IPO News: आजपासून 'या' दोन कंपनीच्या आयपीओचे आगमन ! जाणून घ्या IPO ची इत्यंभूत माहिती

  58

Indiqube Space Limited व GNG Electronics Limited कंपनीचा आयपीओ आजपासून

मोहित सोमण: आजपासून गुंतवणूकदारांसाठी दोन आयपीओ बाजारात दाखल होत आहेत. जीएनजी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (GNG Electronics Limited) व इंडिक्यूब स्पेस लिमिटेड (Indiqube Space Limited) कंपनीचा आयपीओ बाजारात दाखल होत आहे. नक्की जाणून घ्या दोन्ही आयपीओविषयी सविस्तर माहिती...

१) Indiqube Space Limited - कंपनीचा ७०० कोटींचा आयपीओ (IPO) २३ जुलै ते २५ जुलैपर्यंत बाजारात दाखल होत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओसाठी २२५ ते २३७ रुपयांचा प्राईज बँड (Price Band) निश्चित करण्यात आला आहे. बीएसई (BSE) व एनएसई (NSE) या दोन्ही बाजारात हा आयपीओ दाखल होणार आहे. माहितीप्रमाणे ३० जुलैपर्यंत हा आयपीओ बाजारात सूचीबद्ध (Listed) होणार आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४१७५ रूपयांची गुंतवणूक या आयपीओसा ठी करावी लागणार आहे. कमीत कमी समभागांचे (stocks) १४ गठ्ठे (Lot) यात खरेदी करावे लागतील.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर (Book Leading Manager) म्हणून काम पाहणार आहे. एमयुएफजी इनटाईम इंडिया (MUFG Intime India Private Limited Link Intime) कंपनी आयपीओसा ठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे. आयपीओसाठी उपलब्ध असलेल्या शेअरचे दर्शनी मूल्य (Face Value) १ रूपये असेल तर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या कर्मचाऱ्यांना कंपनी प्रति शेअरवर २२ रूपये सवलत देणार आहे. एकूण २ कोटी ९५ लाख शेअरचा फ्रेश इशू (Fresh Issue) असणार आहे. कंपनीकडून ५० कोटी मूल्यांकनाचे शेअर ऑफर फॉर सेल (OFS) साठी ठेवण्यात आले आहेत. गुंतवणूकदारांना बोलीसाठी (Bidding) साठी कमीत कमी ६३ शेअरवर करावी लागेल.

माहितीनुसार, पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) २८ जुलैला होणार आहे. एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Qualified Institutional Buyers QIB) यांच्यासाठी ७४.८४% वाटा गुंतवणूकीसाठी आर क्षित असेल तर विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Non Institutional Investors NII) यांच्यासाठी १४.९७% वाटा, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors) साठी ९.९८% वाटा गुंतवणूकीस‌‌‌ उपलब्ध असेल. रिषी दास, मेघना अग्रवाल, अंशुमन दास हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. आयपीओआधी कंपनीचे भागभांडवल (Stake) ७०.३७% होता जो आयपीओनंतर घसरू शकतो.

कंपनीबद्दल -

ही कंपनी २०१५ साली स्थापन झाली होती. प्रामुख्याने कंपनीचा व्यवसाय तंत्रज्ञान आधारित वर्क स्पेस सोलूशन पुरवणे, इतर कंपनीच्या समुहाला तंत्रज्ञान आधारित सेवेसोबत काम करण्यासाठी जागा देणे आहे. कंपनी बी टू बी, बी टू सी दोन्ही प्रवर्गात काम करते.

कंपनीच्या आर्थिक परिस्थितीबद्दल -

उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) २७% वाढ झाली आहे तर कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) मागील आर्थिक वर्षात ५९% पटीने वाढला आहे.

३१ मार्च २०२४ पर्यंत कंपनीच्या महसूलात ८६७.६६ कोटींपर्यंत वाढ झाली होती जी ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढत ११०२.९३ कोटीवर वाढली आहे. कंपनीला मध्ये ३१ मार्च २०२४ मधील ३४१.५१ कोटींचे नुकसान झाले जे ३१ मार्च २०२५ पर्यंत घसरत १३९.६२ कोटींव र गेले आहे. कंपनीच्या ईबीटा (करपूर्व कमाईत EBITDA) मध्ये ३१ मार्च २०२४ मध्ये २६३.४२ कोटीवरून ३१ मार्च २०२५ पर्यंत वाढ होत ३१ मार्च २०२५ पर्यंत ६६०.१९ कोटीवर वाढ झाली आहे. कंपनीच्या करोत्तर नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर मागील वर्षा च्या ३१ मार्च २०२४ मधील ३४१.५१ कोटींच्या तुलनेत घसरण होत नफा ३१ मार्च २०२५ पर्यंत नुकसानीत बदलला ज्यात कंपनीला १३९.६२ कोटींचे नुकसान झाले. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ४९७७.१२ कोटी रुपये आहे. पात्र गुंत वणूकदारांना त्यांचे समभागांचे वाटप २८ जुलैपासून येईल.

२) GNG Electronics Limited- या कंपनीचा आयपीओ बाजारात आजपासून दाखल होत आहे. ४६०.४३ कोटीचा हा आयपीओ असणार आहे ज्यामध्ये १.६९ कोटी शेअरचा फ्रेश इशू असेल.२३ जुलै ते २५ जुलै कालावधीत हा आयपीओ गुंतवणूकदारांसा ठी उपलब्ध असेल. बीएसई व एनएसई या दोन्ही बाजारात हा आयपीओ दाखल होणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार,३० जुलैपर्यंत हा आयपीओ सूचीबद्ध (Listed) होणार आहे. २२५ ते २३७ रूपये प्राईज बँड कंपनीने निश्चित केला आहे.

मोतीलाल ओसवाल इन्व्हेसटर अँडव्हायजर लिमिटेड कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार आहे. बिग शेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे. अर्ज करण्यासाठी ६३ शेअर्सच गठ्ठा (Lot) खरेदी करावा लागणार आहे. या आयपीओत गुंतवणूक करण्यासाठी किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४१७५ रूपयांची गुंतवणूक करावी लागेल. कालच अँकर गुंतवणूकदारांकडून कंपनीने १३८.१३ कोटींचा निधी मिळवला आहे. शरद खंडेलवाल,विधी खंडेलवाल, अँमीएबल इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, के के ओव्हरसीज या कंपनीच्या प्रवर्तक (Promoter) आहेत. आयपीओआधी प्रवर्तकांचे भागभांडवल ९५.०१% होते जे आयपीओनंतर घसरू शकते.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी ५०% पर्यंत वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB), विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Non Institutional Investors NII) यांच्यासाठी १५%, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी १५% पर्यंत वाटा गुंतवणूकीस उपलब्ध असेल.

कंपनीबद्दल -

२००६ मध्ये स्थापन झालेली जीएनजी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड जागतिक स्तरावर आणि भारतात लॅपटॉप, डेस्कटॉप आणि आयसीटी उपकरणांसाठी नूतनीकरण सेवा देते. कंपनीची भारत, अमेरिका, युरोप, आफ्रिका आणि युएईमध्ये उपस्थिती आहे.

कंपनीची आर्थिक स्थिती -

उपलब्ध माहितीनुसार, कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) २४% वाढ झाली असून करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ३२% वाढ झाली आहे. कंपनीचे बाजार भांडवल २७०२.०७ कोटी रुपये आहे.

माहितीनुसार, कंपनीच्या महसूलात ३१ मार्च २०२४ पर्यंत ११४३.८० कोटीवरुन ३१ मार्च २०२५ पर्यंत वाढ होत १४२०.३७ कोटीवर गेला. कंपनीच्या करोत्तर नफ्यात (PAT) मध्ये ३१ मार्च २०२४ मधील ५२.३१ कोटीवरून वाढत ६९.०३ कोटींवर वाढ झाली. कंपनी च्या ईबीटा (EBITDA करपूर्व कमाईत) ३१ मार्च २०२४ मधील ८४.९० कोटींवरून वाढ होत ३१ मार्च २०२५ पर्यंत १२६.१४ कोटींवर वाढ झाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या आयपीओतील मिळालेल्या निधीचा वापर थकबाकी देण्यासाठी, व दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे.
Comments
Add Comment

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी

सांगा चूक कोणाची? लपवाछपवी कोणासाठी? बीएमसी आणि म्हाडामध्ये घमासान!

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) यांच्यात चांदिवलीतील

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार

मतदार यादीतून माझे नाव गायब होऊ शकते तर..., तेजस्वी यादवच्या या आरोपावर निवडणूक आयोगाचे आले स्पष्टीकरण

पाटणा : बिहारच्या मतदार यादीतून तेजस्वी यादव यांचे नाव वगळण्यात आलेले नाही. पाटणा जिल्हा प्रशासनाने तेजस्वी

इंडिगोच्या विमानात कानशिलात! पॅनिक अटॅक आलेला तरुण बेपत्ता!

मुंबई : मुंबईहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पॅनिक अटॅकचा