याविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना बँकेचे सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर म्हणाले की,' सारस्वत बँकेने विलीनीकरणाच्या प्रस्तावासह मध्यवर्ती बँकेकडे संपर्क साधल्यानंतर रिझर्व्ह बँकेने तत्वतः मान्यता दिली आहे आणि अंतिम मंजुरी दोन्ही बँकांच्या भाग धारकांवर अवलंबून असेल. विलीनीकरणानंतर, सारस्वत बँक न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व मालमत्ता आणि दायित्वे ताब्यात घेईल आणि ठेवीदारांचे हित पूर्णपणे संरक्षित केले जाईल.'
साधारणतः उपलब्ध माहितीनुसार,ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत एकत्रिकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या दोन्ही बँका आपले कायदेशीर प्रक्रिया पार पाडत आहेत. यापूर्वी न्यू इंडिया बँकेच्या खातेदारांना केवळ २५००० रूपये खात्यातून काढण्याची परवानगी मिळा ली होती. बिघडलेली आस्थापना, बिघडलेले व्यवस्थापन (Corporate Governance) या पार्श्वभूमीवर आरबीआयने न्यू इंडिया बँकेवर कठोर निर्णय घेतला होता. त्यामुळेच या एकत्रीकरणानंतर बँक ग्राहकांच्या चिंतेला तिलांजली मिळणार आहे.
सारस्वत बँक ही भारतातील सर्वात मोठी सहकारी बँक ओळखली जाते. सारस्वतने गेल्या काही वर्षांतच सातहून अधिक बँकेचे अधिग्रहण केले होते. सारस्वत बँकेने इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत ५१८.२५ कोटींचा निव्वळ नफा (Net Profit) नोंदवला होता. तर बँकेच्या स्थूल एनपीए (Gross Non Performing Assets NPA) केवळ २.२५% राहिला होता. बँकेची आर्थिक स्थिती मजबूत असल्याने कंपनीने हा निकाल नोंदवला.