IND vs ENG: मँचेस्टरच्या मैदानात आजपासून चौथ्या कसोटीला सुरूवात

भारत विरुद्ध इंग्लंड : शुभमनसेनेला मालिकेत कायम राहण्याची संधी


मँचेस्टर :इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना हा मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममध्ये २३ जुलैपासून खेळवण्यात येत आहे. हा सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. उभयसंघात ५ पैकी ३ सामने खेळवण्यात आले आहेत. इंग्लंड या मालिकेत २-१ ने पुढे आहे. त्यामुळे शुभमनसेनेला मालिकेत कायम राहायचे असेल, तर चौथ्या सामन्यात कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. तर इंग्लंडकडे या सामन्यासह मालिका विजयाची दुहेरी संधी असणार आहे.


मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी पोषक आहे. सुरुवातीला इथे वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. मात्र फलंदाजांना सेट झाल्यास मोठी खेळी करण्याची संधी आहे. फिरकी गोलंदाजांना सामन्यातील तिसऱ्या दिवसापासून मदत मिळू शकते. सामन्यातील पाचवा आणि शेवटचा दिवस गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे फलंदाजांची चांगलीच कसोटी लागू शकते. खेळपट्टी पाहता टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय योग्य ठरू शकतो. कारण ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममध्ये मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणे सोपे ठरणार नाही. भारतानेआतापर्यंत ओल्ड ट्रॅफर्डमध्ये एकूण ९ कसोटी सामने खेळले आहेत.


चिंताजनक बाब म्हणजे भारताला या ९ पैकी एकही सामना जिंकता आलेला नाही. भारताने या मैदानातील ९ पैकी ४ सामने गमावले आहेत, तर इंग्लंडने भारताचा या मैदानात ५ सामन्यांमध्ये पराभव केला आहे. त्यामुळे टीम इंडिया या मैदानात गेल्या अनेक वर्षांचा इतिहास बदलत चौथ्या सामन्यात विजय मिळवणार का ? हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.



संकटमोचक बुमराह आक्रमक नेतृत्व करणार ?


इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला दुहेरी दुखापतींचा मोठा फटका बसला आहे. युवा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी गुडघ्याच्या दुखापतीमुळे मालिकेतील उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे, तर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आगामी मँचेस्टर कसोटीत खेळू शकणार नाही. २२ वर्षीय रेड्डीला सरावादरम्यान गुडघ्याच्या लिगामेंटला दुखापत झाली. त्याने आतापर्यंतच्या दौऱ्यातील तीनपैकी दोन कसोटी सामन्यांमध्ये सहभाग घेतला होता, मात्र आता तो मायदेशी परतणार आहे. बीसीसीआयने अद्याप या दुखापतीबाबत अधिकृतपणे तपशीलवार माहिती दिलेली नाही. या दोन प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे जसप्रीत बुमराहची भूमिका अधिकच महत्त्वपूर्ण बनली आहे. मालिकेच्या या टप्प्यावर बुमराहला विश्रांती देण्याचे नियोजित होते; परंतु आता संघाला त्याची नितांत गरज असून, तो चौथ्या कसोटीत आक्रमणाचे नेतृत्व करण्याची दाट शक्यता आहे.



सामन्यांवर पावसाचे सावट


दरम्यान, मँचेस्टर येथे बुधवारी पाऊस होण्याची २५ टक्के शक्यता आहे, तर गुरुवारी २४ जुलैलाही पावसाची शक्यता २५ टक्के इतकीच आहे. शुक्रवारी २५ जुलैला पाऊस होण्याची शक्यता २० टक्के आहे. शनिवारी २६ जुलैला पाऊस होण्याचा २५ टक्के अंदाज आहे, तर सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी पाऊस होण्याची सर्वाधिक ५८ टक्के शक्यता इंग्लंडच्या हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.



चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर


इंग्लंडने जाहीर केलेल्या संघात सॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ, लियाम डॉसन, क्रिस वोक्स, ब्रायडन कार्स आणि जोफा आर्चर या खेळाडूंचा समावेश आहे. चौथ्या सामन्यासाठी इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. दुखापतीमुळे इंग्लंडचा फिरकी गोलंदाज शोएब वशीर याला मालिकेतून बाहेर व्हावे लागले. त्यामुळे त्याच्या जागी लियाम डॉसनचा इंग्लंड संघात समावेश झाला आहे.



गिल महारेकॉर्ड करण्यासाठी सज्ज


कर्णधार शुभमन गिलने आतापर्यंत अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीत ३ सामन्यांमध्ये १०१ च्या सरासरीने ६०७ धावा केल्या आहेत. शुभमनची या मालिकेतील २६९ ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने या व्यतिरिक्त २ शतकं ठोकली आहेत. त्याने आणखी २५ धावा केल्यास त्याच्या एकूण ६३२ धावा होतील. शुभमन यासह इंग्लंडमध्ये आशियाई फलंदाज म्हणून कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरणार आहे. याआधी पाकिस्तानच्या मोहम्मद युसूफने २००६ साली इंग्लंडमध्ये ६३१ धावा केल्या होत्या.

Comments
Add Comment

महिला क्रिकेट विश्वचषक: पाकिस्तानचा संघ भारतात येणार नाही, भारत-पाक सामन्यांबाबत नवा नियम

नवी दिल्ली: भारतामध्ये होणाऱ्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या उद्घाटन समारंभात पाकिस्तानचा संघ सहभागी

ISPL 2025 : ISPL चं ऐतिहासिक पाऊल : टेनिस-बॉल क्रिकेटसाठी राष्ट्रीय स्पर्धात्मक आराखडा आणि झोनल पॅनल रचना लागू

मुंबई : भारतातील टेनिस-बॉल क्रिकेटला व्यावसायिक रूप देणाऱ्या इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) ने मोठा निर्णय

संघाला तारणाऱ्या ऋतुराज गायकवाडचे द्विशतक थोडक्यात हुकले

श्रेयस अय्यर २५ तर, जैस्वाल अवघ्या चार धावांवर बाद मुंबई : दुलीप ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धा सध्या सुरू असून

आयपीएल अध्यक्षपदासाठी संजय नाईक आणि राजीव शुक्ला यांच्यात चुरस!

मुंबई (प्रतिनिधी) : बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा या महिन्याच्या अखेरीस होत आहे. बीसीसीआय आणि आयपीएल

आशिया कपमध्ये कोण असणार भारताचा स्पॉन्सरर ?

मुंबई : आशिया कप स्पर्धेपूर्वी संसदेत एक बिल पास झाले आणि बीसीसीआयच्या जर्सी स्पॉन्सरला गाशा गुंडाळावा लागला.

आर. प्रज्ञानंद फिडे क्लासिकल बुद्धिबळ क्रमवारीत चौथ्या स्थानी

मुंबई  : सिंकफिल्ड बुद्धिबळ करंडकात दुसरे स्थान मिळवलेल्या भारताच्या आर. प्रज्ञानंद याने फिडे क्लासिकल