IND vs ENG : पहिल्या दिवसाचा खेळ संपला, भारताच्या ४ बाद २६४ धावा

मँचेस्टर : भारत वि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीचा पहिला दिवस संमिश्र राहिला. पहिल्या दिवशी भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना दिवसअखेर ४ बाद २६४ धावा केल्या आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत शार्दूल ठाकूर आणि रवींद्र जडेजा दोघेही १९ धावांवर खेळत आहेत.


या सामन्यात इंग्लडने ट़ॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. बेन स्टोक्सने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पहिल्या दिवशीला भारताला झटका बसला तो ऋषभ पंतच्या रूपात. ऋषभ पंतला या सामन्यात दुखापतीमुळे बाहेर पडावे लागले.


पाच सामन्यांच्या मालिकेत भारत १-२ अशा पिछाडीवर आहे. त्यामुळे मालिकेत टिकून राहायचे असेल तर भारताला हा सामना काही करून जिंकावाच लागेल.



राहुलची चमकदार कामगिरी


मँचेस्टरच्या ऐतिहासिक ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या कसोटीदरम्यान केएल राहुलने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. राहुलने इंग्लंडच्या धरतीवर आपल्या १००० कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत. ही खास कामगिरी करणारा तो भारताचा पाचवा फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी ही कामगिरी केवळ सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावस्कर आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज फलंदाजांनी केली आहे.
Comments
Add Comment

टी-२० सामन्यात सोनम येशेचा ८ बळींचा जागतिक विक्रम

भूतानच्या फिरकीपटूने म्यानमारविरुद्ध रचला इतिहास; ४ षटकांत दिल्या ७ धावा भूतान : फिरकीपटू सोनम येशे याने इतिहास

न्यूझीलंडविरुद्ध वनडेतून ३ स्टार खेळाडूंचा पत्ता कट ? दिग्गजांचं कमबॅक ?

मुंबई : जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट

भारतीय महिला हॉकीला सापडला नवा ‘हिरा’

प्रशिक्षिका हेलिना मेरीकडून बन्सुरी सोलंकीचे कौतुक नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकीच्या भविष्यातील सुरक्षित

श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बाब समोर आली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय

तिरुवनंतपुरम : श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय झाला. या