीराम फायनान्स (२.१७%), बजाज फायनान्स (१.६५%), मारूती सुझुकी इंडिया (१.०८%) समभागात वाढ झाली.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण लोढा डेव्हलपर (७.५१%), एबी रिअल इस्टेट (५.५५%), मस्टेक (४.०८%), झी एंटरटेनमेंट (३.८६%), होनसा कंज्यूमर (३.५३%), ओबेरॉय रिअल्टी (३.०१%), दालमिया भारत (२.१८%), विशाल मेगामार्ट (०.७८%), टाटा कं ज्यूमर प्रोडक्ट (२.०५%), आयसीआयसीआय लोंबार्ड (१.३०%), हिंदुस्थान एरोनॉटिक्स (०.८९%), इंटरग्लोब एव्हिऐशन (०.८६%), ग्रासीम इंडस्ट्रीज (०.५०%), अदानी पॉवर (०.२७%) समभागात झाली.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की,' भारतीय शेअर बाजाराने आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीच्या उत्पन्नात संमिश्र सुरुवात असूनही लवचिकता दा खवली. अमेरिका-जपान व्यापार कराराच्या सभोवतालच्या आशावादामुळे जागतिक स्तरावर सकारात्मक संकेतांनी भावनांना पाठिंबा दिला आहे. याव्यतिरिक्त, भारत-यूके एफटीए अंतिम करण्याच्या प्रगतीमुळे रचनात्मक दृष्टिकोनाला आणखी हातभार लागला आहे. जागतिक व्यापार वाटाघाटींमध्ये सतत प्रगतीमुळे नजीकच्या काळात व्यापार तणाव कमी होण्याची आणि बाजारपेठेतील अधिक स्थिरता वाढण्याची अपेक्षा आहे. वाढलेले मूल्यांकन चिंतेचे कारण असले तरी, सध्याची बाजारपेठेतील ताकद नजीकच्या काळात उत्पन्न पुनर्प्राप्तीची शक्यता दर्शवते. तथापि, या पुनर्प्राप्तीची (Recovery) गती आणि शाश्वतता बाजाराच्या पुढील मार्गाला आकार देण्यासाठी महत्त्वपूर्ण असेल.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'भारतीय शेअर बाजाराने आजच्या सत्राची सुरुवात सकारात्मक दिशेने केली, निफ्टी २५,१३९ पातळीवर उघडल्यानंतर काही काळासाठी २५० ८५ पातळीच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आणि नंतर तो २५१८८ पातळीच्या इंट्रामॅच उच्चांकावर पोहोचला. बँकिंग, वित्तीय सेवा, ऑटोमोबाईल्स, आरोग्यसेवा आणि माहिती तंत्रज्ञान यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे चांगली कामगिरी होती. याउलट, रिअल्टी, मीडिया, ग्राहकोपयोगी वस्तू आणि धातूंमध्ये कमकुवतपणाचे वातावरण कायम राहिले, जे क्षेत्रीयदृष्ट्या विभाजित परिदृश्य (Bifurcated Landscape) दर्शवते.'
जागतिक स्तरावर अमेरिका-जपान व्यापार कराराच्या सभोवतालच्या आशावादी घडामोडींमुळे गुंतवणूकदारांच्या भावना वाढल्या, ज्यामुळे नजीकच्या भविष्यात आणखी आंतरराष्ट्रीय करार होण्याची अपेक्षा निर्माण झाली. स्टॉकहोममध्ये होणाऱ्या वॉशिंग्टन-बी जिंग व्यापार वाटाघाटींच्या अपेक्षेने सकारात्मक गती आणखी वाढली, ज्यामुळे गुंतवणूकदारांना आशा आहे की तणाव कमी होईल आणि सीमापार व्यापार वाढेल.स्थानिक पातळीवर, बाजारातील सहभागींनी इन्फोसिस आणि डॉ. रेड्डीज सारख्या आघाडीच्या कंप न्यांकडून येणाऱ्या उत्पन्न अहवालांकडे बारकाईने लक्ष दिले, जे दोन्ही आज नंतर त्यांचे तिमाही निकाल जाहीर करणार आहेत - अशा घोषणा ज्या पुढील सत्रांमध्ये क्षेत्रीय भावनांसाठी टोन सेट करतील. डेरिव्हेटिव्ह्ज विभागात, बाजारपेठेची व्याप्ती लक्षणीयरी त्या तेजीची होती, जी अनुकूल आगाऊ-घसरण गुणोत्तराद्वारे दिसून येते. लोढा, ओबेरॉय रिअलिटी, 360 वन, आयआरएफसी आणि कोलगेट-पामोलिव्ह सारख्या काउंटरमध्ये लक्षणीय ओपन इंटरेस्ट संचय (Integration) दिसून आला, ज्यामुळे गुंतवणूकदारांची क्रि याकलाप वाढली आणि पर्याय आणि फ्युचर्स स्पेसमध्ये विश्वास वाढला.'
