शाहीद कपूरचा 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमा बंद

मुंबई : शाहिद कपूर बॉलिवूडमधला आघाडीचा अभिनेता आहे. गेल्या वर्षीच शाहिद कपूर छत्रपती शिवाजी महाराज सिनेमात महाराजांची भूमिका साकारणार अशी घोषणा 'ओएमजी २'चे दिग्दर्शक अमित राय यांनी केली होती.आता वर्षभरानंतर अमित राय यांनी त्या सिनेमावर भाष्य करत हा सिनेमा बंद झाला असल्याचा खुलासा केला आहे. यासाठी त्यांनी बॉलिवूडलाच 'क्रूर' ठरवलं आहे.


अमित राय म्हणाले, " आपली सिस्टीम खूप क्रूर आहे. भले मी १८० कोटींचा ओएमजी 2 सारखा सिनेमा करुन स्वत:ला सिद्ध केलं असेल तरी हे पुरेसं नाही. कास्टिंग, प्रोडक्शन, स्टार आणि मॅनेजमेंटच्या या सिस्टीममध्ये दिग्दर्शकाने कसं काम करावं? पाच वर्ष तुमच्याकडे एक गोष्ट आहे आणि काही मिनिटात दुसराच व्यक्ती पाच पानांवर सिनेमात काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे लिहितो."


"मला या अनुभवातून शिकवण मिळाली. म्हणूनच मी माझ्या पुढच्या सिनेमाची स्वत:च निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. त्या सिनेमात पंकज त्रिपाठींचीही भूमिका होती. तसंच अक्षय कुमारनेही त्यांना सिनेमासाठी माझा विचार का नाही केला असा प्रश्न विचारला होता. अभिनेता बॉक्सऑफिवर काय चालतंय तसाच सिनेमा निवडणार हे स्वाभाविक आहे. असे खूप कमी कलाकार आहेत जे माझ्यासोबत प्रामाणिक होते. काही वेळेला त्यांना समाजाला आरसा दाखवणाऱ्या सिनेमात रस नव्हता तर त्यांना लव्हस्टोरी करायची होती. जेव्हा मी त्यांच्याकडे लव्हस्टोरी घेऊन गेलो तेव्हा ते म्हणाले,'हा फारच खर्चिक सिनेमा आहे आणि ऐतिहासिक प्रेम कथा आहे.' त्यामुळे त्यांचा क्रायटेरिया कायमच बदलत राहतो. खरं तर तुम्ही त्यांच्या सर्कलमध्ये एकदा का गेलात की मगच ते तुमच्या सिनेमाला होकार देतात."


शाहिद कपूरचा 'देवा' सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. याशिवाय नंतर तो आगामी अॅक्शन थ्रिलर 'अर्जुन उस्तारा' सिनेमात दिसणार आहे.

Comments
Add Comment

'नागिन ७' मध्ये दिसणार प्रियांका चहर चौधरी

मुंबई: अखेर एकता कपूरने, 'नागिन ७' या शोमध्ये यावेळी मुख्य भूमिकेत प्रियंका चहर चौधरी ही अभिनेत्री दिसणार आहे.

बॉलीवूड अभिनेता पंकज त्रिपाठी यांना मातृशोक

मुंबई : बॉलीवूडमधील अभिनेता पंकज त्रिपाठी याची आई हेमवंती देवी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले, त्या ८९

तेजश्री प्रधान 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेतून बाहेर? सोशल मीडियावरील चर्चांवर ; अभिनेत्रीचं स्पष्ट उत्तर

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या स्वानंदीची

शाहरुखचा ६० वा वाढदिवस! मात्र बॉलिवूड बादशहा घराच्या गॅलरीत आलाच नाही, चाहत्यांचा हिरमोड

मुंबई: बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानने आता साठी ओलांडली आहे. रविवारी २ नोव्हेंबरला शाहरुखचा साठावा वाढदिवस होता.

रील्सस्टारना मालिका आणि चित्रपटांमध्ये संधी देण्याबाबत 'या' मराठी कलाकाराने व्यक्त केली नाराजी

मुंबई : आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहेतच. याच

दिग्गज अभिनेते धर्मेंद्र अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल; नेमके काय झाले ?

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र सध्या मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत.