मँचेस्टर: मँचेस्टरच्या ऐतिहासिक ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या कसोटीदरम्यान केएल राहुलने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. राहुलने इंग्लंडच्या धरतीवर आपल्या १००० कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत. ही खास कामगिरी करणारा तो भारताचा पाचवा फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी ही कामगिरी केवळ सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावस्कर आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज फलंदाजांनी केली आहे.
इंग्लंडची धावपट्टी ही सीम आणि स्विंग गोलंदाजांसाठी ओळखली जाते. येथे टिकून राहणे भारतीय गोलंदाजांसाठी नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. अशातच राहुलची ही कामगिरी अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.
दिग्गजांच्या यादीत राहुल
सचिन तेंडुलकर - १५७५ धावा
राहुल द्रविड - १३७६ धावा
सुनील गावस्कर - ११५२ धावा
विराट कोहली - १०९६ धावा
केएल राहुल - १००० हून अधिक धावा