आजच्या दिवसभरातील निफ्टीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तंत्रज्ञान विश्लेषक रूपक डे म्हणाले,'निफ्टीने दैनंदिन कालावधीत २१ दिवसांच्या EMA (Exponential Moving Average EMA) च्या वर झेप घेतली आहे, जी अमेरि का आणि जपानमधील व्यापार करारानंतर सुधारित आशावादामुळे तेजीच्या भावनेत वाढ दर्शवते. दैनिक चार्टवरील RSI (Relative Strength Index RSI) तेजीच्या क्रॉसओवरमध्ये आहे आणि ५० च्या वर वाढत आहे, ज्यामुळे सकारात्मक गती आणखी मज बूत होते. अल्पावधीत भावनेत आशावादी राहण्याची शक्यता आहे. वरच्या बाजूस, निफ्टी २५५०० पातळीच्या दिशेने जाऊ शकतो, तर समर्थन २४९०० पातळीवर आहे. या पातळीपेक्षा कमी ब्रेकमुळे सध्याचा ट्रेंड कमकुवत होऊ शकतो.'
आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालींवर निरिक्षण नोंदविताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,' सोन्याच्या किमती उच्च पातळीच्या जवळ मर्यादेत राहिल्या, MCX १,०३,५०० पातळीच्या जवळ व्यवहार करत होता, ज्यामुळे कॉमेक्स सोन्याचे संकेत मिळाले, जे $३,४२४ पातळीच्या आसपास स्थिर होते रुपयादेखील स्थिर राहिला, ज्यामुळे देशांतर्गत सोन्याच्या किमतीतील अस्थिरता मर्यादित राहिली. बाजारातील सहभागी आता आगामी यूएस मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिसेस PMI (Purchasing Manager Index PMI) डेटामधून प्रमुख आर्थिक संकेतांची वाट पाहत आहेत. अल्पावधीत एमसीएक्स (MCX )वर सोने ९९००० ते १,०१,५०० पातळीच्या श्रेणीत व्यापार होण्याची अपेक्षा आहे.'
आजच्या बाजारातील रूपयांच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,'रुपया ८६.४० पातळीच्या जवळ एका अरुंद श्रेणीत स्थिर राहिला, डॉलरच्या तुलनेत ०.०१% च्या किरकोळ हालचा लीसह.. बाजारांना पुढील संकेतांची वाट पाहत असताना डॉलर निर्देशांक देखील ९७.४० पातळीच्या आसपास स्थिर राहिला. देशांतर्गत भांडवली बाजार ०.६५% वाढले, तर फेड चेअर पॉवेल यांच्या अलीकडील भाषणामुळे डॉलर श्रेणीबद्ध राहिला. आता लक्ष पुढी ल आठवड्यात होणाऱ्या यूएस व्याजदर निर्णयाकडे वळले आहे, जो एक प्रमुख दिशात्मक ट्रिगर असेल. रुपया ८५.८०-८६.७० पातळीच्या श्रेणीत व्यापार करण्याची अपेक्षा आहे.'
त्यामुळे एकूणच परिस्थिती पाहता कंसोलिडेशन फेजनंतर पुन्हा आजच्या बाजारातील वाढ झाल्याने बाजारात आश्वासक चित्र आहे. विशेषतः आशियाई बाजारातील वाढीनंतर भारतीय बाजारपेठेत उद्या क्षेत्रीय निर्देशांकात काय घडेल यावरही पुढील चित्र अवलंबून असेल. बाजाराला सपोर्ट लेवल ब्लू चिप्स कंपनीच्या शेअर्समध्ये तसेच बँक निर्देशांकात वाढ कायम राहिल्यास उद्या मिळू शकते. दरम्यान १ ऑगस्टपर्यंत भारत युएस टेरिफ करारावही पुढील बाजारातील कार्यवाही असेल.